Maharashtra Live News Update : Saam Marathi
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: नाशिक- मुंबई महामार्गावरील उड्डाण पुलावर कारला भीषण अपघात

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: विदर्भासह महाराष्ट्रात उष्णतेची लाट, मुंबईसह कोकणात पावसाचा इशारा, विधान परिषदेच्या निवडणुका अपडेट, भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण, नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण, राज्यातील राजकीय घडामोडी यासह राज्यातील आणि देशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Priya More

Nashik: नाशिक- मुंबई महामार्गावरील उड्डाण पुलावर कारला भीषण अपघात 

नाशिक -

- नाशिकच्या इंदिरानगर परिसरात भीषण अपघात

- नाशिक मुंबई महामार्गावरील उड्डाण पुलावर अपघात

- दारूच्या बाटल्यांनी भरलेली कार अपघातग्रस्त, अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट

- गाडीत एवढ्या दारूच्या बाटल्या कोणाच्या आणि कशासाठी याचा शोध सुरू

- पोलिसांकडून गाडी मालकाचा तपास सुरू, स्थानिकांमध्ये खळबळ

Nashik: नाशिकच्या सातपूरच्या जाधव संकुल परिसरात दिवसाढवळ्या चैन स्नॅचिंग

नाशिक -

- नाशिकच्या सातपूरच्या जाधव संकुल परिसरात दिवसाढवळ्या चैन स्नॅचिंग

- सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास दुकानात शिरून महिलेची पोत लांबवली

- दुकानात वस्तू खरेदीच्या बहाण्याने आलेल्या चोरट्यांनी दुकानदार महिलेची पोत चोरून केला पोबारा

- चेंज स्नॅचिंग करतानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर

Washim: वाशिमध्ये शॉर्ट सर्किटमुळे विद्युत पोलवर आग

वाशिम -

वाशिममध्ये शॉर्ट सर्किटमुळे विद्युत पोलवर आग

खाली साचलेल्या कचऱ्यालाही आग लागली

वाशिम शहरातील पालेश्वर मंदिरासमोर मध्यरात्री घडली घटना

पोलवर जळणाऱ्या केबलमधून ठिणग्या आणि आगीचे गोळे खाली पडत होते

या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण होते

Nashik: शिंदेंच्या शिवसेनेच्या नाशिक संपर्कप्रमुखपदी उदय सामंत यांची नियुक्ती

नाशिक -

- शिंदेंच्या शिवसेनेच्या नाशिक संपर्कप्रमुखपदी उदय सामंत यांची नियुक्ती

- धुळे जिल्ह्याची जबाबदारी दादा भुसे यांच्याकडे

- आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीला वेग

- नाशिक जिल्ह्यातील १२ ग्रामीण विधानसभा मतदारसंघांवर विशेष लक्ष केंद्रित करणार

- ३० एप्रिलला उदय सामंत यांचा नाशिक दौरा, बैठकीची तयारी

- पक्षात फेरबदल आणि नवीन नियुक्त्यांची शक्यता

Amravati: 27 एप्रिलपासून अमरावती जिल्ह्यातील कृषी विक्रेत्यांनी दिला बेमुदत बंदचा इशारा

अमरावती -

27 एप्रिलपासून अमरावती जिल्ह्यातीलही कृषी विक्रेत्यांनी दिला बेमुदत बंदचा इशारा

खरीप हंगामाची पूर्वतयारी सुरू झाली असतानाच कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी येत्या 27 एप्रिलपासून बेमूदत बंदचा इशारा दिला आहे.

शासनाने या विक्रेत्यांच्या प्रलंबित मागण्या अद्यापही पूर्ण न केल्याने राज्यस्तरीय बंदचे आवाहन महाराष्ट्र फर्टीलायझर्स पेस्टीसाइड, सीडस् डीलर्स असोसिएशनने केले असून त्यास अमरावती जिल्हा कृषी निविष्ठा विक्रेता संघटनेने समर्थन देत सहभाग जाहीर केला आहे.

कंपन्यांकडून खतांचे लिंकिंग कृषिनिविष्ठा विक्रेत्यांवर करण्यात येत असून कंपन्यांकडून रासायनिक खतांचा पुरवठा होताना होणारे कंपनीस्तरावरील लिंकिंग बंद करणे.

Nashik: भोंदू अशोक खरात याला आज कोर्टात हजर करणार

नाशिक -

- भोंदू अशोक खरात याला आज कोर्टात हजर करणार

- महिला अत्याचाराच्या पाचव्या गुन्ह्यात काल अशोक खरातला सुनावण्यात आली होती न्यायालयीन कोठडी

- महिला अत्याचाराच्या सहाव्या गुन्ह्यात एसआयटीने पुन्हा घेतला अशोक खरातचा ताबा

- सहाव्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी आज पुन्हा कोर्टाकडे पोलीस कोठडीची मागणी केली जाणार

Nashik: अशोक खरातने उरणमध्ये ५८.५० लाखांत जमीन खरेदी, बाजारभाव ३ ते ४ कोटी असतानाही स्वस्तात व्यवहार

नाशिक -

- अशोक खरातच्या जमीन व्यवहारावर गंभीर प्रश्न

- उरणमधील चाणजे येथे ५८.५० लाखांत जमीन खरेदी

- बाजारभाव ३ ते ४ कोटी असतानाही स्वस्तात व्यवहार

- अटकेच्या दिवशीच म्हणजेच १७ मार्चला व्यवहाराची वर्दी नोटीस प्रसिद्ध

- कोठडीत असतानाही महिनाभरात १३ एप्रिलला फेरफार नोंद झाली मंजूर

- प्रस्तावित तिसऱ्या मुंबईवर होता अशोक खरातचा डोळा

Tulajapur: तुळजापुरातून धक्कादायक बातमी, पुरातत्व विभागाचे नियम डावलत तुळजाभवानी देवीची सहावी सिंहासन पूजा

धाराशिव -

तुळजापुरातून धक्कादायक बातमी, पुरातत्व विभागाचे नियम डावलत तुळजाभवानी देवीची सहावी सिंहासन पूजा

तुळजाभवानी देवीची सहावी सिंहासन पूजा घालणाऱ्या पुजाऱ्याला पाच वर्ष मंदिर प्रवेश बंदी

सुरक्षा निरीक्षक,सुरक्षारक्षक असताना प्रकार,सुरक्षा कंपनीला एक लाखाचा दंड,लेखी खुलासा ही मागितला

ऑनलाइन बुकिंग नसताना अधिकारी कर्मचाऱ्यांना मॅनेज करत सहावी सिंहासन पूजा घातल्याचा संशय

पुरातत्व विभागाच्या सूचनेनुसार दररोज सकाळी होतात पाचच सिंहासन पूजा, तर सायंकाळी दोन सिंहासन पूजा

देवीच्या मूर्तीची झीज होऊ नये म्हणून पुरातत्व विभागाच्या सूचनाचे केलं जातं पालन

Dharashiv: धाराशिवमध्ये  शिवराय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांवरून निर्माण झालेला वाद अखेर सामंजस्याने मिटला

धाराशिव -

धाराशिवच्या भूम शहरातील गोलाई चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांवरून निर्माण झालेला वाद अखेर सामंजस्याने मिटला

दोन्ही महापुरुषांच्या पुतळ्यांसाठी स्वतंत्र जागा निश्चित,शहरातील तणावाचे वातावरण निवळले

शिवप्रेमी आणि भीम अनुयायांनी सकारात्मक चर्चेतून प्रश्न सोडवला

पुतळे हलविताना पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता

Konkan: वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसाचा सावंतवाडीला फटका

सिंधुदुर्ग -

सिंधुदुर्गातील सावंतवाडीत काल रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली

सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह सावंतवाडी शहरात आणि ग्रामीण भागात मुसळधार पाऊस कोसळला

पावसाचा आणि वाऱ्याचा जोर इतका प्रचंड होता की संपूर्ण सावंतवाडी शहराची बत्ती गुल झाली होती

तर अनेक ठीकाणी झाडे मोडून रस्त्यावर पडली.

ही झाडे रस्त्यावरून हटविण्यात आली असून नागरीकांची मात्र गैरसोय झाली होती

दरम्यान अचानक बदललेल्या हवामानामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Buldhana: बुलडाण्यात रेती माफीयांचा हैदोस, तहसीलदारावर फिल्मी स्टाईल हल्ला

बुलडाणा -

बुलडाण्यात रेती माफीयांचा हैदोस

तहसीलदारावर तहसील कार्यालयात येऊन दालनात घुसून फिल्मी स्टाईल हल्ला.

नांदुरा तहसीलदार अजित जंगम यांच्यावर जीवघेना हल्ला, थोडक्यात बचावले.

जखमी तहसीलदार अजित जंगम यांच्यावर उपचार सुरु.

हल्लेखोरांचे बिना नंबरच्या क्रेटा गाडीतून फिल्मी स्टाईल पलायन.

Navi Mumbai: सागर नाईक यांनी भर सभेत महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांना सुनावले खडेबोल

नवी मुंबई -

सभागृह नेते सागर नाईक यांनी भर सभेत महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांना सुनावले खडेबोल

आयुक्तांनी जर प्रस्ताव शासनाकडे पाठवलाच नसता तर जे ६० वयोमर्यादा होती ती चालू राहिली असती,

फक्त आयुक्त ही सध्या महानगर पालिका नाही, आयुक्तांनी कुठल्या कुठल्या बाबतीत पत्रव्यवहार करायचं ते नमूद आहे -

अशा प्रकारे प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्याचा अधिकार आयुक्त या संस्थेला नव्हता, तरी देखील आपण मंजुरीसाठी पाठवला.. - सभागृह नेते

शासनाने सेवानिवृतीचा ठराव नामंजूर नाही, तर निलंबित केल आहे - सागर नाईक

सेवानिवृत्ती ठरावा वरून नवी मुंबई पालिकेच्या महासभेत सत्ताधारी व पालिका आयुक्त आमने सामने पाहायला मिळाले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SSC HSC Student: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; बोर्डाने घेतला मोठा निर्णय

Accident : हृदयद्रावक! काही दिवसांवर लग्न, पत्रिका वाटण्यासाठी जाताना भरधाव कारने चिरडले; नवरदेवासह दोघांचा मृत्यू

Ashok Kharat Case: अशोक खरातचं आणखी एक नवं कांड, उरणमध्ये ४ कोटींची जमीन फक्त ५८ लाखांत खरेदी

Ladki Bahin Yojana: या दिवशी लाडकीच्या खात्यात ₹३००० जमा होण्याची शक्यता; मार्च-एप्रिलच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

Weather Update : महाराष्ट्राला पाऊस झोडपणार, पुढील ३ तास महत्त्वाचे; कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट?

SCROLL FOR NEXT