Maharashtra News Live Update Saam TV Marathi
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: जामनेर रोडवरील दुकानासमोर उभी असलेल्या रिक्षाने घेतला अचानक पेट

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: विदर्भासह महाराष्ट्रात उष्णतेची लाट, विधान परिषदेच्या निवडणुका, भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

जामनेर रोडवरील दुकानासमोर उभी असलेल्या रिक्षाने घेतला अचानक पेट

भुसावळ शहरातील जामनेर रोडवरील शेठ घासीलाल अँड सन्स या दुकानात एक ग्राहक वडा घेण्यासाठी गेला होता. त्यावेळी रिक्षा चालकाने भट्टीजवळच रिक्षा सुरू अवस्थेत ठेवली होती.

दरम्यान, गॅसच्या ज्वाळेमुळे अचानक रिक्षाने पेट घेतला आणि काही क्षणातच आगीने भीषण रूप धारण केलं.रिक्षेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

पुण्यात चंदननगर परिसरात आग

रामवाडी पंपिग स्टेशनच्या मागे कपिल नगर येथील दुकानाला आग

दोन अग्निशमन दलाच्या गाड्या आग विझविण्याचे काम सुरू

नागपूरच्या मानेवाडा परिसरातील एस. के. बारमध्ये दारू पिण्यासाठी आलेल्या युवकांनी घातला राडा

- दारू पिण्यासाठी बसण्याच्या जागेवरून झाला वाद..राडा घातल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद..

- बारमध्ये तोडफोड करून कर्मचाऱ्याला दारूच्या बाटल्या फेकून मारत जखमी केल्याप्रकरणी आरोपीविरूद्ध हुडकेश्र्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल..

- दारूच्या नशेत असलेल्या तरुणांनी बारच्या आतमधील रुममध्ये दारू पिण्यासाठी केलेल्या मागणीवरून झाला होता वाद..

- काही वेळातच तरुणांनी बारमध्ये तोडफोड करत कर्मचाऱ्याला दारूच्या बाटल्याफेकून मारत जखमी केले..

- हुडकेश्र्वर पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू..

कल्याणमध्ये बेकायदेशीर गावठी दारू वाहतुकीवर धडक कारवाई

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने कल्याण परिसरात बेकायदेशीर गावठी दारू वाहतुकीवर मोठी कारवाई करत तब्बल तीन हजार लिटर हातभट्टी दारू जप्त केली आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक

नाशिक धर्मांतर प्रकरणाचे धागेदोरे मुंब्रापर्यंत

नाशिक धर्मांतर प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान ही दोन महिने पती सोबत मुंब्रात होती राहायला..

नाशिक SIT पथकाने धाड टाकत घरातून निदा खानच्या पतीला घेतले ताब्यात..

पुण्यात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचं आंदोलन

कॉर्पोरेट जिहाद विरोधात दोन्ही संघटनांचे राष्ट्रव्यापी निषेध आंदोलन

पुण्यातील अलका टॉकीज चौकात आंदोलन

नाशिक प्रकरणानंतर राज्यभरात बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद आक्रमक

मनमाडमधील मनोरुग्ण चढला रेल्वेच्या ओव्हर हेड वायरवर

ओवर हेड वायरचा वीज पुरवठा करण्यात आला खंडित..तब्बल एक तासा पासून त्याला खाली उतरविण्याचा केला जात आहे प्रयत्न.. दोन कर्मचारी त्याला उतरविण्यासाठी गेल्यावर खाली उडी मारण्याची देतोय धमकी.. वीज पुरवठा खंडित करण्यात आल्यामुळे काही ट्रेनचा खोळंबा झाला.

भाजपच्या आजी - माजी नगरसेविकांमध्ये अखेर मनोमिलन 

भाजपचे सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या मध्यस्थीने दोन्ही नगरसेविकांमधला वाद मिटला आहे. टक्केवारीवरून हा वाद नव्हता बाहेरच्या लोकांमुळे आमचा वाद झाल्याचं नगसेविकांचं म्हणणं आहे.

एससी, एसटीच्या जागा वाढल्याने विरोध 

एससी, एसटीच्या जागा वाढल्याने विरोध केला जात आहे

विधेयकाच्या चर्चेत १२३ सदस्यांनी सहभाग घेतला

महिला आरक्षण २०२९ पर्यंत लागू करण्याचा उद्देश

अमित शहांच्या संबोधनानंतर विधेयकावर मतदान होणार

अमित शहांच्या संबोधनानंतर विधेयकावर मतदान होणार आहे. 2029 ची निवडणूक महिला आरक्षणासह होईल. अमित शहा यांनी लोकसभेत ही दिली माहिती आहे.

इंडिया आघाडीच्या सदस्यांनी महिला आरक्षण विधेयकाला विरोध केला, अमित शहांचा विरोधकांवर निशाणा

अमित शहांचा विरोधकांवर निशाणा

इंडिया आघाडीच्या सदस्यांनी महिला आरक्षण विधेयकाला विरोध केला

महिला आरक्षण विधेयकाला कुणी विरोध केला नाही

विरोधकांचा विरोध अंमलबजावणीला नाही तर महिला आरक्षणाला

किंतू, परंतू करत विरोधकांनी या विधेयकाला विरोध केला

सत्ता, पैसा आणि गुंडगिरीच्या राजकारणासमोर आमचे नगरसेवक ठामपणे एकजूट राहिले - आमदार वरूण सरदेसाई 

सत्ता, पैसा आणि गुंडगिरीच्या राजकारणासमोर आमचे नगरसेवक ठामपणे एकजूट राहिले, असा दावा शिवसेना ठाकरे गट आमदार वरुण सरदेसाई यांनी केला. कल्याणमध्ये आयोजित कार्यक्रमात त्यांनी महायुतीवर जोरदार टीका करत अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.

Nashik: नाशिकच्या IT कंपनीतील धर्मांतरण आणि महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण प्रकरण

- नाशिकच्या IT कंपनीतील धर्मांतरण आणि महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण प्रकरण

- आरोपी शफी शेख आणि रझा मेमनला ATS घेतलं ताब्यात

- धर्मांतरण आणि महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषण प्रकरणी दोन्ही आरोपी ATS च्या ताब्यात

Dhule:  शासकीय रुग्णालयात महिला कर्मचाऱ्याला मारहाणीच्या आरोपानंतर परिचारिकांचे काम बंद आंदोलन 

धुळे शहरातील श्री भाऊसाहेब हिरे वैद्यकीय रुग्णालयात एका प्रशिक्षणावरून झालेल्या वादानंतर वातावरण चांगलंच तापलं, या वादातून ऑपरेशन थिएटरच्या इन्चार्ज पदावर असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याने, आपल्याला रुग्णालयातीलच एका वरिष्ठ अधिसेविकेने मारहाण केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

सांगली महापालिकेच्या 8 स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडी पडल्या पार

सांगली महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडी पार पडल्या आहेत.भाजपाचे चार,काँग्रेसचे 2 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दोन,अश्या 8 जणांचा स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाली आहे.

अंबरनाथच्या शिवनगरमध्ये पाणीटंचाई; नगरसेविका आक्रमक

अंबरनाथच्या शिवनगर परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून मागील आठवड्यापासून पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प आहे.

यामुळे संतप्त झालेल्या स्थानिक नगरसेविका हर्षदा पाटील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला.

वारंवार पाठपुरावा करूनही परिस्थिती सुधारत नसल्याने त्यांनी तीन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास अधिकाऱ्यांना कार्यालयात बसू देणार नसल्याचा इशारा दिला.

नाशिक लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणातील निदा खानचा पती पोलिसांच्या ताब्यात

Palghar : पालघरमध्ये बजरंग दल आक्रमक

पालघरमध्ये बजरंग दल आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय.

लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि फूड जिहादविरोधात कठोर कारवाईची मागणी करत थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेण्यात आली आहे.

अमरावती आणि नाशिकमधील कथित घटनांचा संदर्भ देत राज्यात या प्रकारांची व्याप्ती वाढत असल्याचा आरोप करण्यात आला.

मीरा भाईंदर विधानसभेचे भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ वायरल

मीरा भाईंदर विधानसभेचे भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ वायरल

व्हिडिओ वायरल होताच भाजपच्या 50 पेक्षा अधिक नगरसेवकांनी नवघर पोलीस ठाण्यात केले ठिय्या आंदोलन

जितेंद्र शेळके यांचा अपघात घातपात कसा असू शकतो? - देवयानी फरांदे

- जितेंद्र शेळके यांचा अपघात घातपात कसा असू शकतो?

- घातपात म्हणणे चुकीचे

- गृह विभागाने खरातचे काळे कारनामे बाहेर काढले

- गृह विभाग, ईडी या सर्व प्रकरणाची चौकशी सुरू आहे, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल

- महिलांचं शोषण झालंय, त्यांना न्याय मिळणं महत्वाचं

- महिला लैंगिक शोषणाचे गुन्हे फास्ट ट्रॅकवर चालवावेत, ही मागणी

Rahul Gandhi Live : जादूगार आणि उद्योगपतीचे काय संबंध आहेत,देशाला माहिती आहेत - गांधी

लोकसभेत बोलताना राहुल गांधींनी अप्रत्यक्षपणे मोदी सरकारवर हल्लाबोल केला.. ते म्हणाले की एका जादूगाराने एक चूक केली आणि त्यानंतर त्याला कधीच जादू करता आली नाही. जादूगार आणि उद्योगपती (बिजनेसमॅन) यांचे काय संबंध आहेत, हे देशाला नीट ठाऊक आहे," असा टोलाही त्यांनी लगावला. राहुल गांधींनी इंदिरा गांधी यांची आठवण सांगताना म्हटले की, "माझ्या आजीने मला बागेत एक गोष्ट शिकवली होती, जी खरी ताकद असते, ती नम्रपणे काम करते. ती कधीच स्वतःचे प्रदर्शन करत नाही."

राहुल गांधींच्या भाषणावरून लोकसभेत जोरदार राडा; किरेन रिजिजूंचा आक्षेप

राहुल गांधी यांच्या भाषणामुळे लोकसभेत मोठा गदारोळ झाला. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी राहुल गांधींच्या विधानावर तीव्र आक्षेप घेतला. ते म्हणाले की, "काँग्रेसनेच पूर्वी ओबीसी आरक्षणाला विरोध केला होता."

राहुल गांधी यांनी कोणाचेही ऐकून घेण्यास नकार दिला आणि सरकारवर टीका चालूच ठेवली. ते म्हणाले, "तुम्ही आदिवासींना हिंदू म्हणता, पण त्यांना सन्मानाची जागा देत नाही."

Rahul Gandhi Live : निवडणुकीचा नकाशा बदलण्याचा प्रयत्न - राहुल गांधी

लोकसभेत बोलताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, आपली सत्ता कमी होईल या भीतीने सरकार घाबरले आहे. त्यांच्या मते, सरकारसाठी संविधानापेक्षा 'मनुवाद' महत्त्वाचा आहे. हे विधेयक म्हणजे केवळ सरकारची घबराट असून, याद्वारे देशाचा निवडणुकीचा नकाशा बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. पंतप्रधान स्वतःला महिलांचे हितचिंतक दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधानांचा उल्लेख 'मॅजिशियन ऑफ बालाकोट', 'मॅजिशियन ऑफ बालासोर' आणि 'मॅजिशियन ऑफ ऑपरेशन सिंदूर' असा केला. त्यानंतर संसदेत मोठा गदारोळ झाला.

Rahul Gandhi Live : विधेयक राष्ट्रविरोधी, सत्ता मिळवण्याचा प्रयत्न - राहुल गांधींचा हल्लाबोल

हे महिला आरक्षणाचे विधेयक नाही, कारण ते तर २०२३ मध्येच मंजूर झाले आहे. हे विधेयक म्हणजे देशाचा निवडणुकीचा नकाशा बदलण्याचा एक प्रयत्न आहे. हे विधेयक एससी (SC), एसटी (ST) आणि ओबीसी (OBC) समाजाच्या विरोधात असून त्यांचे अधिकार हिरावून घेण्याचा हा एक अजेंडा आहे. सरकार घाबरलेले आहे. त्यांनी जे आसाम आणि जम्मू-काश्मीरमध्ये केले, तेच आता त्यांना पूर्ण देशात करायचे आहे. या बिलाचा महिला सक्षमीकरणाशी कोणताही संबंध नाही. फक्त सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करत आहात. हे विधेयक राष्ट्रविरोधी आहे आणि आम्ही सरकारला हे करू देणार नाही. दक्षिण आणि उत्तर भारतामध्ये भेदभाव केला जात आहे. तसेच दलित आणि आदिवासींचा सहभाग कमी केला जात आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

Rahul Gandhi Live :हे बिल महिलांच्या प्रगतीसाठी नाहीच. याचा महिला सक्षमीकरणाशी काहीही संबंध नाही. याद्वारे केवळ निवडणुकांचे गणित बदलण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.

हे बिल दलित आणि मागासवर्गीय लोकांच्या हिताचे नाही - राहुल गांधी

हे विधेयक दलित आणि मागासवर्गीयांच्या विरोधात आहे. OBC, SC आणि ST समाजाचे हक्क हिरावून घेण्याचा हा अजेंडा आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

Maharashtra News Live Update: असं विधायक मांडणं लज्जास्पद - राहुल गांधी

हे बिल महिलांच्या प्रगतीसाठी नाहीच. याचा महिला सक्षमीकरणाशी काहीही संबंध नाही. याद्वारे केवळ निवडणुकांचे गणित बदलण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.

शफी शेख आणि रझा मेमनची SIT कडून चौकशी सुरू

शफी शेख आणि रझा मेमन या दोघांची SIT कडून चौकशी सुरू झाली आहे. दोघांनाही उद्यापर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी दिली आहे. SIT च्या चौकशीत टेरर फंडिंगसह मानवी तस्करीवर भर असल्याचे तपासात समोर आले आहे.

राहुल गांधींना दुखापत

लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर चर्चा सुरू आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी या विधेयकावर बोलत आहेत. जेव्हा गांधी बोलण्यासाठी उभे राहिले, तेव्हा अध्यक्षांनी त्यांना विचारले की त्यांच्या हाताला काय झाले आहे. अध्यक्षांच्या प्रश्नाला उत्तर देताना विरोधी पक्षनेते म्हणाले, "साहेब, मला दुखापत झाली आहे. माझा अंगठा दुखत आहे."

Rahul Gandhi Live : या विधेयकाचा महिलांशी काहीही संबंध नाही. तुम्ही जुने बिल आणा, लगेच सपोर्ट करतो - राहुल गांधी

बुलढाण्यात लाच घेताना महसूल सहाय्यक अधिकारी रंगेहात पकडला

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वाशिम यांच्या पथकाने मेहकर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात मोठी कारवाई करत सहाय्यक महसूल अधिकारी केलास भगवान मुर्खुटे यांना २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.

तक्रारदाराच्या जमिनीच्या फेरफार प्रकरणातील आदेशाची प्रत देण्यासाठी आरोपीने लाचेची मागणी केली होती.

भोंदू अशोक खरातच्या ओकस कार्यालयात ईडीकडून गेल्या तीन तासांपासून झडती सुरू

- भोंदू खरात ज्या ठिकाणी काळे कारनामे करत होता त्या ठिकाणी आता ईडीकडून केली जातेय कागदपत्रांची तपासणी

- ओकस प्रॉपर्टी डीलर्स अँड डेव्हलपर्स नावाने होते भोंदू अशोक खरात याचे कार्यालय

- या कार्यालयात काही जमिनींचे, मालमत्तांचे व्यवहार झाल्याचे समोर

- कार्यालयात ED कडून तपास सुरू

यवतमाळमध्ये कडक उन्हामुळे शेतातील डिस्ट्रिब्युशन बॉक्सने घेतला पेट

  • कडक उन्हामुळे बॉक्समधील वायरिंग आणि उपकरणे अतिउष्ण होऊन ही आग लागल्याची प्राथमिक माहिती

  • यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील तेंडोळी परिसरात घटना, शेतातील सिंचनासाठी लावलेल्या ट्रान्सफॉर्मरखालील डिस्ट्रिब्युशन बॉक्सला आग लागून खाक

  • यवतमाळ जिल्ह्याचं तापमान 43.8 अंशावर असल्याने वीज यंत्रणांवर ताण,ट्रान्सफॉर्मरखालील डिस्ट्रिब्युशन बॉक्सने अचानक घेतला पेट

छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा LPG गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने रिक्षाच्या गॅस पंपावर रांगा

छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा LPG गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने रिक्षाच्या रांगा गॅस पंपावर दिसू लागल्या आहेत.

रिक्षा चालकांना गॅससाठी तब्बल पाच किलोमीटरपर्यंत रांगा लावाव्या लागत आहेत. 61 रुपये किलो असलेला गॅस आता थेट 120 रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

गॅस मिळवण्यासाठी एक दिवस आधीपासून रांगेत उभं राहावं लागत असल्याने रिक्षाचालकांचा रोजगार ठप्प झालाय.

निदा खानचं TCS मधून निलंबन

  • निदा खानचं ९ एप्रिललाच टीसीएसमधून निलंबन

  • निलंबनाचं पत्र आलं समोर

बुलढाण्यात शॉर्ट सर्किटमुळे बोरजवळा येथे शेतात आग

खामगाव तालुक्यातील बोरजवळा येथे शेतकरी बाळू झेलबा तोमर यांच्या शेतात शॉर्ट सर्किटमुळे आग लागून मका पीक, स्प्रिंकलर पाईप व ठिबक साहित्य जळून खाक झाले. या घटनेत लाखोंचे नुकसान झाले असून महावितरणकडून तात्काळ मदतीची मागणी करण्यात आलीये.

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड ची प्रकृती बिघडली

- उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल

- वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी सुरू

- आरोपी वाल्मीक कराडला अस्वस्थ वाटू लागले

- उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल

- जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांकडून आरोपी वाल्मिक कराडच्या चाचण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू

बेताल वक्तव्य करणाऱ्या त्या माजी मंत्र्याविरोधात शिवसेना आक्रमक

महिलांप्रती अवमानाची भावना निर्माण करणारे वक्तव्य करणाऱ्या माजी मंत्री सुबोध सावजी विरोधात आज बुलढाण्यात शिवसेने कडून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. महिलांच्या चारित्र्यावर शंका निर्माण करून समस्त महिलांना बदनाम करू पाहणाऱ्या बेताल वक्तव्यवीर सुबोध सावजी यांच्या विरोधात दोन दिवसात गुन्हे दाखल झाले नाही तर सुबोध सावजी च्या तोंडाला काळे पासून चोप देण्याचा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला आहे..

अकोल्यात भर उन्हात भक्तीमय वातावरण

कोल्याच्या तापमानाचा पारा आता 44.2 अंशावर पोहचलाय.. वाढत्या तापमानामुळ अकोलेकरांच्या अंगाची लाही लाही होत आहे.

दुपारच्या वेळी सूर्य आग ओकत असून, दुसरीकडे अकोलेकरांना स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन प्रशासन करतंय. परंतु अशातच कडक उन्हात अकोल्यात भक्तीमय वातावरण पाहायलं मिळालंय.

अंत्री निंबाफाटा येथे श्रीगुरु श्रीराम महाराज महोत्सवाला सुरुवात झालीय. याचं पार्श्वभूमीवर भर उन्हात हजारो महिलांसह पुरुषांच्या उपस्थित ही भव्य शोभायात्रा निघाली आहे. यावेळी भाविकांनी टाळ-मृदंगाच्या गजारात दिंडी काढलीय

धाराशिव जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या झळा तीव्र, तापमान 40 शी पार

धाराशिव जिल्ह्यामध्ये टेंपरेचर 40 शी पार गेल्याने नागरिक हैराण होत आहे.18 एप्रिल पर्यंत उष्णतेची लाट असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे त्याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट बोर्डवर आहे जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयामध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी उष्माघात कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे त्याचबरोबर नागरिक कुलर आणि थंड पेयाचा आसरा घेत असल्याचे दिसत आहे याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आरोग्य जपण्याचे आवाहन केले आहे.

मावोवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सी६० जवानांचा होणार विशेष सन्मान

  • फडणवीस सरकारचा आणखी एक महत्त्वाचा निर्णय

  • गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यातील सी६० पथकातील जवानांना विशेष पदकाने सन्मानित करणार

  • या वर्षापासून "सी६० सेवा पदक" देऊन जवान व अधिकारी यांचा सन्मान होणार

  • सी६० जवानांचे मनोबल वाढविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्णय

  • १ मे च्या पूर्वसंध्येला पदकांची होणार घोषणा

  • दरवर्षी सी ६० पथकातील ५०० जवान व अधिकाऱ्यांना सन्मानित केले जाणार

नांदेड ते नाळेश्वर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचं

नांदेड ते नाळेश्वर रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालं आहे. हा मार्ग जवळपास 25 गावांना जोडला आहे. त्यामुळं या मार्गांवर नेहमी वर्दळ असते. परंतु या सिमेंट रस्त्यावर अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत.या भेगा पडलेल्या ठिकाणी अनेक अपघात होत आहेत. अपघातचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून अनेक जण अपघात जखमी झाले आहेत.

Nashik: नाशिकच्या TCS कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषकप्रकरणी बजरंग दल आक्रमक

नाशिकच्या TCS कंपनीतील धर्मांतरण आणि महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषकप्रकरणी बजरंग दल आक्रमक

जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून निदर्शने

TCS कंपनीतील धक्कादायक प्रकाराचा निषेध

आरोपींवर कठोर कारवाईची मागणी

Rajawadi Hospital: महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयातील वरिष्ठ निवासी डॉक्टर आजपासून संपावर

महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयातील वरिष्ठ निवासी डॉक्टर आजपासून संपावर

वरिष्ठ निवासी डॉक्टरांचा मागच्या २ महिन्यांचा पगार थकला

त्यामुळे वरिष्ठ निवासी डॉक्टर आजपासून संपावर

सर्व डॉक्टर अद्याप फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या पगाराच्या प्रतीक्षेत..

जोपर्यंत पगार होणार नाही तोवर संप सुरूच राहणार...

Solapur: वाढत्या उन्हाचा सोलापूरच्या पर्यटणाला बसला फटका

वाढत्या उन्हाचा सोलापूरच्या पर्यटणाला बसला फटका

सोलापुरात उन्हाचा पारा पोहोचला 43.4 ° सेल्सिअस वर

सोलापुरात सूर्य आग ओकत असल्याने 30 ते 40 टक्के पर्यटकांनी सोलापूरकडे फिरवली पाठ

सोलापूर शहरातील लॉजिंग हॉटेल्स ओस पडली असून मॉल्स आणि चित्रपटगृहकडे ही नागरिक फिरकत नसल्याचे चित्र

दरम्यान लॉजिंग हॉटेल व्यवसायिकांकडून जास्तीत जास्त एसी आणि कुलर्सची सोय रूम मध्ये करून देण्याचा होतोय प्रयत्न

Jalgaon: जळगावात वाढत्या तापमानाचा केळीच्या बागांना मोठा फटका..

जळगावात वाढत्या तापमानाचा आणि उष्णतेचा केळीच्या बागांना देखील मोठा फटका..

जळगावत तापमानाचा पारा 43 अंशांवर पोहोचल्याने केळीच्या बागांना उन्हाचा तडाखा बसत आहे

वाढत्या तापमानामुळे केळीचे पान पिवळी पडत असून पाने जळून जमिनीवर पडत असल्याचे पाहायला मिळत आहे

केळीचे पान जळून खाली पडत असल्याने केळीचे घरदेखील पिवळी पडत असून घडाची वाढ खुंटक्याने नुकसान होत आहे..

शेतातील साडेसात हजार केळीच्या झाडांपैकी जवळपास साडेचार ते पाच हजार झाडांचे तापमानामुळे नुकसान झाले आहे..

आधीच केळीला भाव कमी मिळत असताना दुसरीकडे तापमानामुळे केळीचे नुकसान होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे..

दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असलेल्या सहर शेखचे प्रभागातील कार्यालय बंद

बोगस जात प्रमाणपत्राबाबत अडचणीत आलेल्या सहर शेख या दोन दिवसांपासून नोटरीचेबल असून त्यांच्या मुंब्रा येथील प्रभाग क्रमांक 30 मधील तनवर नगर येथील कार्यालय आज बंद स्वरूपात दिसून येत आहे कालपर्यंत याच कार्यालयातून कामकाज सुरू होते मात्र आज त्यांचे कार्यालय टाळेबंद दिसून येत आहे त्यांच्या पक्षातील ठाणे महानगरपालिका गटनेत्याने त्यांच्या घरी चिंताजनक परिस्थिती असल्याने त्या मुंब्रा शहरातून बाहेर असल्याची माहिती दिली होती मात्र सहर ने काल रात्री मुंबईमध्ये क्रिकेट सामना पाहतानाचा व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर अनेक चर्चांना उधान आली आहेत अशातच आता त्यांचे कार्यालय टाळेबंद दिसून येत आहे

Nashik: नाशिकच्या सातपूर परिसरात हिट अँड रन; एकाचा मृत्यू

नाशिकच्या सातपूर परिसरात हिट अँड रनची घटना

सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये सकाळच्या सुमारास हिट अँड रनची घटना

रस्त्याने पायी जाणाऱ्या व्यक्तीला अज्ञात ट्रकने उडवले, अपघातानंतर ट्रकसह चालक फरार

अपघातात पायी जाणाऱ्या व्यक्तीचा जागीच मृत्यू

सातपूर पोलीस घटनास्थळी दाखल, पुढील तपास सुरू

अपघाताचा सीसीटीव्ही समोर

Pune: पुण्यात पुन्हा गाड्यांची तोडफोड

पुण्यात पुन्हा गाड्याची तोडफोड

पुण्यातील सहकार नगर परिसरात दुचाकी गाड्याची केली तोडफोड

सहकारनगर परिसरातील तळजाई माता वसाहत खंडाळे चौक येडेश्वरी मंदिर समोर उभ्या असलेल्या दुचाकी गाड्याची तोडफोड

सहा दुचाकी तोडफोड बांबूने मारून केली तोडफोड

साहिल कुचेकर आरोपी रेकॉर्ड वरील यांनी तोडफोड केल्याची पोलिसांनी दिली माहिती

अंतर्गत बाचाबाची झाल्याने तोडफोड केल्याची माहिती

आरोपीला पोलिसांनी केली अटक त्याच्यासोबत आणखी कोणी होतं का याचा तपास पोलीस करत आहेत

अधिक तपास सहकारनगर पोलीस करत आहेत

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सिद्धेश्वर मंदिरात जाऊन घेतले सिद्धेश्वराचे दर्शन

उपमुख्यमंत्री सुनीता पवार बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत बारामतीची पोट निवडणूक सुरू आहे आज सकाळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामतीचे ग्रामदेवता सिद्धेश्वर मंदिरात दर्शन घेतले यावेळी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पूजा करण्यात आली..

TCS प्रकरणातील संशयित महिला आरोपी निदा खान गरोदर असल्याची माहिती

TCS प्रकरणातील संशयित महिला आरोपी निदा खान गरोदर असल्याची माहिती

गरोदर असल्याने जामीन मिळावा, यासाठी निदा खानकडून अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल

निदा खानच्या अटकपूर्व जमीन अर्जावर उद्या सुनावणी होण्याची शक्यता

निदा खान अद्याप फरार असून नाशिक पोलिसांचे पथक तिच्या मागावर

निदाच्या अटकपूर्व जामिनावर काय निर्णय होणार? याकडे लक्ष

Pune: मनसे नेते अमित ठाकरे दोन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर

मनसे नेते अमित ठाकरे दोन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर संपर्कप्रमुख झाल्यानंतर अमित ठाकरे प्रथमच पुणे दौऱ्यावर

पुण्यातील मनसे पक्ष कार्यालयात अनिश्चित ठाकरेंच्या बैठका

पक्षाची संघटन शक्ती वाढवण्यासाठी विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची दोन दिवस साधनार संवाद

अमित ठाकरे यांची पुणे जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती झाल्यानंतर अमित ठाकरे संघटना वाढीसाठी पुणे दौऱ्यावर

पुण्यातील अनेक कार्यकर्त्यांना पक्ष संघटनेतील नेत्यांना भेटून पक्ष विस्ताराबाबत अमित ठाकरे चर्चा करणार

अमित ठाकरे पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांशी साधणार वन टू वन संवाद

भाजप नेते शिवाजी चुंबळे यांच्यासह सात जणांवर गुन्हा

शेतात घुसून जीव घेणा हल्ला केल्या प्रकरणी माजी नगरसेवक भाजप नेते शिवाजी चुंबळे यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल

जुन्या सात लाख वाहनांचा पुण्यात विषारी धूर....

केंद्र सरकारच्या भंगार वाहन धोरणानुसार जुनी वाहने भंगारात काढून प्रदूषण कमी करण्याचे स्वप्न दाखवले जात असले तरी पुण्यात या धोरणाचा फज्जा उडाला आहे शहरात 15 वर्षाहून अधिक आयुर्मान असलेल्या वाहनांची संख्या सात लाख 29 हजार 695 इतकी आहे ही वाहने भंगरात काढण्यासाठी शहरात एकही अधिकृत केंद्र नसल्याने अशा वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यावर आरटीओ कोणतीही उपाययोजना करताना दिसत नाही.

TCS मधील धर्मांतरण आणि महिला अत्याचार प्रकरण

- संशयित आरोपींचे सोशल मिडीयावरील गृप्स पोलीस यंत्रणांच्या रडारवर

- गृप्स मधील ईतर सदस्य कोण होते ? गृप तयार करण्यामागील नक्की उद्देश काय होता ? याचा तपास सुरू असल्याची सूत्रांची माहिती

- धर्मांतरणसाठी दबाव टाकत संबंधित गृप्समध्ये पिडीतांचा समावेश केला जात होता असाही संशय

भिवंडीतील इंदिरा गांधी रुग्णालयात रुग्णावर सुरक्षा रक्षकाची मारहाण; आदिवासी संघटनेचे ठिय्या आंदोलन

भिवंडी शहरातील इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालय येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, कुत्रा चावल्याने उपचारासाठी आलेल्या रुग्णाला सुरक्षा रक्षकाकडून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विधी विद्यापीठाचे दोन विद्यार्थी अपघातात ठार, वर्धा मार्गावर भीषण दुर्घटना

- सक्षम बनसोड आणि आर्यन सोनटक्के मृत, दोघेही २० वर्षीय विद्यार्थी

- एक न्यायाधीशांचा, दुसरा वकिलांचा मुलगा, विधी क्षेत्रात हळहळ

- ते दोघेही डोंगरावर शिवारात जेवणासाठी गेल्याची माहिती आहे...

- परत येत असताना खाणीचा खड्डा लक्षात न आल्याने आणि अंधार असल्यानं मदत मिळू शकले नाही..

- बुधवारी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास अपघात, बुलेटने परतताना दुर्घटना

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया जाहीर...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नुकतीच शैक्षणिक वर्ष 202627 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे त्यानुसार पदवी पदव्युत्तर पदवी पदविका पाच वर्ष मदतीच्या एकात्मिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे त्यासाठीच्या संभाव्य वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी 15 मे पर्यंत ची मुदत देण्यात आली असून एक ते 13 जून या कालावधीत ऑनलाईन प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे.

उन्हाळी हंगामात एसटी भाडेवाढ लागू...

उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने प्रवासी भाड्यात दहा टक्के वाढ लागू केली असून त्यासोबतच प्रत्येकी तिकिटावर दोन रुपयांचा स्वच्छता अधिकारीही आकारला जाणार आहे ही भाडेवाढ बुधवारपासून लागू झाल्यामुळे अनेक प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे यापूर्वी एसटी महामंडळाने भाडेवाढ केल्यानंतर हंगामी भाडेवाढ करण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे...

आमदार तानाजी सावंत यांच्या मतदारसंघात पुतण्या धनंजय सावंत यांचे भावी आमदार म्हणून बॅनर

महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एका काका पुतण्याचा राजकीय वाद पाहायला मिळत आहे.आमदार तानाजी सावंत यांच्या मतदार संघात पुतने धनंजय सावंत यांचे भावी आमदार असे बॅनर पाहायला मिळत आहेत.नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत काका पासून फारकत घेत धनंजय सावंत अपक्ष निवडून आले. त्यानंतर धनंजय सावंत कुटुंबाने भाजपमध्ये प्रवेश केला. येत्या काळामध्ये आमदार तानाजी सावंत यांच्या विरोधात धनंजय सावंत आव्हान उभा करू शकतात याचे संकेत आता मिळत आहेत.धनंजय सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त मतदार संघामध्ये भावी आमदार अशी बॅनरबाजी पाहायला मिळाली.त्यामुळे काका तानाजी सावंत यांच्या विरोधात पुतणे धनंजय सावंत मैदानात उतरतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील धरणातील जलसाठा घट

यवतमाळ जिल्ह्यात पावसाळ्यात ओव्हर फ्लो झालेले धरण उन्हाच्या ज्वाला वाढतात जलसाठ्यात झपाट्याने घट होत असून एकूण पन्नास टक्के पाणीसाठा जलाशयात शिल्लक राहिलाय उन्हाची तीव्रता वाढताच या जलसाठ्यात आणखी घट नोंदवली जात आहे यामुळे पाणीटंचाई निवारणासाठी यंत्रणा कामाला लागली आहे यातून पाणी टंचाई निवारणासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी आढावा बैठक घेऊन प्रशासनाला पाणी टंचाई निर्माण होऊ नये साठी सुचना करण्यात आले आहे.

अवैद्य वाळूवरून परांड्यात तहसील कार्यालयाच्या आवारात राडा

तहसीलदारांना धमकी दिल्याने महसूल विभाग आक्रमक काम बंद आंदोलन, तात्काळ कारवाई न झाल्यास बेमुदत आंदोलनाचा इशारा

वाळू उपसा विरोधात कारवाईसाठी जास्त असताना, माझ्या निवेदनावर काय कारवाई केली म्हणत तक्रारदाराने अडवली तहसीलदारांची गाडी

आत्ताच कारवाई कर नाहीतर तुला जीवे मारून टाकील तहसीलदाराला अशी थेट धमकी दिल्याचा आरोप

सात वर्षाच्या मुलाची हत्या, सावत्र वडिलाला जन्मठेप

पत्नीसोबत वाद झाल्यानंतर तिच्या मुलाला सोबत गावी आणून सावत्र बापाने बेदम मारहाण केली नंतर त्याला विहिरीत फेकून दिले या गुन्ह्यात प्रमुख जिल्हा न्यायाधीश मुनघाटे यांनी आरोपी सावत्र बापाला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली देविदास कोडापे वय 41 वर्षे राहणार दाभा तालुका बाभूळगाव असे शिक्षा झालेल्या नराधाम सावत्र बापाचे नाव आहे.

अकोल्यात 13 लाख 80 हजार किमतीचं ड्रग्ज'चं जप्त 

आता महाराष्ट्रात देखील “झॉम्बी ड्रग्ज” संदर्भात धक्कादायक प्रकरणे येतायेत उजेडात. या पार्श्वभूमीवर राज्यभरात नागरिकांमध्ये भीतीचे पसरले वातावरण. अशातच अकोल्यात 'ड्रग्ज'ची पहिली मोठी कारवाई. अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने 68.43 ग्रॅम 'ड्रग्ज'चं केलं जप्त. ज्याची किंमत 13 लाख 80 हजार इतकी. अकोल्यातीलं सिव्हिल लाईन हद्दीतील नविन बस स्थानकाच्या पाठीमागे एक व्यक्ती आला होता 'ड्रग्ज' विक्रीसाठी. मोहम्मद शफीक मोहम्मद जहिर शेख असं या व्यक्तीच नाव. तो मुळ ठाणे जिल्ह्यातील रहिवासी. त्याला ताब्यात घेत 68.43 ग्रॅम 'ड्रग्ज' जप्त. एकत्रित 13 लाख 80 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त. 'ड्रग्ज' विक्रीसंदर्भातील आतापर्यंत अकोला पोलिसांची सर्वात मोठी कारवाई. 'ड्रग्ज' विक्रीसंदर्भातील मुख्य टोळीचा अकोला पोलिसांकडून होणार लवकर फर्दाफाश.

लग्न सुरू असतानाच पोलिसांची एन्ट्री.... लग्नमंडपातून नवरदेव-नवरी ताब्यात

लग्नाचा उत्साह सुरू असतानाच धडगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत एका बालविवाहाला चाप लावला आहे. धडगाव तालुक्यातील खर्डा येथील पाटीलपाड्यात अल्पवयीन मुला-मुलीचा जबरदस्तीने विवाह लावून दिला जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकली. पोलिसांनी घटनास्थळावरून अल्पवयीन वधू-वराची सुटका केली असून, मुला-मुलीच्या पालकांवर बालविवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गत धडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मुलगा आणि मुलगी दोन्ही अल्पवयीन असल्याचे माहित असूनही हा विवाह लावला जात होता.ऐन लग्नाच्या मुहूर्तावर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: इम्तियाज जलील यांच्या घरी पोलीस दाखल

Ashok Kharat: कल्पना खरात कुठे आहे? भोंदू खरातने पोलिसांना दिली महत्वाची अपडेट

Krishna Sugar Factory : मोठी बातमी! कृष्णा कारखान्याची निवडणूक लांबणीवर पडणार, कारण आले समोर

BCCI Rules 2026: IPL मध्ये हनीट्रॅपचा धोका? बीसीसीआय अ‍ॅक्शन मोडमध्ये, थेट नियमावली जाहीर

Actor Sold Property: सलमानचा भाऊ अरबाज खानने विकला आलिशान फ्लॅट; मिळाले कोट्यवधी रुपये

SCROLL FOR NEXT