शेकडो स्त्रियांची यशस्वी प्रसूती करणाऱ्या परीचारिकेचा स्वतःच्या प्रसूती दरम्यान मृत्यू! संदीप नागरे
महाराष्ट्र

शेकडो स्त्रियांची यशस्वी प्रसूती करणाऱ्या परीचारिकेचा स्वतःच्या प्रसूती दरम्यान मृत्यू!

हिंगोली मध्ये शेकडो स्त्रियांची यशस्वी प्रसूती करणाऱ्या हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील परीचारिकेला प्रसूती दरम्यान मृत्यूने कवटाळले असल्याची दुःखद घटना घडली आहे.

संदीप नागरे, साम टीव्ही, हिंगोली

हिंगोली : हिंगोली मध्ये शेकडो स्त्रियांची यशस्वी प्रसूती करणाऱ्या हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील परीचारिकेला प्रसूती दरम्यान मृत्यूने कवटाळले असल्याची दुःखद घटना घडली आहे. ज्योती गवळी असे या मयत परीचारिकेचे नाव आहे.

हे देखील पहा :

मागील काही वर्षा पासून त्या हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रसूती कक्षात कर्तव्य बजावत होत्या. दोन नोव्हेंबर रोजी, जिल्हा रुग्णालयात त्यांना नातेवाईकांनी प्रसूती साठी भरती केले. त्यांच्या वर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली. या दरम्यान ज्योती यांनी सुदृढ बालकाला जन्म दिला.

दुसऱ्या दिवशी त्यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना नांदेड येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. शांत संयमी असलेल्या या परिचारिकेच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : गणेशोत्सवात या 4 राशींचे नशीब पालटणार! पैसा, प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठा फायदा; आजचे राशीभविष्य

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

SCROLL FOR NEXT