leopard attack Saam Tv News
महाराष्ट्र

Leopard attack in Parner: ९ वर्षीय मुलीवर बिबट्याचा जीवघेणा हल्ला, वडिलांच्या डोळ्यादेखत लाडकीने जीव सोडला

Leopard attack in Kharakwadi village: लघुशंकेसाठी गेलेल्या नऊ वर्षीय मुलीवर बिबट्याने भयंकर हल्ला करून हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथे घडली असून, परिसरात खळबळ उडाली आहे.

Bhagyashree Kamble

अहिल्यानगरच्या पारनेर जिल्ह्यात एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. लघुशंकेसाठी गेलेल्या ९ वर्षीय मुलीवर बिबट्याने भयंकर हल्ला केला. ज्यात मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथे घडली असून, १६ जानेवारीला सांयकाळी ७ वाजेच्या दरम्यान बिबट्याने हल्ला केला होता. रक्तबंबाळ झालेल्या मुलीला रूगण्यालयात नेले असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

ईश्वरी पांडुरंग रोहकले असे मृत मुलीचे नाव आहे. वडिलांसोबत ती घरी गेली होती. लघुशंकेसाठी बाजूला गेली असता, शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर हल्ला केला. तिला मक्याच्या पिकात नेले आणि तिच्यावर हल्ला केला. रक्तबंबाळ झालेली ईश्वरी जोरजोरात ओरडू लागली. मदतीसाठी हाक देऊ लागली.

मुलीची हाक ऐकू आल्यानंतर वडिलांनी मुलीचा शोध घेतला. मुलीच्या आवाजाचा पाठलाग केला. नंतर शेतातून आवाज ऐकू आल्यानंतर वडिलांनी बचावासाठी धाव घेतली आणि तिला बिबट्याच्या तावडीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. रक्तबंबाळ झालेल्या मुलीला ते रूग्णालयात घेऊन गेले. मात्र, उपचारासाठी नेले असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

बिबट्या हल्ला प्रकरणानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. शिवाय मुलीचा बिबट्या हल्ल्यात मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. तर, दुसरीकडे बिबट्याची दहशत लक्षात घेता, वन विभाग आणि संबंधित प्रशासनाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. ृ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

EPFO चा मोठा निर्णय! PF Trustsना मिळणार मोठी संधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT