AADITYA THACKERAY TO BECOME SHIV SENA UBT WORKING PRESIDENT saam tv
महाराष्ट्र

साठीच्या शिवसेनेला GEN Zचा चेहरा, आदित्य ठाकरे शिवसेनेचे नवे कार्याध्यक्ष?

Shiv Sena UBT Dussehra Rally: यंदा ठाकरेेसेनेचा दसरा मेळावा विशेष असणार आहे. कारण, ठाकरेसेनेनं जारी केलेल्या पोस्टरची राज्यभरात चर्चा रंगलीये. जेनझी आंदोलनात आक्रमकपणे उतरणारे आदित्य ठाकरे दसरा मेळाव्यानंतर वेगळ्या भूमिकेत दिसण्याची चिन्हे आहेत. यंदाच्या दसरा मेळाव्यात मोठी घोषणा होणार का?... पाहूयात यावरचा हा रिपोर्ट...

Rohit Kadam

मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून सुरू झालेला शिवसेनेचा दसरा मेळावा राजकीय आणि सामाजिक सत्तासंघर्षाचा साक्षीदार आहे. मात्र, गेल्या चार वर्षांपासून शिवसेनेचे दोन मेळावे होताहेत. एक शिंदेसेनेचा आणि दुसरा ठाकरेसेनेचा... अशातच आता यंदाचा ठाकरेसेनेचा दसरा मेळावा नव्या कारणानं चर्चेत आलाय. ठाकरेसेनेच्या दसरा मेळाव्याचं नवं पोस्टर समोर आलंय. गेल्या काही महिन्यांत राज्यातील विविध प्रश्नांवर आणि तरुणांच्या ज्वलंत मुद्यांवर रस्त्यावर उतरून आक्रमक आंदोलनं करणाऱ्या आदित्य ठाकरेंचा खास फोटो या पोस्टरवर वापरण्यात आलाय.

गेल्या काही महिन्यांत राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ठाकरेसेनेने आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून येतंय. 10 ऑक्टोबरच्या शिवाजी पार्कातल्या आंदोलनात पोलिसांनी सीजेपी कार्यकर्त्यांवर केलेल्या कारवाईविरोधात आदित्य ठाकरे थेट मैदानात उतरले होते.

पोलिसांची गाडी अडवून त्यांनी आपलं आक्रमक नेतृत्व दाखवून दिलं होतं. त्यामुळे या मेळाव्यावर त्यांचीच छाप असण्याचे संकेत ठाकरेसेनेनं प्रसिद्ध केलेल्या टीझरमधून दिले आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरेंची या दसऱ्या मेळाव्यात शिवसेनेचे नवे कार्याध्यक्ष म्हणून घोषणा होणार की काय ? अशी जोरदार चर्चा यानिमित्तानं रंगू लागलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT