Crime: 13 वर्षीय अल्पवयीन मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन केली आत्महत्या; मोताळा तालुक्यातील घटना! Saam Tv
महाराष्ट्र

Crime: 13 वर्षीय अल्पवयीन मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन केली आत्महत्या; मोताळा तालुक्यातील घटना!

मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे येथील १३ वर्षीय अल्पवयीन मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाणा: मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे येथील १३ वर्षीय अल्पवयीन मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. तक्रारदार मुलाचे आजोबा जगन्नाथ हुडेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून प्रेम योगेश हुडेकर (वय- १३) रा.धामणगाव बढे असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.

हे देखील पहा-

हा वर्ग सातव्या वर्गात शिकत होता. रात्री सर्व झोपी गेले असता मागच्या खोलीमध्ये जाऊन लोंखडी अँगल ला नायलोनच्या (nylon) दोरीच्या साह्याने गळफास घेतला आहे. मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास आजोबा लघवी करण्याकरिता गेले असता त्यांना मृतक प्रेम हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला आहे. असे तक्रारीत म्हटले आहे. घटनेची माहिती धामणगाव पोलीसांना मिळताच पोलीसांनी (police) घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह खाली उतरवून पंचनाम करून व मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रूग्णालय येथे पाठविला आहे.

आत्महत्या का केली? यांचे कारण अद्याप कळु शकले नाही. धामणगाव पोलीस (police) स्टेशमध्ये गुन्हा दाखल करून आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. या सदर घटनेचा पुढील तपास पो.हे.कॉ. सुरेश सोनुने करत आहे. वडील हे खाजगी वायरमन म्हणुन काम करतात तर प्रेम याला एक छोटी लहान बहिण आहे १० वर्षीय आणि आई, आजी आजोबा असा परिवार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तुळजापुरात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

SCROLL FOR NEXT