Maharashtra News Live Update Saam Tv News
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: मालवणच्या समुद्रात पर्ससीन, हायस्पीड नौकांचा धुमाकूळ

Marathi Breaking Live Headlines Updates : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल अपडेट, टायगर श्रॉफवर गोळीबार प्रकरण, निवडणूक आयोग, ज्ञानेश कुमार, सीजेपी, हवामानाचे अपडेट, देश- विदेशातील महत्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Alisha Khedekar

मालवणच्या समुद्रात पर्ससीन, हायस्पीड नौकांचा धुमाकूळ

मालवणच्या समुद्रात पर्ससीन, हायस्पीड नौकांचा धुमाकूळ

मच्छिमारांची कारवाईसाठी मत्स्य विभागावर धडक

सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर

सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर

‘गोल्डन बनियन अवॉर्ड’साठी गुलदार प्रकल्पाची निवड

“द वीक हेरिटेज अवॉर्ड्स २०२६’मध्ये दोन श्रेणींत नामांकन

पहाटेच्या सुमारास वाकड परिसरातील सहा सात दुकानांना लागली भीषण आग

पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरात आज सकाळी पहाटे जवळपास सहा सात दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

वाकड परिसरातील प्रीष्टीन ब्रो लाईफ या ठिकाणी सहा सात दुकानांना आग लागल्याची वर्दी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी तातडीने दाखल होऊन आग आटोक्यात आणली आहे.

Konkan Rain Update : परतीच्या पावसामुळे भातपिकाचे मोठे नुकसान

मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने भात शेतीचे मोठे नुकसान केले आहे.

वादळी वाऱ्यासह कोसळत असलेल्या पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कापणीला आलेली भातशेती आडवी झाली आहे.

तसेच अनेक भागात झाडे मोडून पडली तर काही टीकाणी घरांची छप्पर उडून गेली आहेत.

कुडाळ, वेंगुर्ला आणि सावंतवाडी या तीन तालुक्यात गेले दोन दिवस पावसाने धुमाकूळ घातला आहे.

या वादळी पावसाचा सर्वाधिक फटका याच तीन तालुक्यांना बसला असून भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

त्र्यंबकेश्वरमध्ये ‘आनंदकुंभ’ संत संमेलन; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संत-महंतांचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये ‘आनंदकुंभ’ संत संमेलन; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संत-महंतांचे पूजन

१३ आखाड्यांचे प्रमुख संत, महंत, महामंडलेश्वर राहणार उपस्थित; सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीवर होणार संवाद

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाच्या कोर कमिटीची आज बैठक

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाच्या कोर कमिटीची आज बैठक..

थोड्याच वेळात कोर कमिटीच्या बैठकीला होणार सुरुवात..

पक्षातील प्रमुख नेते कोर कमिटीच्या बैठकीला राहणार उपस्थि

Buldhana Drought : बुलढाणा जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळपरिस्थितीचा सामना करण्यासाठी नियोजन बैठक

बुलढाणा जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळपरिस्थितीचा सामना करण्यासाठी नियोजन बैठक...

उपाययोजना करण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे प्रशासनाला निर्देश

धरणांमधील पाणी आणि जनावरांच्या चाऱ्यासाठी महत्वाच्या सूचना ..

Satara : फलटणमध्ये १० वर्षांच्या विद्यार्थ्याला क्लासमध्ये मारहाण; शिक्षिका आणि वरिष्ठ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा

फलटणमध्ये खासगी क्लासमध्ये शिकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाला शिक्षिकेसह नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

काही दिवसांपूर्वी खेळण्याच्या कारणावरून ही मारहाण झाल्याचा आरोप मुलाच्या वडिलांनी तक्रारीत केला आहे.

Mumbai : मुंबईकरांची सकाळ होतेय धुरक्यांच्या चादरीत

मुंबईकरांची सकाळ होतेय धुरक्यांच्या चादरीत

वाढत्या वायुप्रदूषणामुळे मुंबईच्या हवेची गुणवत्ता घसरली असून, AQI १९७ वर पोहोचला आहे.

वाहनांचा धूर आणि बांधकामांमधील धुळीमुळे प्रदूषणात वाढ होत आहे. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होण्याची भीती आहे.

अशातच मुंबईकरांना मोकळा श्वास कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित होतोय.

Pune : कोजागरी पौर्णिमा निमित्त पुणे शहरातील उद्याने आज रात्री १२ पर्यंत सुरू राहणार

कोजागरी पौर्णिमा निमित्त पुणे शहरातील उद्याने आज रात्री १२ पर्यंत सुरू राहणार

उद्यान विभागाचा पुणेकरांच्या हितार्थ निर्णय

आज कोजागरीच्या निमित्ताने चांदण्याच्या प्रकाशात आनंद लुटता यावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे

या आधी रात्री ७.३० वाजता उद्यान बंद असायची मात्र आज १२ पर्यंत असणार उद्यान सुरू

संध्याकाळी ४ ते १२ अशी उद्यान सुरू असणार आहेत

Nagpur : नागपूर महापालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांचे पाणी बचतीसाठी निर्देश

- महापालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांचे पाणी बचतीसाठी निर्देश.

- पाणीटंचाई टाळण्यासाठी शहरातील सर्व वॉशिंग सेंटर आणि जलतरण तलावांची तपासणी केली जाणार...

- कार धुणे, रस्ते धुणे, बागकाम आणि बांधकामासाठी पिण्याचे पाणी वापरल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा

काँग्रेस पक्ष सोडलेले देशातील पाच माजी मुख्यमंत्री काँग्रेसमध्ये 'घरवापसी' करणार?

काँग्रेस पक्ष सोडलेले पक्षाचे देशातील पाच माजी मुख्यमंत्री काँग्रेसमध्ये 'घरवापसी' करण्याची चर्चा सुरूये.

त्यात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नावाचीही चर्चा सुरूये.

यावर मोठं विधान करतांना नाना पटोले यांनी चव्हाण यांच्या संदर्भात राज्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात मोठा राग असल्याचं म्हणालेये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tikhat Sev Recipe: दिवाळीला फराळ करताना घरी बनवा कुरकुरीत आणि झणझणीत तिखट शेव, वाचा रेसिपी

Drinks for Liver Health: यकतावर घाणेरडी चरबी जमा झालीये? हे ६ ड्रिंक्स लिव्हर डिटॉक्स करण्यास ठरतील फायदेशीर

Ladki Bahin Yojana : ₹१५०० रुपयांचा बंद झालेला हप्ता व्हॉट्सअ‍ॅपवरून सुरू होणार? लाडक्या बहिणींनो, अर्ज करण्यापूर्वी हे नक्की वाचा

४ नोव्हेंबरपूर्वी ९२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार जमा होणार; E-KYC करावी लागणार का? जाणून घ्या नवी अपडेट

Political News : राजकारणात खळबळ! आमदाराची पक्षातून ६ वर्षांसाठी हकालपट्टी; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT