Osmanabad News Washi News  Saam TV
महाराष्ट्र

Osmanabad : डोक्यात ऑक्सिजन सिलिंडर पडून ९ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, मन सुन्न करणाऱ्या घटनेचा VIDEO समोर

डोक्यात ऑक्सिजनचे सिलिंडर डोक्यात पडल्याने एका ९ वर्षीय बालकाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

Satish Daud

कैलास चौधरी, साम टीव्ही

Osmanabad News : उस्मानाबाद जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. रुग्णालयाबाहेर खेळत असताना डोक्यात ऑक्सिजनचे सिलिंडर डोक्यात पडल्याने एका ९ वर्षीय बालकाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. ही घटना उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी शहरांमध्ये घडली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. (Latest Marathi News)

आर्यन अमर नलवडे (वय ९ वर्ष) असे मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. आर्यन हा वाशी शहरातील एका खासगी हॉस्पिटल समोर खेळत होता. त्यावेळी त्या ठिकाणी ठेवलेले ऑक्सिजनचे सिलेंडर आर्यन याच्या डोक्यात पडले आणि यामध्ये त्याचा मृत्यू झाला. अंगावर काटा आणणाऱ्या घटनेचा व्हिडीओ (Viral Video) समोर आला आहे.

रुग्णालयाच्या समोर ठेवण्यात आलेले ऑक्सिजनचे सिलेंडर अत्यंत बेजबाबदारपणे ठेवण्यात आले होते, असा आरोप करत नातेवाईक यांनी हॉस्पिटलच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला आहे. सध्या हॉस्पिटल परिसरात प्रचंड गर्दी जमली असून तणावाचं वातावरण आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BREAKING: गदारोळानंतर केंद्र सरकारची मोठी कारवाई! शिक्षण विभागातील IAS अधिकाऱ्याची हकालपट्टी, नवीन अधिकाऱ्याचीही नियुक्ती

Maharashtra News Live Update: कॉकरोच जनता पार्टीचा आज पुण्यात मोर्चा

Masala Dosa Recipe: नाश्त्यासाठी घरीच बनवा हॉटेलस्टाईल कुरकुरीत मसाला डोसा, वाचा सोपी रेसिपी

Salt comparison: काळं मीठ आणि सैंधव मीठ यांच्यात काय फरक आहे?

Rain Alert : राज्यात मुसळधार पाऊस, पुण्यासह २० जिल्ह्यांना अलर्ट जारी; वाचा तुमच्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT