क्रांतीज्योती बाल संगोपन योजनेअंतर्गत माहे एप्रिल 2025 अखेर जिल्ह्यातील एकूण 8 हजार 114 इतक्या लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती महिला व बालविकास अधिकारी रोहिणी ढवळे यांनी दिली आहे.
राज्यसभेचे खासदार माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी जाहीरपणे आज कबुली देत माझे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस मधील माझ्या सहकाऱ्यांसोबत चांगले संबंध असल्याच विधान अशोक चव्हाण यांनी केले.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात राजुरी परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे वातावरणात अचानक गारवा निर्माण झाला आहे
या बदलामुळे दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे
खरात बाबा हा श्रीमंत लोकांचा बाबा असून तो गरिबांचा बाबा नाही. गरीब लोक श्रद्धा पळतात अंधश्रद्धा पाळत नाहीत.मंत्रीपद मिळेल म्हणून काही नेत्यांनी खरंच मूत्रप्राशन केलं. हे लाजिरवाण असल्याचं म्हणत जरांगे पाटील यांनी खरात दरबारात हजेरी लावणाऱ्या राजकीय नेत्यांवर थेट हल्लाबोल चढवला.
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरातील वाटिका चौक परिसरात सायंकाळच्या सुमारास भीषण आग लागून सात दुकाने जळून खाक झाल्याची घटना घडली. या आगीत दोन गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग अधिक भडकली आणि मोठे नुकसान झाले.
मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथे अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावत ढगांच्या गडगडासह गारांचा जोरदार पाऊस झाला.
या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान होणार आहे.
दिवसभर ऊन आणि पाच वाजता गारांचा पाऊस पडला.
नागरिकांची एकच तारांबळ उडाली आणि पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले असून दैनंदिन कामकाजावरही परिणाम झाला
- नारा नदी पुलाखाली पोत्यात बांधलेला मृतदेह आढळला, नाल्याच्या कोरड्या भागात मृतदेह पोत्यात बांधून फेकल्यान परिसरात खळबळ
- सुनिल साहू असे मृत व्यक्तीचे नाव आहे..मृतक गेस्ट हाऊस व्यवसायिक होता. दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झाल्याची तक्रार सदर पोलिसांत असल्याचं समोर आले
- हत्या करून पोत्यात बांधून आणून टाकल्याने पोलीसांकडून तपास सुरू केला आहे..
- हत्या करण्यामागचे कारण अद्याप अस्पष्ट, विविध अँगलने चौकशी सुरू
- जरीपटका पोलिसांची घटनास्थळी पाहणी, पुरावे गोळा करण्याचे काम सुरू
- आरोपींचा शोध सुरू लवकरच उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे..
-
यवतमाळच्या मारेगाव शहरात भारतीय जनता पार्टी कडून धारकांच्या विविध मागणीसाठी रास्तारोको आंदोलन करून मोर्चा काढण्यात आला.मारेगाव शहरातील काही जागेवर व्यवसायासाठी अतिक्रमण करण्यात आले आहे. तसेच निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण करण्यात आले आहे. अतिक्रमण धारकांनी यापुर्वी अनेक निवेदन देऊन ही अतिक्रमीत जागा नियमानुकुलीत करण्याची मागणी केलेली होती. मात्र प्रशासनाने ठोस भुमिका घेतली नसल्यामुळे अतिक्रमण धारकांची समस्या प्रलंबित आहे.त्यामुळे प्रशासनाच्या विरोधात भाजप तालुकाच्या रास्ता रोको व मोर्चा काढण्यात आला.
कोल वॉशरीच्या प्रदूषणाने उध्वस्त झाली शेती
पांढरा कापूस झाला काळा
प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्याविरोधात पोलिसात तक्रार
अनुसूचित जाती आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याचा शासनाचा निर्णय सामाजिक न्याय व संविधानिक तत्त्वांना बाधक असल्याचा आरोप करत, तो तात्काळ रद्द करण्याची मागणी भीम आर्मीतर्फे करण्यात आली आहे, याबाबत प्रशासनास निवेदन देण्यात आले, त्याचबरोबर केंद्र व राज्य सरकारचा अनुसूचित जाती जमातींमध्ये वाद निर्माण करण्याचा हा कुटिल डाव असल्याचे म्हणत, या संदर्भात भीम आर्मीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करीत भाजप सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करत निषेध नोंदविला आहे,
आज दिनांक 22/04/2026 रोजी पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट
पुढील ३ तासांत अहिल्यानगर, धाराशिव, पुणे , सातारा या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता
तसेच ३०-४० किमी प्रति तास वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याची दाट शक्यता आहे.
कापडणे शिवारात शेतकऱ्यांमध्ये व महसूल कर्मचाऱ्यांमध्ये वाद
शेतकरी व कर्मचारी धावले एकमेकांच्या अंगावर
योग्य मोबदला मिळाल्याशिवाय जमिनीचा ताबा देण्यास शेतकऱ्यांचा नकार
बोरविहिर नरडाणा रेल्वे मार्गाच्या संपादित जमिनीचा वाद चांगलाच पेटला
कापडणे परिसरातील शेतकऱ्यांनी जमिनीचा ताबा देण्यास नकार दिल्याने रेल्वे अधिकारी व महसूल कर्मचाऱ्यांसोबत शेतकऱ्यांचा वाद
सोनगीर पोलिसांनी मध्यस्थी करत वाद मिटविण्याचा केला प्रयत्न
महिलेशी शारीरिक संबंध प्रस्थापित करत तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ पीडितेच्या घरातील लोकांना दाखवत व्हायरल करण्याची धमकी देत ६८ लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या गुलाम मोहिद्दीन रफिक परकाराच्या मुसक्या आवळण्यात खेड पोलिसांना यश आलंय. खेड पोलिसांनी त्याला मुंबईतून ताब्यात घेतलं. तो सौदी अरेबियात वास्तव्य करत होता.
संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील भोंदू राजेंद्र गडगे याच्या दत्तधाम आश्रमाची उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडून पुन्हा झाडाझडती घेण्यात आली. महत्वाचे पुरावे ताब्यात घेण्यासाठी पोलिस पुन्हा दत्तधाम आश्रमात पोहचले होते. राजेंद्र गडगे याला अटक झाल्यानंतर या प्रकरणात तपासाला वेग आलाय.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड समुद्रात मच्छिमारी करून बंदरात परतत असताना "अलमका" ही पर्ससीन नौका वादळी वाऱ्याच्या तडाख्यात सापडून समुद्रात बुडाली. या नौकेवर तांडेलासह सुमारे १५ ते २० खलाशी होते. वाऱ्याचा वाढलेला वेग आणि उंच लाटांमुळे नौकेचा तोल जाऊन ही दुर्घटना घडली. घटना मिठमुंबरी ते देवगड पवनक्कीसमोरील समुद्री पट्ट्यात घडल्याची माहिती मिळाली आहे.
शक्तीपीठ महामार्गामध्ये बाधित होणाऱ्या जमिनीमध्ये रातोरात आंब्याच्या बागा लावण्याचे काम सुरू झाले आहे. शेतकऱ्यांच्या बाधित शेतीचे करार करून त्यामध्ये आंब्याची झाडे लावली जात आहेत. यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींच्या एजंटांमार्फत आंब्याची लागवड केली जात असल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील शक्ती पीठ महामार्गाचे आरेखन बदलताच बाधित जमिनीत रातोरात आंब्याच्यासह इतर फळ झाडांची लागवड केली जात आहे. यातून सरकारची फसवणूक करून अधिक मोबदला घेण्यासाठी हा प्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे.
२००६ चं मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण
४ आरोपींना आरोपींना दिलासा
आरोपींवरील दोषारोप निश्चित करणारा आदेश रद्द
घरातील वीजमीटरमध्ये बिघाड असल्याचे सांगत कारवाईची भीती दाखवून एका महिलेकडून तब्बल ३ लाख १० हजार रुपये उकळल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी दोन खाजगी इलेक्ट्रिशियनविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.
जसजशा उन्हाच्या झळा वाढत आहेत आहेत तसतशी रायगडमधील पाणीटंचाईची स्थिती गंभीर होत चालली आहे. अवघ्या आठ दिवसात टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत कमालीची वाढ झाली असून 9 टँकर वाढवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. जिल्ह्यात सध्या 36 टँकरने 31 गावे आणि 131 वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीटंचाईमध्ये महाड आणि पेण हे दोन तालुके आघाडीवर आहेत. महाडमध्ये सात तर पेणमध्ये 12 टँकरनी ग्रामस्थांची तहान भागवली जात आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील जलजीवन योजनांची कामेदेखील ठप्प झाली आहेत. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पाणी टंचाईचे संकट अधिक गडद झाले आहे.
रोहित पवारांचे ट्विट
न्यायदेवतेवर आमचा पूर्ण विश्वास असल्याचं मी पहिल्यापासून सांगत होतो.. त्यानुसार अखेर घोटाळ्याच्या आरोपातून वगळत #ED च्या फेऱ्यातून मा. न्यायालयाने सुटका केली, याबाबत मा. नायालयाचे मनापासून आभार! सत्य परेशान हो सकता है, मगर पराभूत नहीं..’ हे पुन्हा एकदा सिद्ध झालं..! पण या प्रकरणात जो काही नाहक त्रास आणि मनस्ताप सहन करावा लागला, त्यावरून आता यापुढच्या पावलाबाबत एवढंच सांगायचंय, "घायल हूँ, इसलिए घातक हूँ"..!-
पिंपरी चिंचवड महापालिकेकडून थरमॅक्स चौक ते ठाणे चौक दरम्यान जोरदारा अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात येत आहे. थरमॅक्स चौक ते साने चौक कडे जाणाऱ्या रस्त्यावर व्यापाऱ्यांनी बेकायदेशीर केलेली अतिक्रमण महापालिकेकडून बुलडोझर चालवून जमीन दोस्त करण्यात येत आहे. थरमॅक्स चौका पासून साने चौक कडे जाणाऱ्या दोन्ही रस्त्याच्या बाजूला महापालिकेकडून अतिक्रमण विरोधात धडक कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईमुळे थरमॅक्स चौक ते साने चौक हा रस्ता आता मोकळा श्वास घेणार आहे.
बीड मधून मस्सा जोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी पार पडली या सुनामी दरम्यान आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले होते तर दोन्ही बाजूचे वकील न्यायालयात हजर होते मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरण साक्षी पुराव्याच्या स्टेज वरती असून या प्रकरणात पुढील सुनावणी आता 7 में रोजी होणार आहे.
नागपूर महानगर पालिकेची सर्वसाधारण सभा काही वेळासाठी स्थगित
-११ वाजताची वेळ असताना सर्व नगरसेवक न पोहोचल्याने सर्वसाधारण सभा काही काळ स्थगित झाली त्यानंतर पुन्हा सुरू झाली..
नागपूर महानगर पालिकेच्या सभेत केंद्र सरकारचा अभिनंदन ठराव
आखाती देशात सुरू असलेल्या युद्ध स्थितीत देखील देशात केंद्र सरकार ने इंधनाचे दर स्थिर ठेवल्याबद्दल मनपा कडून केंद्र सरकारचे अभिनंदन प्रस्ताव मांडण्यात आला..
शहरातील वेगवेगळ्या विषयांवर चर्चा सुरू..
काल मुंबईतून मोर्चा निघाला होता. यावेळी वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे एका तरुणीने रागाच्या भरात गिरीश महाजनांना खडेबोल सुनावले होते. त्यानंतर गिरीश महाजनांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मोर्चावर बाटली फेकणे योग्य नाही, असं त्यांनी मा्हटलं आहे,
मिरची घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग,ट्रक च्या आगीमुळे महामार्गावरील वाहतूक खोळंबली
नागपूर ते वर्धा महामार्गावरील चिंचभुवन परिसरातील घटना
ट्रक मध्ये शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज
ट्रक ला लागलेली आग काही वेळात विझवण्यात आली
मात्र ट्रक मधील मिरचीची पोती रस्त्यावर पसरल्याने काही वेळासाठी महामार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला होता
धाराशिव -
अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा पेरू बागेला फटका
धाराशिवमधील धारूर येथील अमोल शिंदे या शेतकऱ्याच नुकसान
कळी अवस्थेतील पेरूच्या बागेत पूर्ण झडती, गारपिटीने झोपलेला बागेत फळधारणा होणार नाही
कुटुंबासह दिवस-रात्र राबलेल्या बागेत काही क्षणात अतोनात नुकसान
नुकसानीच्या पंचनामे करून मदत मिळावी निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे हातबल शेतकऱ्याची मागणी
नांदेड -
हळदीला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक.
शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती मधील हळदीचे लिलाव पाडले बंद.
नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीची आवक वाढली. आवक वाढल्याने व्यापाऱ्याने हळदीचे भाव पाडले शेतकऱ्यांचा आरोप.
नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत हळद उत्पादक शेतकऱ्यांची लूट.
प्रति क्विंटल दोन ते तीन हजार रुपयांने भाव पाडल्याचा आरोप
हळदीला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी हळदीचे पाडले लिलाव बंद
धाराशिव -
धाराशिवमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत सेमी इंग्लिश शिक्षण पद्धती राबवली जाणार
जिल्हा परिषद शाळांकडून 1068 प्रस्ताव शिक्षण विभागाकडे जमा
जिल्हा परिषद शाळा कडून आलेल्या प्रस्तावाची छाननी सुरू, आज सर्वसाधारण सभेत प्रस्ताव मांडले जाणार
माजी आमदार संदीप नाईक यांना विधान परिषदेवर घ्या भाजप कार्यकर्त्यांची मागणी
विधान परिषदेच्या भाजपच्या वाटेला येणाऱ्या जागेपैकी माजी आमदार संदीप नाईक यांचा पुनर्वसन करा
भाजप कार्यकर्त्यांची मागणी मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे करणार आहेत
अमरावती -
ऑनलाईन क्रिकेट सट्ट्यावर गुन्हे शाखेची धाड, तिघे ताब्यात
अमरावती शहर गुन्हे शाखेने ऑनलाईन क्रिकेट सट्ट्यावर मोठी कारवाई करत चालक-मालकासह 3 इसमांना ताब्यात घेतले.
फ्रेजरपुरा हद्दीतील राजुरा येथे महेश पाटकर हा गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यावर मोबाईल अॅपद्वारे सट्टा चालवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने धाड टाकली.
टिटवाळा ड्रग्ज प्रकरणात आणखी एक अटक
अश्विनी पॉलचा लिव्ह इन पार्टनर आमीर सय्यदला अटक
काल रात्री पोलिसांनी केली अटक
आमीरला भेटल्यानंतर अश्विनी पॉल ड्रग्सच्या व्यवसायात
एकाच घरात लिव्ह इनमध्ये राहून करत होते ड्रग्सचा व्यवसाय
आमिर हा सराईत ड्रग्स तस्कर, अनेक गुन्हे असून जमिनावर बाहेर
आमीरनेच अश्विनीला दिली होती ही 5 हजार गोळ्यांची MDMA ची पाकिटं
अश्विनीच्या चौकशीतून आमीरचं नाव समोर
धाराशिव -
धाराशिवमध्ये अवकाळी पावसात शेतकऱ्यांच्या ज्वारी पिकाचे मोठं नुकसान
कष्टाने पिकलेली ज्वारीचं पिक मातीमोल
वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने आणि गारपीट झाल्याने ज्वारीचे पीक आडवे तर काढून टाकलेल्या ज्वारीचं देखील मोठं नुकसान
धाराशिव तालुक्यातील तुळजापूर बामणीवाडी आणि केशेगाव,धारुर शिवारात अवकाळी पावसाचा मोठा तडाखा
कोल्हापूर -
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून राष्ट्रवादी आणि भाजप मधील वाद टोकाला
गोकुळ निवडणुकीसाठी भाजप वगळून मित्र पक्षाच्या पॅनल साठी मुख्यमंत्र्यांची परवानगी घ्या
मंत्री हसन मुश्रीफ समर्थक गोकुळचे संचालक युवराज पाटील आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भैया माने यांची मुश्रीफ यांच्याकडे थेट मागणी
तर भाजप आणि शिवसेना सोडून राष्ट्रवादीचा आणखी कोणी छुपा मित्र आहे का?
भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांचा सवाल
गोकुळ वरून कोल्हापुरात महायुतीमध्ये वादाची ठिणगी
धाराशिव -
धाराशिवमध्ये वीज पडून 55 वर्षे शेतकऱ्याचा मृत्यू
विठ्ठलवाडी येथे शेतात कडब्याची गंज रचायला गेलेल्या बबन लांडगे या शेतकऱ्याचा वीज पडून दुर्दैवी मृत्यू
पुढील आठवड्यात होते बबन लांडगे यांच्या एकुलत्या एक मुलीचे लग्न, कुटुंबावर दुःखाचा डोंगर
धाराशिव मध्ये विजांच्या कडकडाट्यासह गारांचा जोरदार पाऊस
अमरावती -
परतवाडा लैंगिक शोषण व मुलींचे व्हिडिओ व्हायरल प्रकरण
बयान अहमदसह चार आरोपींना सात दिवसाची पोलीस कोठडी
27 एप्रिलपर्यंत सर्व आरोपी राहणार पोलीस कोठडीत.
अयान ने रिल बनवण्यासाठी वापरलेली थार गाडी व नोटांचे बंडल, आयफोन रिवाल्वर याची चौकशी करणे गरजेचे असल्याचे पोलिसांचे मत.
मुलींचे फोटो व व्हिडिओ व्हायरल करून त्यातून आरोपींनी पैसा कमावला का?
आठ आरोपींचे 11 खात्यांचे बँक स्टेटमेंट पोलिसां जवळ,
या बँक खात्यामध्ये आलेल्या पैशाची कसून चौकशी करणे.
आरोपींच्या मोबाईल मधील रिकव्हर झालेला व फॉरेन्सिक लॅब मधून तपासणी करून आलेला डाटा आरोपींच्या समक्ष तपासणे.
नाशिक -
- TCS प्रकरणातील ६ आरोपींचा जामिनासाठी अर्ज, जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल
- 2 तारखेला होणार जामीन अर्जावर सुनावणी
- यापूर्वी संशयित निदा खान कडून देखील करण्यात आला होता अटकपूर्व जामिनासाठी अर्ज
- मात्र न्यायालयाने सुनावणी 27 तारखेपर्यत पुढे ढकलली
- आता अटकेत असलेल्या 6 संशयित आरोपींकडून देखील जामिनीसाठी अर्ज दाखल
- दानिश शेख, आसिफ अन्सारी,तौसिफ अत्तार,शाहरुख कुरेशी, रजा मेमन आणि शफी शेख या संशयित आरोपींकडून जामिनासाठी अर्ज
- 2 तारखेला होणाऱ्या सुनावणीत कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
नाशिक -
- SIT चौकशी दरम्यान भोंदू अशोक खरातची प्रकृती बिघडल्याची माहिती.
- तातडीने कार्डियाक ॲम्बुलन्स मागवून करण्यात आली भोंदू अशोक खरातच्या प्रकृतीची तपासणी
- खरातला डोकेदुखी , मळमळ व उलटीचा त्रास होत असल्याची माहिती
- छातीत दुखत असल्याने काही काळ लावण्यात आला होता ऑक्सिजन
- दोन दिवसांपूर्वी भोंदू अशोक खरात यांच्या वकिलांनी न्यायालयात खरातला न्यूरोसर्जन कडे घेऊन जाण्याची केली होती मागणी
नेरूळमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
नेरूळमधील वूडलँड सोसायटीमध्ये एक धक्कादायक घटना घडली.
इमारतीच्या पाचव्या मजल्याचा स्लॅब थेट चौथ्या मजल्यावर कोसळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
ज्या घरात स्लॅब कोसळला, त्या घरातील सदस्य किचनमध्ये असल्याने सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही.
अग्निशमन दलाने तातडीने धाव घेत नागरिकांना सुखरूप बाहेर काढले आहे.
रहिवाशांची तात्पुरती व्यवस्था कुकशेत येथील मार्केटमध्ये करण्यात आली
सुरक्षिततेच्या कारणास्तव ही इमारत सील करण्यात येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.