Gunaratna Sadavarte Saam Tv
महाराष्ट्र

गुणरत्न सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटील यांच्यावर अकोल्यात गुन्हा दाखल

एसटी कर्मचाऱ्यांकडून 300 ते 400 रुपये गोळा करून फसवणूक केल्याचा आरोप

अॅड. जयेश गावंडे

अकोला - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानावर झालेल्या हल्ला प्रकरणानंतर मुंबई पोलिसांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर अटकेची कारवाई केली होती. त्यानंतर आता एड गुणरत्न सदावर्ते यांच्या सह त्यांची पत्नी एड जयश्री पाटील व अन्य 2 जणांविरुद्ध अकोट शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यांच्यावर एसटी कर्मचाऱ्यांकडून 300 ते 400 रुपये गोळा करून फसवणूक केल्याचा आरोप आहे. तब्बल 74 हजार कर्मचाऱ्यांना फसवल्याचा आरोप आहे. इतकेच नाही तर न्यायालयात प्रकरण दाखल करण्यासाठी पैसे गोळा केल्याचा देखील त्यांच्यावर आरोप आहे. विजय मालोकार यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जानेवारी महिन्यात मेलोकार यांनी अकोट पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. त्यानंतर आज पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

हे देखील पहा -

दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीत आणखी २ दिवसांची वाढ करण्यात आली आहे.त्यामुळे सदावर्तेंचा जेलमधील मुक्काम वाढला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Strike) शुक्रवारी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवास स्थानाबाहेर आंदोलन केलं. या आंदोलनावेळी काहींनी चपला भिरकावल्या. या आंदोलनात सहभागी झालेल्यांना सदावर्तेंनी चिथावणी दिल्याचा आरोप आहे. मुंबई पोलिसांनी (Police) सदावर्तेंना त्यांच्या घरातून ताब्यात घेतले होते. त्यानंतर पोलीस ठाण्यात नेले. तेथे त्यांची चौकशी केल्यानंतर सदावर्तेंवर गुन्हा नोंदवून अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT