SaamTv
महाराष्ट्र

अर्बन बँक पुन्हा चर्चेत, नगरसेवकासह चौघांनी केला विनयभंग

साम टीव्ही ब्युरो

अहमदनगर : अर्बन बँक गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांवरून चर्चेत आहे. बनावट सोने तारणावरून बरेच पदाधिकारी आणि अधिकारी अडचणीत आले आहेत. आता तर नोकरी लावून देण्याचे नवीन प्रकरण समोर आलेय. नोकरभरतीतही काही गफला झाला की काय अश चर्चा सुरू झाली आहे.

अर्बन बँकेत पतीस नोकरी लावतो, म्हणून पैसे घेऊनही नोकरी लावली नाही. घेतलेल्या पैशाचा तगादा केला असता, मागासवर्गीय महिलेस जातीवाचक शिवीगाळ करुन तिचा विनयभंग केला. या आरोपावरून नगरसेवक कमलेश गांधी यांच्यासह चार जणांविरुद्ध शेवगाव पोलिस ठाण्यात जातिवाचक शिवगाळ केल्याचा व विनभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान अर्बन बँकेतील शाखा व्यवस्थापक गोरक्ष शिंदे यांच्या आत्महत्येची घटना ताजी असतांनाच ही घटना उघडकीस आल्यामुळे अर्बन बँकेतील गैरव्यवहार चव्हाट्यावर आला आहे. या संदर्भात पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सन २०१३ मध्ये ललिता तापडिया व कमलेश गांधी यांनी माझ्या पतीस अर्बन बँकेत नोकरीला लावून देतो, असे म्हणून माझ्या सासूकडे १० लाखांची मागणी केली. त्यातील पाच लाख ५० हजार रुपये रोख घेतले होते. मात्र, पतीस नोकरीस लावून न दिल्याने आमच्यात वाद झाले. त्यानंतर ललिता तापडीया हिने माझ्या पतीविरुध्द धनादेश न वटल्याचा गुन्हा न्यायालयात दाखल केला.

१५ मार्च २०२१ रोजी सकाळी मी घरात एकटीच असताना कमलेश गांधी (रा. शास्त्रीनगर, शेवगाव), ललिता तापडीया, जगदीश तापडीया, शरद जोशी (तिघे रा. देशपांडेगल्ली, शेवगाव) यांनी घरी येऊन जातिवाचक शिवीगाळ केली. मारहाण केली.

दरम्यान आरोपींवर गुन्हा दाखल होत नसल्याने पीडित महिला व तिचे कुटुंबीय दोन दिवसांपासून पोलिस ठाण्यासमोर उपोषणास बसले होते. त्यामुळे शुक्रवारी (ता. ३०)रात्री उशिरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील वारणा धरणातून विसर्ग सुरू, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

कोणत्या देशात iPhone चा वापर सगळ्यात जास्त केला जातो? उत्तर वाचून बसेल धक्का

Maharashtra Politics : एकाची मराठीसाठी तळमळ, दुसऱ्याची खुर्चीसाठी मळमळ; एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंसाठी सॉफ्ट कॉर्नर

Eknath Shinde: दाढीवरून अर्धाच हात फिरवला, पूर्ण फिरवला असता तर...; ठाकरेंच्या पुष्पा स्टाइल टीकेवर एकनाथ शिंदेंचा पलटवार

Chocolate Brownie Recipe: स्नॅक्स टाइमसाठी झटपट बनवा माउथ वाटरिंग चॉकलेट ब्राउनी, नोट करा ही सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT