wardha flood news  saam tv
महाराष्ट्र

wardha Flood : पुराच्या पाण्यात युवकासह दोन बैल गेले वाहून, पण...; थरारक व्हिडिओ कॅमेरात कैद

पुलगाव येथील वर्धा (Wardha) नदीच्या पुलावरून बैलजोडी वाहून गेली. मात्र काही अंतरावर ती बैलजोडी सुखरूप बाहेर निघाली. यात बैलजोडीला दुखापत झाली आहे.

साम टिव्ही ब्युरो

चेतन व्यास

wardha Flood News : जिल्ह्यात आज दुपारपर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी, नाले ओसंडून वाहत आहे. नदी, नाल्यांना आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातील अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहे. जिल्ह्याच्या वर्धमनेरी येथील पुलावरून पाणी वाहत असतानाही पूल ओलांडणारा युवक वाहून गेला. मात्र, युवक पाण्यात बुडत असल्याचे लक्षात येताच स्थानिकांनी त्याला वाचवले. तर पुलगाव येथील वर्धा (Wardha) नदीच्या पुलावरून बैलजोडी वाहून गेली. मात्र काही अंतरावर ती बैलजोडी सुखरूप बाहेर निघाली. यात बैलजोडीला दुखापत झाली आहे.

आर्वी तालुक्याच्या वर्धमनेरी येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने आर्वी वर्धमनेरी मार्ग वाहतुकीसाठी सकाळपासून बंद आहे. दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतली. मात्र पुलावरील पाणी कमी झाले नाही. याच पाण्यातून बस चालक, चार चाकी आणि काही नागरिक जीवाशी खेळ करत रस्ता पार करत आहे. यातच एक युवक हा पूल पार करत असताना पुराच्या पाण्यात वाहून गेला. युवक वाहत असल्याच लक्षात येताच एका युवकाने त्याला वाचविण्यासाठी उडी मारली आणि इतर युवकांच्या मदतीने त्याचे प्राण वाचवले.

याचदरम्यान, पुलगाव येथील वर्धा नदीच्या लहान पुलावरून सुद्धा पाणी असल्याने तो मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे. याच पुलावरून एक बैल जोडी जात असताना ती वाहून गेली. मात्र काही अंतरावरच ती बैलजोडी सुखरूप पुरातून बाहेर निघाली. या घटनेत बैलजोडी बाहेर निघाली असली, तरी तिला दुखापत झाली आहे. ही बैलजोडी विटाळा या गावातील सुरेश डाहे यांची असल्याच सांगितल्या जात आहे.

दरम्यान, प्रशासनाकडून पुराचे पाणी पुलावरून वाहत असल्यास वाहतूक करू नये, अशा सूचना वारंवार दिल्या जातात. मात्र तरीही नागरिकांकडून या बाबींकडे दुर्लक्ष केले जाते. जीवाची पर्वा न करता नागरिकांकडून केल्या जाणारे असे कृत्य हे धोकादायक ठरू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:भिवंडी इमारत दुर्घटना; मुख्यमंत्री फडणवीसांची घटनास्थळी पाहणी, महापालिका आयुक्तांना तातडीच्या कारवाईचे आदेश

Bhiwandi : भिवंडीत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे ४ मजली इमारत कोसळली, ९ जणांचा मृत्यू; मृतांची नावे आली समोर

PM Modi: पंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह विधान, २५ वर्षांच्या तरुणीविरोधात गुन्हा; नेमकं प्रकरण काय?

श्रावण महिन्यात दही आणि कढी का खात नाहीत? काय आहे त्यामागील धार्मिक आणि वैज्ञानिक कारण?

Girl Child Scheme : राज्य सरकारचा मुलींसाठी खास उपक्रम, गरजू कुटुंबातील मुलींना मिळणार आर्थिक आधार

SCROLL FOR NEXT