बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्राचार्याच्या तोफा उद्या थंडावत आहेत.
उद्या दुपारी दोन वाजता बारामती शहरातील शारदा प्रांगण मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत प्रचाराची सांगता सभा पार पाडणार आहे.
खासदार पार्थ पवार यांनी शारदा प्रांगण मध्ये या सांगता सभेसाठी उभारल्या जाणाऱ्या मंडपाची पाहणी केली आहे.
नालासोपारा पूर्वेतील वलई पाडा येथील संतोषी माता मंदिराजवळ आज दुपारच्या सुमारास ची ही घटना आहे.
या अपघातात कारमधील दोन जण जखमी झाले आहेत.
या घटनेची माहिती मिळताच वसई-विरार महानगर रपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेवून, दोघांना सुखरूप बाहेर काडण्यात यश मिळविले आहे
दुर्दैवाने भाजपाला त्यांच्या मनासारखं करून घेण्यात यश आलं.. मुळात भाजपला महिलांना आरक्षण द्यायचं नव्हतं, असा आरोप सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी केला आहे.. तर येणारया 2019 च्या निवडणुकीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये महिला आरक्षण विधेयक भाजपाला आणायचं नाही..हे अधिवेशनात स्पष्ट झालं होतं.. शिवाय भाजपाला जातीय जनगणना देखील करायची नाही, कुठला तर विषय घेऊन ते पुढे ढकलायचा आहे.. महिला आरक्षणाच्या नावाखाली भाजपाला केवळ राजकारण करायचं आहे..असा आरोप देखील विशाल पाटील यांनी केला आहे. त्याचबरोबर संसदेत विधेयक ना मंजूर झाल्यानंतर काही क्षणातच भाजपाच्या खासदारांकडून आमच्या विरोधातले फ्लेक्स झळकवण्यात आले, ते इतक्या तातडीने कसे उपलब्ध झाले ? असा सवाल देखील खासदार विशाल पाटलांनी उपस्थित केला, ते सांगलीमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या बैठकीवेळी एसी मधून पाण्याची गळती
एसी मधील पाणी थेट अधिकाऱ्यांच्या टेबलावर
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील मीटिंग हॉलमधील प्रकार
पाणी गळतीमुळे एसी बंद ठेवण्याची वेळ
नूतनीकरण केलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील मीटिंग हॉलच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
भारताचे पहिले ऑलम्पिकवीर खाशाबा जाधव यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळण्याची प्रतिक्षा अखेर संपली म्हणावी लागेल. पैलवान खाशाबा जाधव यांनी 1952 मध्ये हेलसिंकी येथे कुस्तीत पदक मिळवले होते. तेव्हा केंद्र सरकारने 4 मे पूर्वी निर्णय घेण्याचे निर्देश कोल्हापूर सर्किट बेंचने दिले आहेत. तब्बल 74 वर्षांनी मरणोत्तर पद्मविभूषण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नोव्हेंबर 2025 मध्ये कुस्तीवीर खाशाबा जाधव फाऊंडेशन याचिका दाखल केली होती. या मागणीला यश आले.
भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आज स्वतः पोलिस ठाण्यात जात प्रदूषण नियंत्रण विभागाचे प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. ही तक्रार चंद्रपूर शहरातील रामनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, यावेळी पीडित शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती होती.
भंडारा जिल्ह्यात सूर्यानं आग ओकायला सुरुवात केली असून जिल्ह्याचा पारा आता ४३ अंशांवर पोहोचला आहे. गेल्या पाच दिवसांपासून तापमानाचा हाच कल कायम असल्यानं भंडारावासीय उन्हाच्या तडाख्यानं पुरते हैराण झाले आहेत. हवामान विभागानं पुढील काही दिवस उष्णतेची हीच लाट कायम राहण्याची शक्यता वर्तवली असून, प्रशासनानं नागरिकांना दुपारी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील पिंपळकुंठा परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. वसूर तांड्याजवळ लागलेल्या या आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. यात जनावरांचा चारा आणि शेतीसाठी लागणारे साहित्य जळून खाक झाले. ग्रामस्थांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले, मात्र अधिकाऱ्यांकडून वेळेवर प्रतिसाद न मिळाल्याची तक्रार करण्यात आली.
अमरावतीच्या परतवाडा मधील तरुणींचे लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ केल्याच प्रकरण...
परतवाडा पोलीस स्टेशन मध्ये पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, पोलीस अधीक्षक विशाल आनंद दाखल...
उद्या सर्व आरोपींची पोलीस कोठडी संपणार त्याच्या पूर्व संधेला अधिकाऱ्यांमध्ये महत्त्वाची चर्चा...
पोलीस महानिरीक्षकांकडून घेतली जात आहे प्रकरणाच्या तपासाची माहिती...
बैठकीला एसटी प्रमुख शुभम कुमारही उपस्थित..
- TCS प्रकरणातील रजा मेमन आणि शफी शेख यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
- धर्मांतर प्रकरणातील दोघा संशयितांना आज न्यायालयात करण्यात आले होते हजर
- पोलिस कोठडी संपल्यानंतर आज न्यायालयात पार पडली सुनावणी
- दोघा संशयितांना आजपासून पुढील १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
- पुन्हा पुढील गुन्ह्या संदर्भात त्यांचा ताबा घेण्यासाठी अर्ज करणार दाखल
- १६६/२६ गुन्ह्यात ट्रान्स्फर करून उद्या कोर्टात हजर करणार
धाराशिव जिल्ह्यात वाढत्या लोडशेडिंगमुळे शेतकरी त्रस्त झाले असून पिकं उन्हात करपू लागली आहेत. याविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक झाली आहे. आठ दिवसांत सुरळीत वीज पुरवठा न झाल्यास महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन कंपनी लिमिटेड अधिकाऱ्यांना काम करू देणार नाही, असा इशारा देण्यात आला. वर्षा बंगल्यासह मलबार हिलमध्येही लोडशेडिंग करा, अन्यथा शेतकऱ्यांना वीज द्या, अशी मागणी करत कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली.
वाशिम शहरातील अकोला नाका ते राजाकिन्ही हा मुख्य रस्ता धोक्याचा ठरतोय.. नाली बांधकामामुळे रस्ता अरुंद झाला असून, रस्त्यावर टाकलेली माती आणि दगड अपघातांना कारणीभूत ठरत आहेत. महाविद्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, न्यायालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालय या मार्गावर असल्याने दिवसभर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. कोणतेही बॅरिकेड्स किंवा सूचना फलक नसल्याने रात्रीचा धोका वाढला आहे..प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी सर्वसामान्यांमधून होत आहे...
मालेगाव महापालिकेच्या महासभा सभागृहात माध्यम प्रतिनिधींना त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. पत्रकारांच्या जागांवर इतरांना बसवणे, माईक बंद ठेवणे तसेच छोट्या हॉलमधील फॅनही बंद ठेवल्याची तक्रार करण्यात आली. हा प्रकार जाणीवपूर्वक केल्याचा आरोप पत्रकारांनी केला आहे. सभागृहातील वाद बाहेर जाऊ नयेत, यासाठीच हा प्रयत्न असल्याचेही सांगण्यात आले. या निषेधार्थ सर्व माध्यम प्रतिनिधींनी महापालिकेत ठिय्या आंदोलन सुरू केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 जयंती 14 एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात आणि जगामध्ये पार पडली. याच 135 व्या जयंती उत्सवानिमित्त माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मूळ गावी नाथा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे धनंजय मुंडे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. त्यावेळी सर्व जाती धर्मातील लोक या कार्यक्रमाला मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. जो सामाजिक न्याय विभाग विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केला. त्या विभागाचं मला मंत्री होता आलं. हेच बाबासाहेबांचं आणि आपलं नातं आहे, असं मत माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.
नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीची आवक वाढली.
हळदीची आवक वाढल्याने व्यापाऱ्याने हळदीचे भाव पाडले.
16 ते 17 हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळणे अपेक्षित असताना केवळ 12 हजार रुपये प्रतिक्विंटल ने केली जात आहे हळदीची खरेदी.
हळदीचे भाव पाडल्याने शेतकऱ्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक.
योग्य दर न दिल्यास उद्यापासून कृषी उत्पन्न बाजार समिती आणि हळदीचा लिलाव बंद करण्याचा दिला इशारा.
नवीन करप्रणाली लागू करण्यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये शाब्दिक बचाबाची झाली.सोलापूर महापालिकेतील शिवसेना नगरसेवक अमोल शिंदे आणि काँग्रेस नगरसेवक चेतन नरोटे यांचे निलंबन करण्यात आले.
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभेत आदित्य ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. या वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने नंदुरबारमध्ये आक्रमक आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त शिवसैनिकांनी निशिकांत दुबे यांच्या प्रतिमेला जोडे मारून जोरदार घोषणाबाजी केली. वैयक्तिक पातळीवर आक्षेपार्ह टीका करणे अयोग्य असून, अशा प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो,असे जिल्हाप्रमुख पंडित माळी यांनी सांगितले. या आंदोलनात जिल्हाप्रमुख पंडित माळी, तालुका प्रमुख रमेश पाटील, आणि शहर समन्वयक अक्षय श्रीखंडे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते. भविष्यात अशी वक्तव्ये खपवून घेणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
भेंडवळ, कुंडली व पारंपरिक ज्योतिषशास्त्राच्या अचूकतेवर प्रश्न उपस्थित करत अंध श्रद्धा निर्मूलन चे अध्यक्ष शाम मानव यांनी खुले आव्हान दिले आहे. “१० कुंडल्या आणि सध्याची माहिती देऊ, त्यापैकी ९० टक्क्यांपेक्षा जास्त भविष्यवाणी अचूक ठरवून दाखवा,” असे आवाहन करण्यात आले असून, ते सिद्ध झाल्यास तब्बल ८० लाखांचे बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली आहे. शाम मानव यांनी पुढे सांगितले की, आजच्या काळात हवामान अंदाजासारख्या गोष्टी विज्ञान व अभ्यासावर आधारित असून त्या पडताळून पाहता येतात. मात्र भेंडवळ किंवा ज्योतिषाच्या दाव्यांना तितकी शास्त्रीय पडताळणी नसल्याचा आरोप त्यांनी केला. पूर्वी शेतकरी अनुभवावर निर्णय घेत होते, परंतु आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे परिस्थिती बदलल्याचेही त्यांनी नमूद केले.
पिंपरी चिंचवड शहरातील रेडकिल्फ स्कूल विरोधात विद्यार्थी आणि पालक चांगलेच आक्रमक झाले आहेत. रेडकिल्फ स्कूल विद्यार्थी आणि पालकाच्या छळा विरोधात आज विद्यार्थी आणि पालकांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या दारावर ठिय्या आंदोलन केला आहे.
शेतकऱ्यांनी दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे काटेकोरपणे नियोजन करावे, असे आव्हान पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले आहे.
उजनी व वीर धरणात सध्या तरी पाणीसाठा मुबलक आहे, तरीही यावर्षी दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होईल, असा अंदाज आहे.
नंदुरबार -
नंदूरबार जिल्ह्यात उष्णतेचा वाढता तडाखामुळे धरणांतील पाणीसाठा झपाट्याने घट
20 पेक्षा अधिक प्रकल्प प्रकल्प तळ गाठण्याच्या मार्गावर असल्याने जिल्ह्यात पाणीटंचाईची चिन्हे
शहादा-नंदुरबार तालुक्यात परिस्थिती अधिक
रत्नागिरी -
हापूस आंब्यात होतेय मोठ्या प्रमाणात भेसळ
हापूसच्या नावावर खपवला जातोय कर्नाटकी आंबा
ग्राहकांची होतेय मोठ्या प्रमाणात फसवणूक
नेमका हापूस आंबा कसा ओळखावा
हापूसची गोडी ग्राहकांना मिळावी यासाठी हापूस आंबा खरेदी करताना नेमकी कोणती काळजी घ्याल
अमरावती -
अमरावतीच्या परतवाडा मधील तरुणांची लैंगिक शोषण आणि असलेली व्हिडिओ व्हायरल केल्याचे प्रकरण
या प्रकरणातील दुसरा आरोपी हुजेर खान याच्यावर आता दुसरा गुन्हा दाखल
एका पीडित तरुणीच्या आईने पोलिसात तक्रार देऊन केला गुन्हा दाखल
आरोपी उजेर खान याला तरूणीच्या आईवडीलांनी समजून सांगितल्या नंतरही आरोपी पीडित तरुणीला वारंवार फोन करत त्रास देत असल्याच समोर
यवतमाळ -
राळेगाव गंभीर घटनेच्या निषेधार्थ राळेगांव बंदची हाक देण्यात आली होती.
मंत्री अशोक उईक यांच्या सोबत जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या सोबत बैठक झाली.
त्यामध्ये पोलीस विभाग पूर्ण ताकदीने तपास करित असून सर्व कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊ नये.
पोलिसांना सहकार्य करण्याचे आव्हान भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल चव्हाण यांनी केले.
कोल्हापूर -
कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा इथं जुन्या घराची भिंत कोसळली
जुन्या घराची भिंत कोसळल्याने एक महिला प्राध्यापिका आणि दोन शाळकरी मुली गंभीर जखमी
भिंतीच्या ढिगार्यात आणखी कोणी सापडले का याचा पोलिसांकडून शोध सुरू
नाशिक -
- TCS प्रकरणातील फरार निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावर थोड्याच वेळात सुनावणी
- नाशिकरोड न्यायालयातील न्यायमूर्ती के जी जोशी यांच्यासमोर सुनावणी
- टीसीएस धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणातील निदा खान आरोपी
- निदा खानवर धार्मिक भावना दुखावण्यासह धर्मांतराच्या प्रयत्नात मदतीचा आरोप
- गरोदरपणाचे कारण देत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल
खोपोली नगर पालिकेच्या डांपिंग ग्राऊंडला एकाच महिन्यात तिसऱ्यांदा आग लागल्याची घटना घडली आहे.
खोपोली शहरानजीक मिळगाव येथे हे डंपिंग ग्राऊंड आहे. खोपोली नगर पालिका आणि खालापूर तालुक्यातील फायरब्रिगेडच्या पथकांनी आगीवार नियंत्रण आणले.
या वेळी खोपोली पोलीस आणि हेल्प फॉउंडेशनच्या टीमने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महत्वपूर्ण मदत केली.
सातारा -
साताऱ्यात होणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेचे निमंत्रण मला नाही त्यामुळे मी या कार्यक्रमाला येणार नाही
पालकमंत्री शंभूराजे देसाई हे मला पहिल्यापासून वेगळी वागणूक देतात... कोणत्याही कार्यक्रमांना मला बोलावलं जात नाही
कोरेगाव मध्ये शिवसेना आणि भाजपची युती होती
2019 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मला शिवसेनेच्या चिन्हावर लढायला सांगितले त्यामुळे मी शिवसेनेतून लढलो...
माझ्या ताकदीवर निवडून येतो...
नाशिक -
- भोंदू अशोक खरातच्या एसआयटी चौकशीला सुरुवात
- आजच्या तपासात पुन्हा काही मेडिकल स्टोअर धारकांची चौकशी होणार असल्याची माहिती
- अशोक खरातला पुन्हा काल पाचव्या गुन्ह्यात पाच दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली
- अशोक खरातने पीडितेला खाऊ घातलेल्या मिठाईत कोणते गुंगीधारक पदार्थ मिसळले होते, याचा तपास केला जाणार
- दैवीशक्तीच्या नावाखाली अशोक खरातकडून अनेक गैरकृत्य केल्याचा संशय असल्याने आज तपास केला जाणार
- महिलांना गुंगीकारक औषध देण्यासाठी काही मेडिकल स्टोअर चालक खरातला मदत करत असल्याची एसआयटीला माहिती
बदलापूर पूर्वमध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीला गळती
ऐन उन्हाळ्यात पाण्याची टंचाई
बदलापूरच्या जीवन प्राधिकरणाचा भोंगळ कारभार
पुणे -
भोर तालुक्यातील राज्यस्तरीय स्काऊट-गाईड प्रशिक्षण केंद्रात विद्यार्थ्यांसाठी एक दिवशीय शिबिर आयोजित करण्यात आले.
यामध्ये ५५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत विविध उपक्रमांतून प्रशिक्षण घेतले.
दोरीच्या गाठी, प्रथमोपचार, आपत्ती व्यवस्थापन व स्काऊटचे नियम याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
निसर्गाच्या सानिध्यात खेळीमेळीच्या वातावरणात शिबिर पार पडले.
मध्य रेल्वेची वाहतूक अजूनही विस्कळीत
सकळी रेल्वे रुळावरून घसरलेली लोकल अजूनही जैसे थे
कोपर ते कल्याण डाऊन मार्गावर रेल्वे खंडीत
रेल्वे परत रुळावर आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न
रेल्वे रोड ला कसल्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल
मालवण येथील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवराजेश्वर मंदिरात मोठ्या उत्साहात पारंपारिक शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. शिवरायांच्या जयघोषात ढोल ताशांचा गजर व मर्दानी खेळ सादर करीत शिवरायांना मानवंदना देण्यात आली.
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे थोड्याच घेणार कार्यकर्त्यांची बैठक...
कार्यकर्त्यांशी चर्चा करून जाहीर करणार भूमिका...
राहुरी पोटनिवडणुकीसाठी प्राजक्त तनपुरे नेमकी कुणाला पाठींबा देणार? याकडे सर्वांची लक्ष...
मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद...
प्राजक्त तनपुरे यांची भूमिका अद्याप स्पष्ट नसल्याने कार्यकर्ते संभ्रमात...
दुसरीकडे आज सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप उमेदवार अक्षय कर्डीले यांच्या प्रचारार्थ सभा...
प्राजक्त तनपुरे हे मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार का? याकडे लक्ष...
राळेगाव शहरात हिंदुत्ववादी संघटने कडून जोरदार घोषणाबाजी,जय श्रीरामच्या घोषणा,भाजप,बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद कडून राळेगाव बंची हाक
राळेगांव शहरातील क्रांती चौकात हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी आले एकत्र, घटनेतील सर्व आरोपींवर कडक कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जाते.
पनवेल रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक सात वरील लिफ्ट कोसळली
चार प्रवाशी अडकले
प्रवाशांना काढण्याचे काम सुरू
रेल्वे प्लॅटफॉर्म वरील लिफ्ट मधील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
भाजप शिक्षक आघाडी आणि शिक्षक महासंघाचे अध्यक्ष चंद्रशेखर भोयर यांच्या वतीने अमरावतीच्या संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात शिक्षक मेळावा सत्कार समारोह आणि अनाथ विद्यार्थ्यांना सायकल भेट समारोह पार पडला, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला, यावेळी अनाथ विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयात जाण्यासाठी सायकल भेट देण्यात आल्या, यावेळी शिक्षकांच्या विविध मागण्या आयोजक चंद्रशेखर भोयर यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर मांडल्या..... तर विरंगुळा म्हणून हास्य कलाकार सुनील पाल यांनी शिक्षकांना हसवून सोडलं
उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे जिल्ह्यातील जलसाठ्यांवर परिणाम..
जलाशयांमधील पाण्याची बाष्पीभवनाने होतेय वाफ..
जिल्ह्यातील 46 लघु प्रकल्पांमध्ये सध्या 36.94 टक्के पाणीसाठा..
गेल्यावर्षी याच कालावधीपर्यंत या लघु प्रकल्पांमध्ये 41.52 टक्के इतका होता उपयुक्त पाण्याचा साठा होता.
तर 3 मध्यम प्रकल्पांमध्ये 37 टक्के पाणीसाठा..
शीळ धरणामध्ये 41.47% पाणीसाठा
वाढत्या तापमानामुळे जलाशयांच्या पृष्ठभागावरून पाण्याचं बाष्पीभवन होण्याचं प्रमाण वाढलं
अनेक ठिकाणी दररोज जेवढा पाण्याचा उपसा शहर किंवा ग्रामीण भागासाठी केला जातो, जवळपास तेवढंच पाणी वाफेच्या स्वरूपात उडून जात आहे
वाढतं तापमान पाहता अधिक घट होण्याची शक्यता
अमरावतीच्या परतवाडा मधील तरुणींचे लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याचा प्रकरण...
आरोपी अयान अहमदला केलेल्या कृत्याचा पश्चातापही नाही; केलेल्या कृत्याची त्याने अजूनही खंत बोलून दाखवली नाही.. पोलीस चौकशीत माहिती उघड..
आरोपी अयान एसआयटी चौकशीत सराईत गुन्हेगाराप्रमाणे वागत असल्याची सूत्रांची माहिती...
मुलींसोबत संवाद कसा साधायचा, त्यांना जाळ्यात कसं ओढायचं याची कबुली पोलिसांना त्यांने दिली आहे...
स्वतःच्या बचावासाठी अमरावतीच्या फ्लॅटवर जे कृत्य झालं ते दोघांच्याही संमतीने झाल्याचा केविलवाणा दावा आरोपी अयांन ने केला आहे..
मात्र पंधरा वर्षाची एक पिडीत समोर आल्याने त्याच्या दाव्याची पोल खोल झाली आहे..
TCS प्रकरणातील दोघा आरोपींना आज कोर्टात हजर करणार
शफी शेख आणि रझा मेमनला आज कोर्टात हजर करणार
दोघा आरोपींची पोलीस कोठडी आज संपत असल्यानं आज पुन्हा कोर्टात हजर करण्यात येणार
दोघांवर धार्मिक भावना दुखावणे, छळाचे गंभीर आरोप, विनयभंग प्रकरणातही दाखल आहेत गुन्हे
SIT सह ATS कडून देखील दोघांची चौकशी
आज दोघा आरोपींना पोलीस कोठडी मिळते की न्यायालयीन कोठडी? यावर पुढील तपासाची दिशा ठरणार
TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी
नाशिकरोड न्यायालयात होणार अटकपूर्व जामिनावर सुनावणी
गरोदर असल्याचं कारण देत निदा खानचा अटकपूर्व जामीनासाठी अर्ज
TCS प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर निदा खान फरार
TCS प्रकरणात आरोपींना मदत केल्याचा आणि पीडित महिला कर्मचाऱ्यांना विशिष्ट धर्माचं आचरण, राहणीमान आणि अन्य बाबींचं ट्रेनिंग दिल्याचा निदा खानवर आरोप
गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिसांचं पथक निदा खानच्या मागावर
मात्र फरार निदा खानचा ठावठिकाणा पोलिसांना मिळेना
आज निदा खानच्या अटकपूर्व जामिन अर्जावर काय निर्णय होतो? यावर तपासाची पुढील दिशा ठरणार
TCS कंपनीतील धर्मांतरण आणि महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण प्रकरण
तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याची माहिती
कॅन्सरग्रस्त पित्याच्या उपचारासाठी पीडित तरुणीने सोसला कॉर्पोरेट जिहाद, सूत्रांची माहिती
कॅन्सरग्रस्त वडिलांच्या किमोथेरेपीसाठी औषधं आणि पैशांची गरज असल्यानं पीडिता मानसिक छळ आणि अपमान सहन करत राहिली, सूत्रांची माहिती
तर दुसऱ्या पीडितेवर कुटुंबाची जबाबदारी असल्यानं नोकरीच्या नावाखाली धर्मांतराच्या छुप्या अजेंड्याला बळी पडल्याची सूत्रांची माहिती
आजारपणामुळे वडील अंथरुणाला खिळलेले, घरात अन्नाचा कण नाही, कुटुंबाच्या पोटाच्या भुकेसाठी पीडितीने सर्व सहन केले, सूत्रांची माहिती
राष्ट्रीय महिला आयोगाने देखील जाणून घेतली पीडितांची आपबिती
काल TCS कंपनीत जाऊन देखील पथकाने तब्बल दीड तास केली चौकशी
वाशिम जिल्ह्यात सूर्य मागील आठ दिवसांपासून आग ओकतोय..उन्हाचा पारा 44 अंश सेल्सिअस वर पोहोचलाय..त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असताना विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेत आज पासून जिल्ह्यातील सर्व शाळांची वेळ बदलण्यात आली असून, शाळा सकाळी ७ ते ११ या वेळेत भरविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून तापमान सातत्याने वाढत असल्यामुळे उष्णतेच्या लाटेचा धोका निर्माण झाला होता.विद्यार्थ्यांना उन्हाच्या झळा बसू नयेत आणि त्यांचे आरोग्य सुरक्षित राहावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे....
शहरातील खेळाडूसाठी हक्काची असलेले 38 क्रीडा संकुले कुलूप बंद महापालिकेच्या कारभारावर संताप
महापालिकेकडे शहरात एकूण 107 क्रीडा संकुल असून 69 कार्यरत आहेत तर 38 क्रीडा संकुले बंद आहेत
खेळाडू विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्या लागल्या असताना 38 क्रीडा संकुल बंद असल्याने नेमके विद्यार्थ्यांनी खेळायचे कुठे हा खरा प्रश्न आहे
भाडेकरार कालबाह्य झाल्याने 38 संकुल बंद महापालिकेच्या कारभाराचा विद्यार्थ्यांच्या खेळावर परिणाम
विद्युत वाहनांच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देण्यात येत असले तरी ग्राहकांची पसंती पेट्रोल डिझेलवर वाहनांनाच असल्याचे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर खरेदी झालेल्या वाहनांवरून स्पष्ट झाले आहे यंदा अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर केवळ 228 दुचाकी आणि 78 चार चाकी खरेदी करण्यात आले असून गेल्या वर्षी हाच आकडा 678 आणि 203 इतका होता पारंपरिक इंधनावरील दुचाकी खरेदी केल्या वर्षापेक्षा वाढ नोंदवण्यात आली आहे.
पुण्यात सुमारे चार लाख मिळकतींची नोंदणी नसल्याने दरवर्षी कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडत आहे. त्यावर उपाय म्हणून बांधकाम विभागासोबत मिळकतकर विभाग तांत्रिक दृष्ट्या जोडण्यात आला आहे बांधकाम विभागाकडून इमारतीचा पूर्णत्वाचा दाखला दिल्यानंतर त्याची ऑनलाईन माहिती मिळकतकर विभागाला मिळत आहे त्यानंतर तात्काळ प्रक्रिया पार पाडून कर आकारणी केली जात आहे गेल्या वर्षभरात याद्वारे 5786 मिळकतींची नोंदणी झाली असून याद्वारे 365 कोटी रुपयांची कर आकारणी झाल्याने कर बुडवेगिरीला चाप लागला आहे.
राज्यातील सरकारी, निमसरकारी तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात ‘राज्य सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती ने २१ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्याचा इशारा दिला आहे. यामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशन (संलग्न फेडरेशन) देखील सहभागी होणार असल्याने ससून रुग्णालयामधील परिचारिका संपावर जाणार आहेत.
रायगडच्या दक्षिण भागामध्ये आज सकाळी रिमझिम पाऊस बसरला. सौम्य आवाजात ढगांचा गडगडाट करीत या अवकाळी पावसाने हजेरी लावली. सुमारे तासभर पावसाचा शिडकाव झाला. प्रत्यक्ष पाऊस दिसला नसला तरी रस्ते ओले झाले, गाड्यांवर पावसाचे थेंब पडून गाड्या ओल्या झाल्या. उष्णतेच यलो अलर्ट हवामान खात्याने रायगडला दिला आहे. उष्णता वाढण्याची शक्यता असताना रिमझिम पावसाने लावलेल्या हजेरीमुळे वातावरणात गारवा पसरला.
यवतमाळ-
राळेगाव येथील प्रकरणी संशयित आरोपी मजहर कुरेशीच्याच्या घरावर जमावाने केली दगडफेक
राळेगाव येथील संतप्त जमावाकडून संशयित आरोपी मजहर कुरेशीच्या घरावर दगडफेक
पोलिसांनी जमावाला पांगविले. संशयित आरोपी कुरेशी त्यांच्यावर पोलिसांनी केली प्रतिबंधात्मक कारवाई
धुळे -
धुळ्याच्या पिंपळनेरमध्ये मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर
पिंपळनेर शहरात मोकाट जनावरांच्या झुंजी मध्ये स्थानिक नागरिक गंभीर जखमी
जखमी नागरिकावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू
बाजारामध्ये मोकाट जनावरांचा हायदोस मोठ्या प्रमाणात वाढला असून, शासनाचे अक्षम्य दुर्लक्षपणामुळे नागरिकांना नाहक सोसावा लागत आहे त्रास...
स्थानीकांतर्फे मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.