धक्कादायक...! शिक्षकाची विहिरित गळफास घेऊन आत्महत्या अभिजीत घोरमारे
महाराष्ट्र

धक्कादायक...! शिक्षकाची विहिरित गळफास घेऊन आत्महत्या

शिक्षकाने विहिरित दोरखंडाच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या आमगांव येथे घडली आहे.

अभिजीत घोरमारे

गोंदिया: शिक्षकाने विहिरित दोरखंडाच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या आमगांव येथे घडली आहे. पदवीधर शिक्षक सुनील मुटकुरे असे आत्महत्या करणाऱ्या शिक्षकाचे नाव असून आमगांव तालुक्यातिल जि. प.शाळा बोरकन्हार येथे ते कार्यरत होते. सुनील मुटकुरे यांनी आपल्या राहत्या घरच्या विहिरित आज पहाटे 5 च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली.

आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. पण मुटकुरे हे एकाकी स्वभावाचे होते ते सहसा इतरात मिसळत नव्हते, मुटकुरे इंग्रजी विषयात निपुण होते, तसेच झाडांवर कलम करण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यामुळे अश्या व्यक्तीच्या जाण्याने गावात शोककळा पसरली आहे. त्यांचा मृतदेह विहिरी बाहेर काढण्यात आले असून उत्तरीय तपासणी करिता आमगाव रुग्णालयात पाठविण्यात आले असून आमगाव पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला, असून पुढील तपास आमगाव पोलीस करीत आहे.

समाज मग तो कालचा असेल, आजचा वा उद्याचा असेल या समाजाचा खरा शिल्पकार हा ‘शिक्षक’च आहे. शिक्षक वर्ग हा समाजासाठी दिशादर्शकाचे काम करणारा प्रमुख मार्गदर्शक आहे. पण हा दिशादर्शकच खचून जाऊन जिवाबद्दल टोकाची भूमिका घेत असेल तर आता सर्वाना विचार करण्याची खरी वेळ आली आहे,हे मात्र निच्छित.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT