Maharashtra News Live Update Saam Tv News
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: पुण्याचे ग्राम दैवत कसबा गणपती मंदिरात चोरट्यांचा डल्ला

Marathi Breaking Live Headlines Updates : MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन, महाराष्ट्राला ऑक्टोबर हिटचा तडाखा, दुष्काळग्रस्त भागांचा पंचनामा, महाराष्ट्रासह देशातील राजकीय घडामोडी, महाराष्ट्रातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Alisha Khedekar

Pune : पुण्याचे ग्राम दैवत कसबा गणपती मंदिरात चोरट्यांचा डल्ला

पुण्याचे ग्राम दैवत कसबा गणपती मंदिरात चोरट्यांचा डल्ला

कसबा गणपती मंदिरातील दान पेट्या चोरट्यांनी फोडल्या

५० हजार रुपयांपेक्षा अधिक रोकड चोरट्यांनी केली लंपास

पुण्याच्या फरासखाना पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू

Nashik : नाशिककरांवर पुन्हा पाणी कपातीचे संकट

* नाशिककरांवर देखील पुन्हा पाणी कपातीचे संकट, आज होणाऱ्या महापालिकेच्या महासभेत पाणी कपातीबाबत निर्णय होण्याची शक्यता

* शहरातील पाणीपुरवठ्यात किमान १० टक्के कपात करण्याचे जलसंपदा विभागाचे निर्देश

* राज्यातील मर्यादित जलसाठ्याच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाचा निर्णय

एकादशीनिमित्त फुलांनी सजली माऊलींची समाधी

एकादशीनिमित्त संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी मंदिरात आकर्षक पुष्पसजावट करण्यात आली आहे.

फुलांच्या सजावटीने समाधीवरील माऊलींचं रूप अधिकच खुलून आलंय.

धाराशिवमध्ये दुष्काळाचे संकट बनले अधिकच तिव्र,विहीरींनी गाठला तळ

धाराशिवमध्ये दुष्काळाचे संकट बनले अधिकच तिव्र,विहीरींनी गाठला तळ

आठ दहा दिवस पण पाणी राहणार नाही,1972 च्या दुष्काळापेक्षा ही अवघड परिस्थिती

72 दुष्काळात पाणी तरी होत आता पिक तर गेली पण पाणी देखील राहील नाही, शेतकऱ्यांनी सांगितला अनुभव

Ratnagiri : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीचा बिगुल वाजलं

रत्नागिरी जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील महत्त्वपूर्ण असलेल्या रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल वाजलं

बँकेच्या नवीन संचालक मंडळाच्या निवडीसाठी प्रारुप मतदार यादी तयार करण्याचं काम पूर्ण झालंय.

ही यादी अंतिम करण्यासाठी प्रशासनाकडून अधिकृत निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

Jalna : जालन्यातील अंबड तालुक्यातील गल्हाटी प्रकल्प कोरडाठाक,15 ते 20 गावांवर पाणीसंकट

जालन्यातील अंबड तालुक्यातील बारसवाडा येथील गल्हाटी प्रकल्प कोरडाठाक पडलाय.त्यामुळे 15 ते 20 गावांवर पाणीसंकट ओढावलंय.

यावर्षी कमी पावसाअभावी प्रकल्पात पाणीसाठा झाला नाही.

परिणामी पिण्याच्या पाण्याबरोबरच या भागातील खरीप हंगाम देखील वाया गेला.

Pune : आंबळेत पुन्हा बिबट्याची दहशत; पहाटे कुत्र्यावर हल्ला करून ठार

शिरूर तालुक्यातील आंबळे गावात पुन्हा बिबट्याचा थरार पाहायला मिळालाय.

पहाटे घराजवळच बिबट्याने कुत्र्यावर हल्ला करून त्याला ठार केलंय.

Pune : पुण्यात शिकवणी, अभ्यासिका चालकांसह विद्यार्थ्यांना नोटिसा

पुण्यात शिकवणी, अभ्यासिका चालकांसह विद्यार्थ्यांना नोटिसा

आंदोलने बेकायदा असल्याचे नमूद करत पोलिसांचा कारवाईचा इशारा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी! ₹१५०० 'या' दिवशी खात्यात जमा होणार? आजच्या बैठकीत सप्टेंबर हप्त्याबाबत निर्णय?

Rajya Sabha Election : मोठी अपडेट! आणखी २ मंत्री बाहेर पडणार, ४ नव्या चेहऱ्यांना संधी; PM मोदींच्या नव्या टीममध्ये कोण?

Heart Attack : नवरात्रीत गरबा खेळताना 'ही' ५ लक्षणे दिसली तर लगेच थांबा! हार्ट अटॅकचा असू शकतो धोका

दुसऱ्यांच्या घरी पितरांचे जेवण करणं शुभ की अशुभ? श्राद्ध भोजनाने दोष लागतो का?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना हटवा नाहीतर... काँग्रेस आता थेट 'आरपारच्या' भूमिकेत; बघा काय आहे नवा प्लॅन

SCROLL FOR NEXT