Aaditya Thackeray and Devendra Fadnavis reportedly met secretly at Sofitel Hotel, BKC, fueling speculation about major political changes in Maharashtra. Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: ठाकरे - फडणवीस भेट, शिंदेंच्या अडचणी वाढणार ? राजकारणात खळबळ|VIDEO

Will Eknath Shinde lose support from BJP? आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बीकेसीतील सोफिटेल हॉटेलमध्ये गुप्त भेट झाली. तब्बल अडीच तासांच्या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं असून शिंदेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते.

Omkar Sonawane

राजकीय वर्तुळातून आताची सर्वात मोठी घडामोड घडली असून आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस एकाच हॉटेलमध्ये असल्याची माहिती मिळतेय. बीकेसीतील सोफिटेल हॉटेलमध्ये ही भेट झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. फडणवीस-ठाकरेंच्या भेटीमुळे चर्चांना उधाण आलंय. दोन्ही नेते सोफिटेल हॉटेलच्या 7 व्या मजल्यावर भेटल्याची माहिती मिळतेय.

आदित्य ठाकरे संध्याकाळी 5.30 ते 6 च्या सुमारास हॉटेल सोफिटेलमध्ये दाखल झाले. त्यानंतर काही वेळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील पोहोचल्याची माहिती मिळतेय.या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल अडीच तास चर्चा झाली असून काहीतरी पडद्यामागे घडते आहे. गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. भाजप कुठेतरी शिंदेंना डॅमेज करण्याचा प्रयत्न करतेय अशी देखील महिती सूत्रांनी दिली होती. तसेच आज झालेल्या भेटीने शिंदेंच्या अडचणी वाढणार का? असा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: आंबेडकर-ठाकरे एकत्र येणार? वंचितची मोठी घोषणा, पालिका निवडणुकीत नवी समीकरणं

India Population: भारताच्या लोकसंख्या वाढीला ब्रेक; मूल नको असलेल्या कुटुंबांची संख्या वाढली

Mumbai Local Accident : मुंबई लोकलच्या टपावर चढला; तरुणासोबत क्षणात होत्याचं नव्हत झालं

Superfood For Monsoon: पावसाळ्यात निरोगी आरोग्यासाठी वरदान आहेत 'हे' सूपरफूड, आजच आहारात करा समावेश

Maharashtra Politics: शिंदेसेनेचे आमदार शिंदेंवर नाराज? राज्याच्या राजकारणात नेमकं काय घडतंय

SCROLL FOR NEXT