आपण अनेकदा वैद किंवा अवैध डॉक्टरांकडून कधी रुग्णालयात तर कधी धावत्या वाहनात पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या सहाय्याने गर्भलिंग निदान चाचणी करताना ऐकलं असेल..... मात्र बुलढाण्यात चक्क शेतात गोठा आणि गोठ्यात पोर्टेबल सोनोग्राफीच्या सहाय्याने गर्भलिंगनिदान चाचणी करताना बुलढाण्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांनी स्वतः पथकासह पकडलं आहे. थेट शेतातील पत्र्याच्या गोठ्यात पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या सहाय्याने सुरू असलेला गर्भलिंग निधनाचा काळाबाजार अकोला व बुलढाणा जिल्ह्याच्या संयुक्त पथकाने उघड केला आहे. डॉक्टर बिराजदार हे व त्यांचे पथक संशयतांच्या मागावर होते. चिखली तालुक्यातील अमडापूर लव्हाळा मार्गावर गणेश शंकरराव सूर्यवंशी यांच्या शेतातील पत्राच्या गोठ्यात बनावट ग्राहकाच्या सहाय्याने आरोग्य विभागाच्या या पथकाने उघडकीस केला आहे. यावेळी एका बोगस डॉक्टर सह तिघांना रंगेहात पकडलं असून तिघांवर PCPNDT कायद्यानुसार व विविध कलमान्वये अमडापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे
नागपूर जिल्ह्याच्या नरखेड तालुक्यातील देवग्राम येथील शेतकरी गजानन मानकर (वय ५५ वर्षे) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली आहे.
नागपूरच्या शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू असताना शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली
- गजानन मानकर यांच्याकडे चार एकर कोरडवाहू शेती होती, नेहमीप्रमाणे ते शेतात गेले होते. मात्र संध्याकाळपर्यंत घरी न आल्याने कुटुंबीयांनी गावकऱ्यांनी शेतात धाव घेतली असता ते बेशुद्धावस्थेत पडलेले आढळले.
- परिसरात कीटकनाशकाचा वास येत होता, तातडीने त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नंतर नागपूरच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. जिथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मराठा आरक्षण उपसमितीला ओबीसी आरक्षण उपसमितीच्या धर्तीवर निर्णय घेण्याचे अधिकार द्या, अन्यथा ही समिती बरखास्त करा अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे.. निर्णय घेण्याचे अधिकारच नसतील तर राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपसमितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी देखील मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे.. यावेळी मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, विविध मराठा संघटनांनी मराठा आरक्षण उपसमिती बरखास्त करण्याची मागणी केली आहे..
मुंबईत थंडीला सुरुवात झाली असताना पालिकेकडून सावध भूमिका
उघड्यावर शेकोटी पेटवल्यास २ हजार दंड
मुंबईच्या वातावरणात गारठा वाढण्यास सुरुवात झाली असून प्रदूषणही वाढण्यास सुरुवात झाली आहे
'एक्यूआय'मध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने पालिकेने प्रदूषण रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.