दूरसंचार पतसंस्थेत कंत्राटी कर्मचाऱ्याने मैत्रीणीच्या मदतीने केला 10 लाखांचा अपहार ! दीपक क्षीरसागर
महाराष्ट्र

दूरसंचार पतसंस्थेत कंत्राटी कर्मचाऱ्याने मैत्रीणीच्या मदतीने केला 10 लाखांचा अपहार !

प्रशासकाच्या बनावट सह्या करून 9 लाख 94 हजार 453 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीपक क्षीरसागर, साम टिव्ही, लातूर

दीपक क्षीरसागर

लातूर : लातूर (Latur) येथील गांधी चौकात असलेल्या लातूर जिल्हा दूरसंचार कर्मचारी सहकारी पतसंस्थतेत जवळपास 10 लाखांचा अपहार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत असणाऱ्या एका कर्मचाऱ्याने आपला एक मित्र व मैत्रीण यांच्या मदतीने पतसंस्थेचे चेक चोरून चोरले आहेत. त्यावर प्रशासकाच्या बनावट सह्या करून 9 लाख 94 हजार 453 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गांधी चौक पोलिसांनी हा कर्मचारी, त्याची मैत्रीण व मित्र अशा तिघांना अटक (Arrest) केली आहे.

हे देखील पहा-

लातूर येथील गांधी चौकात दूरसंचार विभागाची इमारत आहे. याच इमारतीत लातूर जिल्हा दूरसंचार कर्मचारी सहकारी पतसंस्था आहे. या संस्थेवर सध्या सहकार विभागाचा अधिकारी प्रशासक म्हणून कार्यभार पाहत आहे. प्रशासक असलेले औसा येथील सहाय्यक निबंधक जीवन गोपाळराव जाधव यांच्या या संस्थेतील चेकच्या संदर्भात काहीतरी गडबड आहे हे लक्षात येताच त्यांनी गांधी चौक पोलिसांत तक्रार दिली.

या, तक्रारीवरून पोलिसांनी या पतसंस्थेत कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यत असणारा 27 वर्षीय खंडोबा गल्लीत राहणारा प्रशांत सैदापुरे, त्याचा एक मित्र सिद्राम गणपत साठे आणि आझाद चौक परिसरात राहणारी एक अविवाहित मैत्रीण या तिघांना अटक केली आहे.

कंत्राटी कर्मचारी प्रशांत सैदापुरे याने पतसंस्थेतील पाच चेक चोरले. या चेकवर प्रशासकाची बनावट सही करून हे चेक मैत्रीण व मित्राच्या खात्यावर जमा केले. आश्चर्य म्हणजे या मैत्रीणीच्या नावे असलेले खाते व त्याचे एटीएम कार्ड सैदापुरे हाच हाताळ असतं. पतसंस्थेचे सभासद नसलेल्या मैत्रीण व मित्राच्या खात्यावर पतसंस्थेचे पाच चेक बटवून प्रशांत सैदापुरे याने 9 लाख 94 हजार 453 रुपयांचा 6 मे ते 23 नोव्हेंबर 2021 या दरम्यान अपहार केला आहे. त्यापैकी एक लाख 85 हजार रुपये पोलिसांनी हस्तगत केले आहेत. उर्वरित रक्कम हस्तगत करण्यासाठी पोलिस प्रयत्न करत आहेत पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत लोंढे हे अधिक तपास करत आहेत.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; ६५६५ पदांसाठी होणार भरती; रेल्वे मंत्रालयाने दिली मंजुरी

हृदयद्रावक! दिंडोरीमध्ये कार विहिरीत कोसळून एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू; मृतांची नावे आली समोर

Maharashtra Live News Update : बिबट्याची दहशत, उन्हाचा तडाखा आणि गारपिटीचा कहर; मेंढपाळांवर तिहेरी संकट

Gold Price Today: सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठा बदल, वाचा २२ अन् २४ कॅरटचे आजचे दर

Namo Shetakri Yojana: शेतकऱ्यांनो नमो शेतकरी योजनेचे ₹२००० मिळाले का? अशा पद्धतीने चेक करा स्टेट्स

SCROLL FOR NEXT