नागपूरातील बलात्कार प्रकरणी आरोपींच्या शोधाकरीता पथक रवाना Saam Tv
महाराष्ट्र

नागपूरातील बलात्कार प्रकरणी आरोपींच्या शोधाकरीता पथक रवाना

नागपूरात अल्पवयीन मुलीवर एकाच दिवशी दोन वेळा गॅंगरेप झाल्याचा धक्का दायक प्रकार पुढे आला होता.

साम टिव्ही ब्युरो

मंगेश मोहिते

नागपूर: नागपूरात (Nagpur Gangrape) अल्पवयीन मुलीवर एकाच दिवशी दोन वेळा गॅंगरेप झाल्याचा धक्का दायक प्रकार पुढे आला होता. या प्रकरणात सात आरोपी असल्याचं तपासात पुढे आले आहे. चार आरोपींना अटक करण्यात आली असून तीन आरोपींचा शोध पोलीस घेत आहे. यासाठी पथक रवाना करण्यात आले आहे.

पीडित अल्पवयीन मुलगी ही शुक्रवाराला रागाने घरून निघाली व बाहेर गावी जाण्यासाठी नागपूर रेल्वेस्थाकावर पोहचली. मात्र तिच्या कडे पैसे नसल्याने तिने आपली हकीकत एका आरोपी पैकी एकाला सांगितली. तो रिक्षाचालक होता. आरोपीने मदत करण्याचा उद्देशाने तिला नागपूरच्या मोमीनपूरा भागात नेले व इतर तीन आरोपी सोबत मिळून पीडित मुलीवर सामूहिक अत्याचार केला.

त्यांनतर मुलीला इंदिरागांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालया समोर सोडले त्या नंतर पीडित मुलीला तेथे दोन इसम भेटले तिने त्यांना मदत मागितली असतांना त्यांनी देखील उभ्या रिक्षा मध्ये तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलीने कशीबशी आरोपींच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली. त्यांनतर एक इसमाच्या मदतीने रेल्वे स्थानकावर पोहचली त्यांनतर रेल्वे पोलिसांनी तिला आपल्या ताब्यात घेऊन चाईल्ड लाईनच्या स्वाधीन केले.

त्यांनतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. या संदर्भात सीताबर्डी पोलिस ठाण्यामध्ये सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला असून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर तीन आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणामुळे नागपुरात चांगलाच संताप व्यक्त करण्यात येत असून एखाद्या असहाय गतिमंद मुलीवर अत्याचाराची घटना खडबड माजविणारी आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS अधिकाऱ्याच्या फार्महाऊसवर रंगला जुगाराचा डाव; अचानक टाकली धाड, कारवाईत ३ पोलीस कर्मचारी सापडले

Maharashtra Live News Update: विक्रोळी एस्टन एक्सप्रेस हायवे लगत असलेल्या इमारतीच्या पार्किंग मध्ये जनरेटरला आग

Kitchen Hacks : जळलेला नॉन स्टिक तवा कसा साफ करावा? फॉलो करा या टिप्स, पुन्हा मिळेल नव्यासारखी चमक

Navi Mumbai : रीलच्या नावाखाली उच्छाद! नवी मुंबईत आगरी कोळी समाजाच्या पुतळ्याचा अपमान; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Rahul Gandhi Relief : राहुल गांधींना मोठा दिलासा, नाशिकमधील 'तो' खटला बंद, कोर्टात काय घडलं?

SCROLL FOR NEXT