Mumbai News Saam TV
महाराष्ट्र

Mumbai News: खळबळजनक! मुंबईत १३ वर्षीय मुलीवर शाळकरी मुलांकडून सामूहिक बलात्कार

मुंबईतील महानगर पालिका शाळेत सोमवारी एका १३ वर्षीय मुलीवर तिच्याच वर्गातील मुलांनी सामुहीक बलात्कार केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai News: मुंबईमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. मुंबईतील महानगर पालिका शाळेत सोमवारी एका १३ वर्षीय मुलीवर तिच्याच वर्गातील मुलांनी सामुहीक बलात्कार केला आहे. या घटनेने शाळेत एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे. (latest Marathi News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीएमसी शाळेत एकाच वर्गात हे विद्यार्थी शिक्षण घेत होते. त्यांच्या शाळेत स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम असल्याने सर्व शिक्षक आणि विद्यार्थी (Students) तिथे गेले असताना ही घटना घडली. शाळेत कोणी नसल्याचे पाहून दोन मुलांनी पीडितेला एका वर्गात डांबून ठेवले. यातील दोन विद्यार्थी वर्गाबाहेर पहारा देत होते. दोन मुलं वर्गात होते.

यातील एकाने तिच्यावर बलात्कार केला. तर दुसऱ्याने तिचा विनयभंग केल्याचे पीडितेने तिच्या आईला सांगितले आहे. सोमवारी हा धक्कादायक प्रकार घडल्यावर मुलगी घरी आली. तेव्हा तिला गुप्त अंगात वेदना होत असल्याचे तिने आईला (Mother) सांगितले. यावेळी तिच्या आईने प्रेमाने तिची चौकशी केली तेव्हा हा प्रकार उघडकीस आल्याचे पोलिस म्हणाले.

सदर घटनेबाबत मुलीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून आता पर्यंत दोघांना अटक करण्यात आली आहे. पोस्को कायद्यांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून, सध्या त्यांना डोंगरीतील बाल सुधारगृहात ठेवले आहे. अन्य दोन जण आजूनही फरार असल्याने पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. चारही मुलं १३ ते १४ वयोगटातील आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

Shadashtak Yog 2026 : ९ ऑक्टोबरपासून धोकादायक योग! ४ राशींवर कोसळणार अडचणींचा डोंगर; तुमची रास तर नाही ना?

जगात पुन्हा लॉकडाऊन लागणार? रशियात लॅबमध्ये 'ती' एक चूक झाली अन् एकाचा मृत्यू; २०० जण क्वारंटाईन

Shreyas Iyer: ‘योग्य वेळ आली की तो राज्य करेल’, वैभव सूर्यवंशीच्या भवितव्याबाबत श्रेयस अय्यरचा मोठा विश्वास

SCROLL FOR NEXT