Deepali Sayed Saam Tv
महाराष्ट्र

Deepali Sayed : दीपाली सय्यद यांचा राज ठाकरेंना जीवे मारण्याचा कट; माजी स्वीय सहाय्यकाचा गंभीर आरोप

दीपाली सय्यद यांच्यावर गंभीर आरोप

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन बनसोडे

अहमदनगर - दीपाली सय्यद यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना ठार मारण्याचा कट रचल्याचा खळबळजनक दावा माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे एकाच खळबळ उडाली आहे. अहमदनगरमध्ये पत्रकार परिषदेत त्यांनी हे गंभीर आरोप केले आहेत.

दीपाली सय्यद ट्रस्टतर्फे होणारे व्यवहार चुकीचे आहेत, तसेच त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा जीवे मारण्याचा कट रचल्याचा आरोप देखील त्यांनी केला.अयोध्या दौऱ्यात राज ठाकरेंची हत्या करण्याचा कट रचला होत.

दिपाली सय्यद आणि भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी हा कट आखला होता त्या साठी अनेक वेळा दिपाली सय्यद दिल्लीला गेल्या होत्या. दिपाली सय्यद यांनी जवळपास 17 ते 18 दिल्लीच्या वाऱ्या केल्या होत्या असा गंभीर आरोप माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी अहमदनगर येथील पत्रकार परिषदेत केला आहे.

माझ्या संरक्षणाची जबाबदारी राज्य शासनाने घ्यावी तर मी 30 जानेवारी रोजी अहमदनगर मध्ये पुन्हा पत्रकार परिषदेत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, इकबाल कासकर आणि सलीम फ्रूटवाला याच्या बरोबर दिपाली सय्यद यांचे जे आर्थिक व्यवहार आहेत. त्यांच्या मद्यमातून दिपाली सय्यद यांच्या ट्रस्टला हजारो कोटी रुपये पुरवले जाते याचे पुरावे ऑडिओ सहित घ्यायला तयार आहे असेही भाऊसाहेब शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'एक है तो अदानी सेफ है'; राहुल गांधींचा मोदी-शाहांवर हल्लाबोल

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

SCROLL FOR NEXT