Palghar Python Video रुपेश पाटील
महाराष्ट्र

Python Video: बापरे! झाडावर ९ फुटांचा अजगर पाहून सर्वांचाच उडाला थरकाप; सर्पमित्रांनी अजगराला कसं पकडलं पाहा

रुपेश पाटील. साम टीव्ही, पालघर

Palghar Python Video: अजगर म्हटलं की नाव ऐकूनच अंगावर शहारे येतात. अख्ख्या प्राण्याला जिवंत गिळून अजगर (Python) काही क्षणातच सर्वकाही फस्त करतो. पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात एक भला मोठा अजगर आढळला आहे. विक्रमगडमधील सुकसाले येथील मुरबी पाड्यात महेंद्र दुमाडा यांच्या घरासमोर असलेल्या एका झाडावर भला मोठा अजगर आढळून आला. हा भला मोठा अजगप पाहून कुणाच्याही काळजाचा थरकाप उडेल. (Palghar Latest News)

पाहा व्हिडिओ -

मिळालेल्या माहितीनुसार, हा अजगर साधारण नऊ फूट लांब होता आणि त्याचे वजन दहा किलो सहाशे ग्राम इतकं होतं. हा अजहर दिसताच सर्वांचीच तारांबळ उडाली. त्यामुळे लागलीच सर्वमित्रांना बोलवण्यात आले. यावेळी सर्पमित्र पार्थ पटेल, चैतन्य सांबरे, पप्पू दिघे आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी या अजगराला पकडले आणि जंगलात सुरक्षितस्थळी सोडले, त्यानंतर सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Festival: दिवाळीला दारात तेलाचा की तुपाचा दिवा लावावा?

Maharashtra Politics : आणखी एक भाजप आमदार तुतारी हाती घेणार ? महत्वाची माहिती आली समोर

Maharashtra Politics: गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई, नागपूरमधील भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

Maharashtra News Live Updates: विधानसभेसाठी पुण्यात मनसेचे उमेदवार तयार?

Bee Attack : शेतात काम करताना मधमाश्यांचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, पत्नी जखमी

SCROLL FOR NEXT