बारामती शहर आणि परिसरात वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात
राष्ट्रवादीच्या कोर कमिटीचे बैठकीला सुरुवात
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली बैठक सुरू
या बैठकीला उपस्थित राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल छगन भुजबळ समीर भुजबळ दिलीप वळसे पाटील आदी नेते उपस्थित
राज्यसभा कोणाला द्यायची यावर बैठकीमध्ये चर्चा सुरू
भुजबळांकडून समीर भुजबळ यांना उमेदवारी देण्यात यावी, असं बैठकीत आग्रह
राष्ट्रवादीचे कोर कमिटी बैठक पार पडत आहे
राज्यसभा निवडणुकीबाबत कोर कमिटीमध्ये चर्चा केली जाणार
या बैठकीला सुनील तटकरे, प्रफुल पटेल, छगन भुजबळ, समीर भुजबळ, दिलीप वळसे पाटील
कोर कमिटीच्या बैठकीमधून राज्यसभेचा उमेदवार ठरणार
राजुर हत्याकड प्रकरणात मोठी अपडेट
दोन पोलीस निरीक्षकांच निलंबन
तत्कालीन एलसीबी पीआय सुनील अंबुलकर आणि जळगाव जामोद पोलीस निरीक्षक नितीन पाटलांचे निलंबन
सांगली शहरासह परिसरात मान्सूनपूर्व पावसाने सायंकाळी दमदार हजेरी लावत नागरिकांना उकाड्यापासून दिलासा दिला.. तर सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील स्टेशन चौक रोड, शिवाजी मंडई परिसरातील मुख्य रस्त्यावर पाणी आले होते. अनेक ठिकाणी पाणी रस्त्यावर साचून सुद्धा राहिले आहे. त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करून मार्ग काढावा लागत आहे. अनेक भागांतील जनजीवन काही काळ विस्कळीत झाले. मात्र या पावसामुळे सांगलीकरांची मोठी दैना उडाली आहे.
पुण्यातील लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आला गुन्हा दाखल
अजोजकांसह कांसह तब्बल ७८ जणांवर करण्यात आला गुन्हा दाखल
एकूण ७ आयोजकांनी केल होतं या पार्टीचे आयोजन
अमरावती जिल्ह्यात रविवारी अनेक भागांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानक झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला.. नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला..दरम्यान, धामणगाव रेल्वे तालुक्यातील निंभोरा बोडखा परिसरात वादळी वाऱ्याचा जोर अधिक असल्याने अनेक घरांवरील टिनपत्रे व कवेलू उडून गेले.वादळी वाऱ्यामुळे काही घरांचे नुकसान झाले आहे. विजेचे तार तुटले आहेत.
मोहोळचे आमदार राजू खरे यांचा महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव देशमुख यांना पाठिंबा सोलापूर विधान परिषद निवडणुकीत शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर अभिजीत पाटील, नारायण पाटील यांनी भाजप पूरक भूमीका घेतली असली तर मोहोळचे आमदार राजू खरे यांनी मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव देशमुख यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. सोलापूर जिल्हा हा पुरोगामी विचारांचा आहे.
पुणे -
पुण्यात लोणी स्टेशन चौकात दुचाकी चालकाचा राडा
भर उन्हात झोपला थेट पुणे सोलापूर महामार्गावर
दुचाकी चालक दारू पिल्याची माहिती
पुणे सोलापूर महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. वर्दळ असताना हा महाभाग थेट पुणे सोलापूर महामार्गावर झोपला
काही काळ वाहतुकीला अडचण निर्माण झाली होती
दारू पिऊन झिंग असल्याने त्यांने ही कृत्य केलं असल्याची माहिती
पोलीस आणि स्थानिकांनी समजावत त्याला रस्त्यावरून बाजूला केलं...
सध्या पुणे सोलापूर महामार्गावरचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे
सांगली शहरासह परिसरात मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी
सांगली शहरामध्ये मान्सून पूर्व पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सांगली शहरासह परिसरामध्ये मान्सूनपूर्व पाऊसाची दमदार हजेरी पाहायला मिळत आहे.
सकाळी उकाडा आणि सायंकाळी पाऊस असे चित्र काहीसं गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सांगली शहरांमध्ये अनुभवायला मिळत आहे.
आज सायंकाळी देखील विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली.
नागपूर -
- एसी स्लीपर बसमध्ये नागपुरात येणाऱ्या प्रवाशांचे जीव धोक्यात टाकल्याची घटना समोर
- धावत्या बसमध्ये आग पेटवून अमली पदार्थांचे सेवन केल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर
- कोटावरून नागपूरला येणाऱ्या MR ट्रॅवेल्स मधली धक्कादायक घटना
- परिवहन विभागाचे नियम धाब्यावर ठेऊन अमली पदार्थचे सेवन...
- आग पेटवली तेव्हा अनेक प्रवासी AC स्लीपर बस मध्ये झोपलेले होते, सुदैवाने कोणतिही अनुचित घटना नाही..
पुणे -
हाऊस पार्टीमध्ये आलेल्या पोरांची मुजोरी
पोलिसांच्या ताब्यात असून देखील सोशल मीडियावर स्टोरी टाकत तरुणाचा माज
पार्टीत पकडल्या गेल्यानंतर "आफ्टर पार्टी पोलिसांसोबत" अशी स्टोरी टाकत तरुणाने दाखवला माज
पोलिसांच्या ताब्यात आपण असताना सोशल मीडियावरती स्टोरी केली शेअर
पावसाची नांदेड जिल्ह्यात दूरवर हजेरी.
पावसामुळे नागरिकांना उघड्यापासून दिलासा
- पावसाळ्यापूर्वी सुरू असलेल्या कामाचा घेतला आढावा
- नाल्यालगतच्या परिसरातील शेतकऱ्यांशी बावनकुळे यांनी साधला संवाद
- शेतकऱ्यांच्या समस्या, अडचणी आणि मागण्या जाणून घेतल्या
- विविध विषयांवरील निवेदने शेतकऱ्यांकडून महसूल मंत्र्यांना सादर
- निवेदने स्वीकारून संबंधित प्रश्नांवर सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन
- नाल्याच्या खोलीकरणामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा सुरळीत होण्यास मदत
- परिसरातील शेतीला मोठा लाभ होणार असल्याचा विश्वास
- कामाची गुणवत्ता आणि गती राखण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना
- पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्यावर महसूल मंत्र्यांचा भर
२ एकरावरील केळी बाग जमीनदोस्त, शेतकऱ्याचे ८ लाख रुपयांचे नुकसान
२ लाख २५ हजार रुपये खर्च करुन जोपासलेली बाग जमीनदोस्त झाल्याने शेतकरी हवालदिल
भुम तालुक्यातील वारे वडगाव गावातील शेतकरी देवेंद्र डिसले यांचे मोठे नुकसान
पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्याची मागणी
मुख्यमंत्री द्रेवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेत ड्रग्ज प्रकरणी माहिती दिली. तसेच देशात युद्धामुळे इंधनाचे दर वाढले.
बुलढाणा शहरातील तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी अखेर शहरात दाखल झाले असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज सकाळी पाणी येळगाव जलाशयावर पोहोचल्यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी जलशुद्धीकरण केंद्राला भेट देऊन कामांची पाहणी केली.
तरुण पिढी नशेच्या आहारी जाऊ नये, यासाठी चिखली येथील 'नितीन एम्पोरियम'चे संचालक गोपाल लड्ढा व त्यांचे पुत्र नितीन लड्ढा यांनी आपल्या दुकानातून 'स्टिकफास्ट' ट्युबची विक्री कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. काही तरुणांकडून या उत्पादनाचा नशेसाठी गैरवापर होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी हा सामाजिक निर्णय घेतला.
चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणामुळे भूजल पातळी घसरण्याची भीती व्यक्त करत मुखई परिसरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत.हक्काच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांनी जेजुरी-बेल्हा महामार्गावर रास्ता रोको करत प्रशासनाला इशारा दिला आहे.
विद्युत पोलचा शॉक लागल्याने सात वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय. नांदेड शहरातील हमेदिया कॉलनी मधील हे घटना घडली.आदिल पठाण असे या मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आह. आदिला सायंकाळी खेळण्यासाठी घराबाहेर पडला होता.
नवनीत राणा यांना राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवारी नाही
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी स्पष्ट करून सांगितले
सुनेत्रा पवार यांच्या नंतर रिक्त झालेल्या राज्यसभा जागेचा मुद्दा
नवनीत राणा राष्ट्रवादी काँग्रेस कडून राज्यसभेवरती जाणार अशी होती चर्चा
नवनीत राणा हा विषय राष्ट्रवादी कडून संपलेला आहे
'संडे ऑन सायकल' उपक्रमातून फिटनेसचा संदेश...
बुलढाणा पोलिसांचा जागतिक सायकल दिनानिमित्त पुढाकार
राज्यभर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळासाठी आज मतदान
तब्बल नऊ वर्षानंतर होत असलेल्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष
राज्यभरातील 3 हजार 403 पात्र सभासद मतदानाचा हक्क बजावणार
17 जागांपैकी तीन जागा बिनविरोध झालेले आहेत
समर्थ पॅनल विरुद्ध चित्रकार मी पॅनल अशी निवडणूक होते
शक्ती पीठ मार्गाला सोलापूर जिल्ह्यात मोठा विरोध वाढू लागला आहे.
आज पंढरपूर तालुक्यातील करकंब येथे गाव बंद ठेवून विरोध केला.
येथील शेतकऱ्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करत रोष व्यक्त केला.
येथील बाजारपेठ बंद ठेवल्याने गावातील व्यवहार ठप्प झाले.
परवा सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसाने सांगलीच्या वाळवा तालुक्यातील वारणा पट्ट्यातील ऊस व भाजीपाला शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. मुसळधार पाऊस, सुसाट्याचा वारा आणि विजांच्या गडगडाटासह आलेल्या पावसाने ऊस पिके अक्षरशः भुईसपाट झाली असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
कांद्याला दर मिळत नसल्याने शेतकरी अक्षरशः हतबल झाले आहेत. उत्पादन खर्चही पदरी येत नाही, त्यात माल कुठे आणि कसा साठवायचा हा प्रश्न डोळ्यासमोर असल्याने, आहे त्या परिस्थितीत कांदा टाकून देण्याचा पर्याय शेतकरी निवडत आहेत. कष्टाने पिकविलेले पीक मातीमोल झाल्याने मेंढ्यांना चारा म्हणून देण्याची वेळ आली आहे.
कांद्याचा प्रश्न आणि चाऱ्याची टंचाई अशा दुहेरी संकटांना शेतकऱ्यांना सध्या सामोरे जावे लागत आहे. उंडवडी सुपे परिसरात मेंढपाळाने ७०० मेंढ्यांच्या पोटासाठी चक्क ट्रकभर कांदा खाऊ घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मान्सूनचा फटका! सोलापूर-गोवा, सोलापूर-हैदराबाद विमानसेवा ऑगस्टपर्यंत बंद
फ्लाय 91 कंपनीचा मोठा निर्णय; 19 जूनपासून तिकीट विक्री बंद
पावसाळ्यात कमी दृश्यमानता आणि नाइट लँडिंग सुविधेचा अभाव कारणीभूत
सोलापूर-गोवा व सोलापूर-हैदराबाद विमानसेवा किमान 2 ते 3 महिने स्थगित
इंदापूर तालुक्यातील म्हसोबाचीवाडी येथे अज्ञात चोरट्यांनी एका घरात घरफोडी करून तब्बल 44 लाख 90 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे... याप्रकरणी भगवान नांदगुडे यांनी भिगवण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. चोरट्यांनी घराच्या बेडरूमची लोखंडी ग्रील तोडून घरात प्रवेश केला.... त्यानंतर घरातील कपाटे, फ्रीज आणि सुटकेसमधील सोन्याचे दागिने चांदीच्या वस्तू तसेच 1 लाख 90 हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली... चोरीला गेलेल्या ऐवजात सुमारे 27 तोळे सोन्याचे दागिने आणि एक किलो चांदीच्या वस्तूंचा समावेश आहे
पालघर शहरातील गणेश कुंड परिसरात रविवारी रात्री भीषण रस्ते अपघात घडला. या अपघातात २२ वर्षीय सानिया हिचा कंटेनरखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला.सानिया ही तरुणी दुचाकीवरून जात असताना भरधाव कंटेनरच्या धडकेत गंभीर जखमी झाली. अपघात इतका भीषण होता की कंटेनरखाली चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून अपघाताचे नेमके कारण आणि कंटेनर चालकाची जबाबदारी याबाबत पोलीस तपास सुरू आहे.या घटनेमुळे गणेश कुंड परिसरात शोककळा पसरली असून अवजड वाहनांच्या वाढत्या वेगामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी माजी खासदार नवनीत राणा यांनी मुंबईत 'देवगिरी' निवासस्थानी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची भेट घेतली, ज्यामुळे त्यांच्या उमेदवारीच्या चर्चांना उधाण आले आहे.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वाचवण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न केले म्हणून मोहिते आणि दिलीप सोपल मला टारगेट करण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप विधान परिषदेचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी केला.
शेतकर्यांची बॅंक वाचली पाहिजे यासाठी मी प्रयत्न केला. अनेक संचालकांनी कर्ज घेतले आणि फेडले सुध्दा. पण काही लोकांनी चुकीच्या पद्धतीने कारभार केला. सहकार चळवळ टिकली पाहिजे या भूमिकेतून मी कोर्ट कचेर्या केल्या त्यामुळे बॅंक टिकून असल्याचा दावा ही राऊत यांनी केला आहे.
ब्रेन स्ट्रोक आलेल्या रुग्ण पतीला पत्नीची पाठीवर बसून उपचारासाठी धावपळ. अकोला जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील संताप जनक प्रकार. ब्रेन स्ट्रोकमुळे आजारी असलेल्या पतीला पत्नीने पाठीवर घेत उपचारार्थ धावपळ करत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वायरल होतोय.
पुण्याच्या भोर तालुक्यातील निगडे धांगवडी गावाच्या परिसरात काल संध्याकाळच्या सुमारास ढगफुटी सदृश पाऊस पडला
अचानक झालेल्या या तीव्र पावसामुळे ओढे-नाले तुडुंब भरून वाहू लागले होते..तर गावातील रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यान, रस्त्यांनाही नदीचे स्वरूप आले होते..
घरगुती गॅस वापरणाऱ्या कोट्यवधी ग्राहकांना महागाईचा आणखी एक फटका बसला आहे. १४.२ किलोच्या एलपीजी सिलेंडरच्या दरात आजपासून २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात २९ रुपयांची वाढ लागू केली आहे. या वाढीनंतर मुंबईत १४.२ किलोचा सिलेंडर सुमारे ९४१ रुपयांवर पोहोचला आहे. वाढीव दर आजपासून लागू झाले असून सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर त्याचा परिणाम होणार आहे.
खडकवासला धरण प्रकल्पातील पाणी साठा कमी होत असताना पुणेकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार आहे. यासंदर्भातील अंतिम निर्णय पक्षनेत्यांच्या बैठकीत होणार असून, ही बैठक उद्या किंवा परवा होण्याची शक्यता आहे.
यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत एलनिनो वादळाचा प्रभाव असणार आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण हे सरासरीच्या ९० टक्के इतकचे असणार असून, हे पावसाचे प्रमाण सामान्यापेक्षा कमी आहे. पुरेसा पाऊस नसल्याने पाण्याची तिव्र टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
पुरवणी परीक्षा 16 जून पासून सुरु होणार असून दहावीची 30 जून पर्यंत तर बारावीचे आठ जुलै पर्यंत चालणार आहे
शाळा महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांनी हॉल तिकीट घेण्याचे आवहान बोर्डाकडून करण्यात आला आहे
सर्व महाविद्यालयाने ऑनलाईन प्रिंट करून विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र द्यायचे आहेत.
यासाठी कुठलेही शुल्क आकारू नये असं बोर्डाने म्हटल आहे
सांगलीच्या मिरजेत भरदिवसा एका मद्यधुंद सुमोचालकाचा शंभर फुटी रोडवर थरार पाहायला मिळाला, एका चार चाकीला जोराची धडक देत थेट महापालिकेच्या सुशोभित कारंजालाच उडवलं नुकसान केले आहे,यातील काही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.यावेळी सतर्क नागरिकांनी पाठलाग करत मध्यधुंद चालकाला पकडलं आहे.शुभम राजेंद्र गायकवाड असे चालकाचे नावं आहे,हा मद्यधुंद अवस्थेत टाटा सुमो घेऊन भरधाव वेगाने सुसाट निघाला होता.नशेच्या धुंदीत असलेल्या या चालकाने सुरेश लक्ष्मण नांदरेकर यांच्या चार चाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. एवढ्यावरच न थांबता सुमो थेट चौकातील महापालिकेच्या सुशोभित कारंजावर आदळली. या धडकेत चार चाकी व कारंज्याचे मोठे नुकसान झाले.
अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने 'ऑपरेशन प्रहार अंतर्गत मोठी कारवाई केलीय. 2 देशी बनवाट पिस्टल आणि दोन जिवंत काडतूसे जप्त केलीये. दरम्यान, अकोला शहरात जबरी चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध घेत असताना ही कारवाई केलीय. या प्रकरणात अतिश सूर्यवंशी, अभिषेक डोंगरे आणि सूरज सोनटक्के या तिघांना अटक केली. हे तिघे लुटमारी करण्यासाठी बंदुकीचा वापर करत होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.