Bhaskar Jadhav News  Saam TV
महाराष्ट्र

Bhaskar Jadhav : भास्कर जाधव यांना अटक होणार?, ठाण्यानंतर गोंदियातही गुन्हा दाखल

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

साम टिव्ही ब्युरो

गोंदिया : शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण, भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्याविरोधात ठाण्यानंतर आता गोंदियात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांची टिंगल करताना जाधव यांनी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांचा उल्लेख केल्याने गोंदिया येथील आदिवासी समाजाच्या भावना दुखवल्या. (Bhaskar Jadhav News Today)

काय आहे प्रकरण?

१० ऑक्टोबर रोजी ठाण्यात शिवसेनेचा प्रबोधन यात्रेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी शिवसेना नेते भास्कर जाधव, सुषमा अंधारे, विनायक राऊत यांनी आक्रमक भाषणं दिली होती. पण याच भाषणाच्या मुद्द्यावरुन प्रक्षोभक भाषण केल्याचा ठपका ठेवत ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता

यावेळी भास्कर जाधव यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांची टिंगल करताना जाधव यांनी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांचा उल्लेख केला होता. यावरून आदिवासी समाजाच्या भावना दुखवल्या असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली होती.

दरम्यान, आदिवासी बांधवांच्या तक्रारीवरून भास्कर जाधव यांच्याविरोधात गोंदिया आमगाव आणि गोंदिया शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सलग दोन ठिकाणी गुन्हे दाखल झाल्याने आमदार भास्कर जाधव यांच्यावर अटकेची कारवाई होणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sarva Pitru Amavasya 2026: सर्वपितृ अमावस्येला 'या' ७ वस्तू घरात आणू नका; जाणून घ्या धार्मिक मान्यता

MLC Election: पुणे पदवीधर मतदारसंघात ट्विस्ट, भाजपने स्मिता जाधवांना उतरवलं; शरद लाडांच्या हालचालींनी राजकीय वर्तुळात खळबळ

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

SCROLL FOR NEXT