A boyfriend refuses to marry his girlfriend because of different caste Saam Tv
महाराष्ट्र

प्रेमात जात आलीच! शरीरसंबंध ठेवले, पण जातीच्या कारणावरुन लग्नाला दिला नकार

A boyfriend refuses to marry his girlfriend because of different caste : स्पर्धा परिक्षेची तयारी करताना या दोघांची मुंबईत भेट झाली. या भेटीतून त्यांची मैत्री झाली.

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद: प्रेमाला जात-पात नसते असं म्हटलं जातं. पण, 'जात' (Cast) जाता जात नाही हेही एक कटू सत्यच आहे. एका तरुण-तरुणीने जातीची बंधनं तोडत एकमेंकावर प्रेम (Love) केलं. प्रेमात ते इतके वाहून गेले की, त्यांच्यात शारीरिक संबंध (Sex) प्रस्थापित झाले. त्यानंतर अनेकादा त्यांच्यात प्रेमाचे हे क्षण येत गेले. तिला वाटलं की, आता या प्रेमाचं रुपांतर नात्यात करावं, त्यासाठी तिने त्याला लग्नाची मागणी केली आणि इथंच सारं बिनसलं. तिच्या वाटेला जे आलं त्याने 'जात जाता जात नाही' ही म्हण खरी ठरल्याचा प्रसंग औरंगाबादमध्ये (Aurangabad) घडला आहे. एका प्रियकरानं त्याच्या प्रेयसीला जात जुळत नाही म्हणून लग्नाला नकार दिला आहे. (Kept having sex together, but refused to marry Because of Different cast a case of sexual assault and atrocity registered in aurangabad)

हे देखील पाहा -

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात ही घटना घडली आहे. लग्न होण्याअगोदरच शारीरिक संबंध ठेवले आणि लग्नाच्या वेळी जात जुळत नसल्याचं कारण देत लग्न करण्यास एका जातीवादी तरुणाने त्याच्या प्रेयसील नकार दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्पर्धा परिक्षेची तयारी करताना या दोघांची मुंबईत भेट झाली. या भेटीतून त्यांची मैत्री झाली. या भेटी पुढे वाढतच गेल्या आणि पुढे याच मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांमध्ये शारीरिक प्रस्थापित झाले, दोघांनीही अनेकदा शारीरिक संबंध ठेवले. आता या संबंधांचं पवित्र नात्यात रुपांतर व्हाव म्हणून तरुणीने तिच्या प्रियकराकडे लग्नाची मागणी केली. मात्र प्रेयसीने लग्नाची मागणी करताच आपल्या दोघांची जात वेगळी आहे असं म्हणत आपली जात जुळत नाही असं कारण त्याने पुढे केलं आणि लग्नाला साफ नकार देत हा तरुण मोकळा झाला.

नकार मिळाल्याने त्या तरुणीच्या पायाखालची जमीनच सरकरली. ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं, त्याला सर्वस्व अर्पण केलं त्याने केवळ जातीचं कारण सांगत नकार दिल्याने ती तरुणी खचली होती. तरीही तिने अनेक दिवस त्याच्या होकाराची वाट पाहिली. मात्र एवढं करुनही त्याच्याकडून काहीच उत्तर मिळत नसल्याने तरुणीने थेट पोलीस ठाणे गाठले आणि घडलेल्या प्रकाराबाबत पोलिसांत तक्रार दिली. या प्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात बलात्कारासह अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविनाश असं त्या तरुणाचं नाव आहे. तो अहमदनगर जिल्ह्यातील गणोरे इथला असून सध्या पैठणमध्ये राहतो. या घटनेवरुन प्रेम करताना आता जात पाहून प्नेम करावा का? आणि कुणावर किती विश्वास ठेवावा हा प्रश्न पडतो.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT