डेंगीची लागण झाल्यानंतर गुंतागुंत वाढल्याने पुण्यातील अवघ्या ८ वर्षांच्या चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय.
मनोज जरांगे प्रसारित केलेल्या ऑडिओ क्लिपमुळे राजकारण तापलंय. शिवसेना नेते रामदास कदम यांनी पंतप्रधान मोदींनी पत्र लिहिलंय.
उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या निवास्थानी दाखल झाले आहेत. भेटीमागील कारण काय आहे, याबाबतची माहिती समोर आली नाहीये.
बाळासाहेब भवन येथे जमून चर्चा करून शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी निघणार.
पुणे विभागीय पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी उद्या मतदान होणार असून, सातारा जिल्ह्यात प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. साताऱ्यात शिक्षक मतदारसंघासाठी ४४ आणि पदवीधरसाठी ९३ अशी एकूण १३७ मतदान केंद्र स्थापन करण्यात आली आहेत.
वांद्रे येथील एम.आय.जी. क्लब येथे मनसे पदाधिका-यांची महत्वाची बैठक
आगामी राजकीय भूमिकांबाबत राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करणार
अध्यक्ष निवडीच्या सभेचा कोरम पूर्ण करण्यासाठी 14 संचालकांची गरज
सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीकडे आहेत 13 संचालक तर महायुतीकडे आहेत 12 संचालक
अध्यक्ष निवडीत तयार होणार तांत्रिक पेच
समविचारी आघाडी आणि महायुती समझोता करणार की एकमेकांचे संचालक फोडण्याचा प्रयत्न होणार याकडे लक्ष
येत्या 29 ऑक्टोबरला होणार आहे गोकुळची अध्यक्ष निवड
सरळ खरेदी धारक शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेले सानुग्रह अनुदान दिवाळीपूर्वी देण्यात यावे या मागणीसाठी जलसमाधी आंदोलन..
आंदोलनात मोठ्या प्रमाणावर प्रकल्पग्रस्त शेतकरी सहभागी...
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या सोबत फोनवरून चर्चा झाल्यानंतर आंदोलन मागे..
28 तारखेला मंत्रालयात बैठक
उद्या संध्याकाळी ६ वाजता न्यायालय आदेश सुनावणार
१० हजार रुपयांच्या वैयक्तिक मुचलका नोटिसीला नेहा बोरा यांचे आव्हान
लोकशाहीत सत्ताबदलाची मागणी करण्यात काहीही गैर नसल्याचा नेहा बोराचा युक्तिवाद
'सत्ताबदल निवडणुकीच्या माध्यमातूनच व्हायला हवा', दिल्ली पोलिसांचा युक्तिवाद
धुळे शहराचे वैभव आणि तब्बल 146 वर्षांची अखंड परंपरा असलेल्या श्री बालाजी रथोत्सवाला आज पाशांकुशा एकादशीच्या मुहूर्तावर विधिवत पूजा आणि आरतीने भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली, मात्र यंदा या ऐतिहासिक सोहळ्याला भीषण दुष्काळाच्या चिंतेची गडद किनार लाभली असून, आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजासाठी हजारो भाविकांनी भगवान बालाजीकडे पावसाची आर्त याचना केली आहे. नवरात्रीतील 11 दिवसांच्या वहन मिरवणुकीनंतर निघणाऱ्या या रथाला तीन फूट उंचीची साखळी आणि वीस फूट लांब जाड दोराच्या साहाय्याने भाविकांकडून ओढले जाते, रथावर श्री बालाजींची पंचधातूची मूर्ती विराजमान असून, सोळा पुजारी पूजेसाठी उपस्थित आहेत. 'व्यंकटेश रमणा, गोविंदा गोविंदा'च्या अखंड जयघोषात ही भव्य मिरवणूक बालाजी मंदिर, खोलगल्ली, आग्रा रोडसह शहरातील विविध प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत आहे,
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात मका काढण्याच्या मशीनमध्ये अडकून ३७ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. योगेश भावालाल पाटील असं मृत शेतकऱ्याचं नाव असून, बुधवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास भागदरा शिवारात ही घटना घडली.
शेतकरी दिनेश महाजन यांच्या शेतात मका काढण्याचं काम सुरू असताना हा अपघात झाला. योगेश पाटील हे शेतीकामासोबतच मका काढण्याचं मशीन चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या निधनामुळे तीन मुलांच्या डोक्यावरील वडिलांचं छत्र हरपलं असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी जामनेर पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे
जळगावातील खेडी बुद्रुक येथील माऊली नगर परिसरात मोटारसायकलचा लाईट सुरू-बंद करण्यावरून झालेल्या वादातून चॉपरने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ४४ वर्षीय किरण पाटील यांचा मृत्यू झाला, तर ३५ वर्षीय किशोर पाटील गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना २० ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. घटनेनंतर एमआयडीसी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत मयूर चैत्राराम जाधव याला २४ तासांच्या आत ताब्यात घेतले. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णा पाटील करीत आहेत.
टायगर श्रॉफवर झालेला गोळीबार प्रकरण
अनिल पंडित फरार आरोपी घोषित
पोलिसांकडून रिमांड अर्जात अनिल पंडितचा फरार आरोपी म्हणून उल्लेख
अनिल पंडितच्या इशाऱ्यावर झाला होता टायगर श्रॉफवर गोळीबार
अमरावतीच्या बडनेरा येथील श्रीराम मंदिरात अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी मंदिरातून हनुमानजींचे सोन्या-चांदीचे मुकुट, दोन छत्र आणि गदा असा सुमारे तीन ते चार लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. चोरीची संपूर्ण घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे बडनेरा परिसरात खळबळ उडाली असून, मंदिराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणातील आरोपी संतोष कनोजिया उर्फ टल्ली आणि आरोपी अमित जयकिशन सिंग उर्फ पपलू या दोघांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, मतदानाच्या पूर्वतयारीला वेग आला आहे. मतदानासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची पथके आवश्यक मतदान साहित्य ताब्यात घेऊन संबंधित मतदान केंद्रांकडे रवाना झाली आहेत. पुणे जिल्ह्यातील २३२ मतदान केंद्रांवर शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत, शांततेत आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केंद्रनिहाय नियोजन केले आहे.
अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरण करण्याच्या राज्य शासनाच्या धोरणाला विरोध दर्शवण्यासाठी आज नंदुरबार शहरात अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी जनआक्रोश महामोर्चा संघर्ष समिती च्या वतीने भव्य महामोर्चा काढण्यात आला. या धोरणामुळे अनुसूचित जातींमधील सामाजिक एकता आणि बंधुतेला तडा जाईल, तसेच हे संविधानाच्या कलम 341 चे उल्लंघन असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
या महामोर्चानंतर जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन देण्यात आले. शासनाने आरक्षणाचे समान हक्क आणि सामाजिक न्याय अबाधित राहील अशी भूमिका घ्यावी व उपवर्गीकरणाची गैरसंविधानिक प्रक्रिया थांबवावी, अशी प्रमुख मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विखे-थोरातांनी केलेले प्रयत्न अखेर अपयशी ठरले असून, २१ पैकी ११ जागा बिनविरोध झाल्यानंतर उर्वरित १० जागांसाठी निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. या निवडणुकीत विखे-थोरातांचा सहकार पॅनल, निलेश लंके यांचा परिवर्तन पॅनल आणि राम शिंदे समर्थक उमेदवार यांच्यात राजकीय संघर्ष रंगणार आहे. सुरुवातीपासूनच बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी विखे आणि थोरात यांनी आजी-माजी नेत्यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न केले. मात्र, या प्रक्रियेत राम शिंदे आणि निलेश लंके यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर दसऱ्याच्या मुहूर्तावर पुन्हा एकदा बिनविरोध निवडणुकीसाठी बैठक झाली. या बैठकीला सभापती राम शिंदे, खा.निलेश लंके यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित राहिले आणि बिनविरोध निवडणुकीचा नाराही देण्यात आला. मात्र, उमेदवारी अर्ज माघारीच्या २१ तारखेच्या अंतिम दिवशी या प्रयत्नांना धक्का बसला. अनेक उमेदवारांनी माघार न घेतल्याने निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. त्यातच राम शिंदे यांनी आपल्या समर्थक उमेदवारांची यादी जाहीर करत स्वतंत्र ताकद दाखवण्याची भूमिका घेतली, तर लंके यांच्या विरोधात विखे समर्थक भाजप पदाधिकारी उमेदवार रिंगणात असल्याने लंके यांनीही शिंदेसेनेचे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या साथीने परिवर्तन पॅनल उभे केले. बिनविरोध निवडणुकीच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करताना निलेश लंके यांनी, केवळ आपल्याच लोकांना बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला जात असल्याचा आरोप केला. तसेच, उमेदवारी अर्ज माघारीची अंतिम वेळ दुपारी तीन वाजेपर्यंत असतानाही रात्री उशिरापर्यंत बिनविरोधची प्रक्रिया सुरू ठेवल्याचा दावा त्यांनी केला.
कमी पर्जन्यमानामुळे जलाशयांतील पाणीसाठा घटल्याने भिवंडी शहरात पाणीकपात करण्यात येणार आहे. १६ ऑक्टोबर २०२६ पासून किमान १० टक्के पाणी बचतीचे आवाहन करण्यात आले आहे. स्टेम कंपनीकडून दर बुधवारी सकाळी ९ ते गुरुवारी पहाटे ३ वाजेपर्यंत १८ तासांचा शटडाऊन घेतला जाणार आहे. यामुळे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार असून, त्यानंतर एक दिवस कमी दाबाने पाणी मिळेल. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.
अमरावतीमध्ये धनगर बांधवांनी मेंढपाळांच्या विविध प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी घोड्यावरून मोर्चा काढला. एर्विन चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. मेंढपाळांसाठी तातडीने चारा छावण्या सुरू कराव्यात, परराज्यातील मेंढपाळांच्या प्रवेशावर बंदी घालावी आणि मेंढपाळांना दुष्काळी मदत द्यावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. शासनाने मागण्यांची लवकर दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही धनगर बांधवांनी दिला आहे.
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करण्याची मागणी आरपीआय पक्षाकडून करण्यात आली आहे. यासंदर्भात मुळशीचे तहसीलदार विजयकुमार चौबे यांना निवेदन देण्यात आले. पावसाअभावी तालुक्यातील शेतकऱ्यांची पिके वाळून गेली असून, उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. इतर तालुक्यांप्रमाणे मुळशी तालुक्यातही दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी आरपीआयने केली आहे.
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात पुन्हा बिबट्याचे दर्शन झाल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. म्हसोबाचीवाडी घाटा आणि पिंपरी परिसरात बिबट्या दिसल्याची माहिती आहे. बीड-अहिल्यानगर महामार्गावरही त्याचा वावर असल्याचे समोर आले आहे. दौलावडगाव येथे सलग दोन दिवस बिबट्या दिसला. शेतात बादलीत ठेवलेले पाणी पिण्यासाठी आलेल्या बिबट्याने शेतकऱ्याच्या कुत्र्यावर हल्ला केला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचे फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर होत असून माण, खटाव आणि फलटण तालुक्यांतील ४९ गावे आणि २६५ वाड्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाकडून ३९ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. माण तालुक्यात सर्वाधिक ३३, खटावमध्ये ५, तर फलटणमध्ये १ टँकर सुरू आहे. याशिवाय १० विहिरी आणि १० बोअरवेल अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. वाढत्या उन्हामुळे टँकरची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी उद्या मावळमध्ये मतदान
मतदानासाठी प्रशासन सज्ज,
मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला
मावळ तालुक्यात पदवीधर मतदारसंघासाठी एकूण २ हजार ६७९ मतदार आहेत
पुणे - दिल्लीतील हवाला ऑपरेटर आणि अन्य कंत्राटाचीही होणार चौकशी
लाचखोरी आणि संरक्षण उत्पादनाशी संबंधित संवेदनशील माहिती अनधिकृतपणे उघड केल्याचे प्रकरण
हवाला ऑपरेटरच्या माध्यमातून करोडो रुपयांचे आर्थिक व्यवहार?
या गुन्ह्यातील आर्थिक व्यवहार दिल्लीतील एका हवाला ऑपरेटर मार्फत झाल्याचे निष्पन्न
कोट्यवधी रुपयांची कथित लाच देऊन देशाच्या संरक्षण व्यवस्थेशी संबंधित कामे मिळविल्याप्रकरणी व्यावसायिक आशिष कन्सल सीबीआय कोठडीत
या गैरव्यवहारात सहभागी दिल्लीतील हवाला ऑपरेटर सह कन्सलची चौकशी करण्यात येणार
नंदुरबार - खांडबारा आदिवासी मुलींच्या वसतिगृहात निकृष्टदर्जाचे जेवण दिले जात असल्याचा विद्यार्थिनींचा आरोप
ठेकेदाराकडून विद्यार्थिनींच्या आरोग्याशी खेळ
जेवणातून दूध, दही आणि फळे गायब निकृष्ट तांदूळ आणि भाजीबाबत विद्यार्थिनींची अधिकाऱ्यांकडे थेट तक्रार
प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांच्याशी फोनवर विद्यार्थिनींनी मांडल्या तक्रारी
प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळणार की प्रत्यक्ष कारवाई ची मागणी
भिवंडी तालुक्यातील अनंगाव येथे घरफोडी
एकाच बिल्डिंगमधील दोन घरात चोरी
गणेशपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
यवतमाळ - अल्पवयीन मुलीशी कथित गैरवर्तनाच्या आरोपावरून यवतमाळमध्ये तणाव
यवतमाळच्या महागांव तालुक्यातील गुंज येथील घटना
४२ वर्षीय व्यक्तीला संतप्त जमावाची मारहाण
पोलिस वाहनाला घेराव घालण्यात आला
बसस्थानक परिसरात अघोषित रास्तारोको
वर्धा -
- वर्धा जिल्ह्यात 41 मतदान केंद्रावर होणार मतदान
- नागपूर विभाग पदवीधर मतदार संघासाठी उद्या मतदान
- जिल्ह्यात एकूण 21472 मतदार
- जिल्ह्यातील मतदान प्रक्रियेसाठी 160 कर्मचारी तर 7 झोनल ऑफिसर
- 100 च्या जवळपास पोलीस कर्मचाऱ्यांचा असणार समावेश
- मतदान केंद्रावर साहित्य घेऊन पोलिंग पार्टी रवाना
- सकाळपासून पोलिंग पार्टी मतदानाचे साहित्य करण्यात आले वाटप
- विद्याविहार रेल्वे स्थानकावरील उड्डाणपुलाला स्वर्गीय अजितदादा पवार यांचे नाव देण्याची मागणी
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे मागणी.
- मुंबईतील विद्याविहार रेल्वे स्थानकाजवळ नव्याने उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाला ‘स्वर्गीय अजितदादादा पवार रेल्वे उड्डाणपूल’ असे नाव देण्याची विनंती.
- पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील दळणवळण अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने हा उड्डाणपूल महत्त्वाचा प्रकल्प.
वर्धा -
- जलवाहिनी बदलण्याच्या कामामुळे पिपरी अधिक तेरा गावांच्या पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा चार ते पाच दिवस प्रभावित राहणार
- येळाकेळी शिवारात समृद्धी महामार्ग इंटरचेंज परिसरात जलवाहिनी बदलविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू
- जुनी जलवाहिनी वारंवार लिकेज होत असल्याने जलवाहिनी बदलविण्याच्या कामाला वेग
- तांत्रिक कामामुळे पिपरी अधिक तेरा गावांचा पाणी पुरवठा 22 ऑक्टोबरपासून चार ते पाच दिवस प्रभावित राहण्याचे शक्यता
- जलवाहिनी बदलल्या नंतर तांत्रिक तपासणी पूर्ण झाल्यावर टप्प्या टप्प्याने पाणीपुरवठा सुरळीत होणार
- नागरिकांनी पाण्याचा जपून आणि काटकसरीने वापर करण्याचे आवाहन
इथेनॉलबाबतच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे मोठा फटका
उसाचा रस, पाक, साखर आणि बी हेवी मळीपासून तयार झालेले इथेनॉल खरेदी न करण्याचा सरकारचा निर्णय
कोट्यावधीची गुंतवणूक करून उत्पादनाच्या तयारीत असणाऱ्या साखर कारखान्यांना मोठा झटका
केंद्र सरकारच्या निर्णयामुळे 40 हजार कोटींची गुंतवणूक धोक्यात
देशभरात इथेनॉल निर्मितीला पुन्हा एकदा ब्रेक लागण्याची शक्यता
वाशिम तालुक्याच्या टो येथील शेतात लपवून ठेवलेला बनावट देशी आणि विदेशी दारूचा साठा जप्त
राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली कारवाई
याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली
या कारवाईत तब्बल २ लाख ८२ हजार ६१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक
मतदानासाठी मतपेटीसह साहित्य रवाना
मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज
लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत 15 उमेदवारांच्या अर्ज बाद
19 जागांसाठी 70 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात.
तर विद्यमान चेअरमन धीरज देशमुख बिनविरोध
कोंढव्यात सराईत चोराला अटक
१२ मोबाईल आणि ३ दुचाकी जप्त
दोन लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल हस्तगत
मोबाईल चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना यश
१ नोव्हेंबर रोजी होणारी ही रॅली पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे
आज संध्याकाळी होणाऱ्या इंडिया अलायन्सच्या बैठकीत हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता
काल भाजपने रॅलीच्या तारखेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
मात्र, काँग्रेसच्या सूत्रांनुसार, १ नोव्हेंबर हा दिवाळीपूर्वीचा रविवार आहे. या रॅलीचा आजूबाजूच्या बाजारपेठेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे, रॅली पुढे ढकलण्याचा विचार केला जात आहे.
- एसटी चालक-वाहकाला मारहाण
- हिंगणघाट बसस्थानकात एसटी चालक-वाहकाला मारहाण
- वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट बसस्थानकात एसटी चालक आणि वाहकाला मारहाण
- महिला प्रवाशासोबत झालेल्या वादातून मारहाणीची घटना
- हिंगणघाट बसस्थानकावरील घटना
- आर्वी आगाराची आर्वी ते चंद्रपूर मार्गावरील होती बस
टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट
मुंबई गुन्हे शाखेने संघटित गुन्हेगारीच कलम वाढवलं
भारतीय न्याय संहिता कलम १११ ची करण्यात आली वाढ
भंडारा जिल्ह्यातील तुमसर रोड रेल्वे स्थानकावर चालत्या रेल्वेत चढण्याच्या प्रयत्नात एका प्रवाशाचा पाय घसरून भीषण अपघात घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
या दुर्घटनेत प्रवाशाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून पाय निकामी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.सुनिल कुमार नंदा (52) रा.मुंडिकोटा असे जख्मी व्यक्तीचे नाव आहे.
लातूर जिल्ह्यात एकीकडे दुष्काळामुळे शेतकरी संकटात सापडला असताना, दुसरीकडे आता शेतकऱ्यांना चोरट्यांचा धस्का सतावतो आहे.
शेतातील विद्युत मोटारी, शेती साहित्य आणि पशुधन चोरीच्या घटनांमुळे वाढ होत चालली आहे
या घटनेचे गांभीर घेत,ग्रामीण भागातील चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी लातूर पोलिसांकडून ‘पोलीस आपल्या गावी’ हा विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे.
- १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी
- येत्या ३१ ऑक्टोबरला त्र्यंबकेश्वर मंदिरात फक्त पासधारकांनाचं मिळणार दर्शन
- ३१ ऑक्टोबरला त्र्यंबकेश्वर मंदिर खुलं राहणार, मात्र दर्शन फक्त पासधारकांनाचं मिळणार
- येत्या ३१ ऑक्टोबरला राष्ट्रपतींच्या उपस्थितीत त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा ध्वजारोहण सोहळा
श्रीवर्धनच्या ब्ल्यू फ्लॅग मानांकनाचा स्थानिक व्यवसायीकांना फटका!
ब्ल्यू फ्लॅगच्या निकषांमुळे स्थानिक व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ!
सहा महिन्यांपासून व्यवसाय बंद; कुटुंबांचा उदरनिर्वाह कसा करायचा?
वनविभाग, नगरपालिकेच्या कारवाईने व्यावसायिक हतबल
50 हून अधिक व्यावसायिकांचा रोजगार धोक्यात
मराठवाड्यातील 370 प्रकल्पांवर पिण्याच्या पाण्याचे संकट!
235 प्रकल्पांत पाणीसाठा शून्य; 135 प्रकल्पांमध्येही पाणी अत्यल्प
बीडमध्ये सर्वाधिक 87, तर लातूरमध्ये 86 प्रकल्प संकटात
काही प्रकल्पांतील पाणी फक्त एक-दोन महिने पुरणार
रायगडात शिवसेना-राष्ट्रवादीत वाकयुद्ध पेटलं
दळवींच्या टीकेला अनिकेत तटकरेंचं जोरदार प्रत्युत्तर
सुनील तटकरेंनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत जावे दळवींचा खोचक सल्ला
दळवींनीही सुनील तटकरे यांचे मार्गदर्शन घेतलंय; आमदार अनिकेत तटकरेंचा पलटवार
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास नवदुर्गा मंडळांच्या मिरवणुकांना उत्साहात सुरुवात झाली.
गुलालाची उधळण करीत मंडळांनी शहराला गुलाबी रंगात रंगवले, तर डीजेच्या कर्कश आवाजाने परिसर दणाणून गेला.
शहरातील मिरवणुकीत ५५ मंडळे सहभागी, तर भुसावळ शहरात एकूण १३५ नवदुर्गा मंडळे आहेत.
या मिरवणुकांसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, डीजेच्या कर्कश आवाजाबाबत प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
लहान मुलांच्या भांडणावरून हिंगोली शहरात घरांची तोडफोड आणि हाणामारीची घटना
हिंगोली शहरातील उच्चभ्रू वस्ती असलेल्या एनटीसी परिसरात घडली घटना
हिंगोली शहरातील एनटीसी परिसरातील बालाजी मंदिर परिसरात मध्यरात्री हा सगळा धक्कादायक मारहाणीचा प्रकार घडला
विशेष म्हणजे रात्री दोन वाजेपर्यंत हा धिंगाणा सुरू असताना पोलिसांना मात्र याची कल्पना देखील नसल्याची माहिती पुढे आली आहे,
वाशिमच्या मालेगाव शहरात दुर्गा विसर्जन मिरवणुकीदरम्यान तणाव
टिपू सुलतान चौक परिसरात मिरवणूकीवर दगडफेक
मिरवणुकी दरम्यान, उधळलेला गुलाल विशिष्ट समाजातील व्यक्तीच्या घरावर गेल्याने दुर्गा मंडळ आणि काही तरुणांमध्ये झाली होती बाचाबाची
जमावाने काही दुचाकी आणि अन्य वाहनांची केली तोडफोड
दगडफेक करणाऱ्या आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी पोलीस स्टेशनमध्ये मोठा जमाव
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.