Jalna News  Saam TV
महाराष्ट्र

विद्युत पोलचा शॉक लागून 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू; महावितरण कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा

महावितरण कंपनीच्या विद्युत पोलमध्ये उतरलेला विजेचा शॉक लागून या मुलाचा मृत्यू झाला होता.

लक्ष्मण सोळुंके

जालना: महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे एका 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना जालना शहरात काल सायंकाळी घडली होती. महावितरण कंपनीच्या विद्युत पोलमध्ये उतरलेला विजेचा शॉक लागून या मुलाचा मृत्यू झाला होता. मोनू म्हस्के असं या मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचं नाव असून जालन्यातील नूतन वसाहत परिसरातील राहुलनगर भागात ही घटना घडलीय आहे. या घटनेमुळे परीसरात महावितरण विरोधात संताप व्यक्त केला जातोय.

दरम्यान या प्रकरणी मयत मुलाच्या वडिलांनी कदीम जालना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. महावितरणच्या कर्मचाऱ्यांविरोधात ही तक्रार दिली दाखल केली असुन या तक्रारीवरून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून या प्रकरणी महावितरण कर्मचाऱ्यांविरोधात मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी भादवी 304,अ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी पोलीस अधिक तपास करतायत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coriander Storage: फ्रिजमध्ये कोथिंबीर लगेच काळी पडते? मग या ट्रिक्स वापरा 10 दिवस फ्रेश राहील

Maharashtra News Live Update: चंद्रपूर- मनपा आमसभेच्या कोरमवरून महापौर नगरसेवकांमध्ये आरोप प्रत्यारोप

श्रावण कधीपासून सुरु होणार? जाणून घ्या तारीख आणि धार्मिक महत्त्व

Health Care : सतत थकल्यासारखे वाटते का? ' ही' ५ गंभीर लक्षणे फॅटी लिव्हरची असू शकतात, वेळीच ओळखा

Vaidehi Parshurami: पैठणीत खुललं वैदेही परशुरामीचं सौंदर्य; सोज्वळ सौंदर्याने जिंकली चाहत्यांची मनं

SCROLL FOR NEXT