दुर्गम भागातील रुग्णांसाठी माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या स्थानिक विकास निधीतून रुग्णवाहिका! दिनू गावित
महाराष्ट्र

दुर्गम भागातील रुग्णांसाठी माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या स्थानिक विकास निधीतून रुग्णवाहिका!

नंदुरबार माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या स्थानिक विकास निधीतून धडगाव नगरपंचायत व नंदुरबार नगरपालिकेला प्रत्येकी १ रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत.

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम-अतिदुर्गम भागातील वाड्या पाड्यांवर राहणाऱ्या रुग्णांना वेळेत उपचार मिळावे यासाठी माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते कार्डियाक अँब्युलन्स लोकार्पण.A cardiac ambulance was provided by Chandrakant Raghuvanshi

हे देखील पहा-

नंदुरबार माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या स्थानिक विकास निधीतून धडगाव नगरपंचायत व नंदुरबार नगरपालिकेला प्रत्येकी १ रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्‍यता आरोग्य विभागाने वर्तविली असून, रुग्णांना योग्य वेळी उपचार मिळावे यासाठी रुग्णवाहिकेचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

शिवसेनेचे नेते,माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. जिल्ह्यातील दुर्गम-अतिदुर्गम भागातील वाड्या पाड्यांवर राहणाऱ्या रुग्णांना वेळेत उपचार मिळावे यासाठी धडगाव नगरपंचायतीला १ रुग्णवाहिका देण्यात आली. त्याचप्रमाणे नंदुरबार पालिकेला देखील दोन रुग्णवाहिका सुपूर्द करण्यात आल्या.

याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरे, मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे,पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील,नगरसेवक कुणाल वसावे,सुनील सोनार, अभियंता विशाल कांबळे, गजेंद्र शिंपी,प्रविण गुरव,प्रीतम धंढोरे,प्रेम सोनार, चेतन वळवी,फारूक मेमन,फरीद मिस्तरी,मोहित राजपूत आदी उपस्थित होते.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT