राज्यातील कोरोनामुक्त क्षेत्रात 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरू होणार   Twitter/@ANI
महाराष्ट्र

राज्यातील कोरोनामुक्त क्षेत्रात 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरू होणार

शाळा सुरू केल्या नाही तर भविष्यात त्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढणे कठीण जाईल.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कोरोनाच्या (Corona Virus) पार्श्वभूमीवर राज्यात गेल्या दीड वर्षांपासून शाळा (Schools) बंद आहे. मात्र आता राज्यातील कोरोनामुक्त भागात 8वी ते 12 वीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गेल्या वर्षांपासून शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झालेले आहे. त्यानंतर आता राज्यातील काही भागातील लॉकडाउन (Lockdown) उठविण्यात आले आहे. तसेच या भागातील शाळाही सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. (8th to 12th schools will be started in the corona free zone of the state)

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने १४ जून २०२१ रोजी काढलेल्या पत्रान्वये विदर्भ वगळता राज्यातील इतर भागात तर १५ जून २०२१ पासून व विदर्भात २८ जून २०२१ पासून शैक्षणिक वर्ष सुरु करणेबाबत जाहिर केले आहे. या तारखांपासून शिक्षकांनाही शाळेत उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शाळा बंद असल्यामुळे मुले एक वर्षापासून घरी बसली आहेत व त्यामुळे त्यांच्यावर शारिरीक, मानसिक दुष्परिणाम होत आहे. शिवाय त्यांचे शैक्षणिक नुकसानही होत आहे. तसेच राज्यात कोरोनाचा संसर्ग, आकडेवारी व तज्ञांचे मत लक्षात घेता, सध्या १० वर्षापेक्षा कमी वयोगटाच्या मुलांना कोविड संसर्ग होण्याची सर्वात कमी शक्यता आहे.

तर १८ वयापर्यंतच्या मुलांना सध्यातरी संसर्ग होण्याची शक्यता नाही. मात्र शाळा सुरू केल्या नाही तर भविष्यात त्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढणे कठीण जाईल. शाळा बंद व मुलं घरी राहण्याचे अजून जे दुष्परिणाम लक्षात आले आहेत त्यात सामाजिक (socialzation) कौशल्यांचे नुकसान , मोबाईल (mobile)/ इंटरनेटचा (Internet) गैरवापर व games चा addiction , depression , anine शिक्षणापासून वंचित राहणे त्यामुळे मानसिक तणावामुळे काही मुलांनी केलेली आत्महत्या, घरगुती domestic Wolence चे वाढते प्रमाण, बाल - विवाह, बालमजुरीचे वाढते प्रमाण , मुलींचे घर - शेती कामात ठेवणे आशा अनेक गोष्टींमुळे मोठया प्रमाणावर सामाजिक नुकसान लक्षात आले आहे . त्यामुळे विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणाचा लाभ व्हावा यासाठी कोविड - मुक्त क्षेत्रात शाळा सुरु करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शाळा सुरु करण्यापूर्वी आणि सुरु झाल्यानंतर आरोग्य , स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबतच्या मार्गदर्शक सूचना (SOP) आणि शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे.

शाळा सुरू करण्यासाठी..

राज्य सरकारने जारी केलेल्या परिपत्रकातील तारखेपासून राज्यातील कोविड - मुक्त क्षेत्रात पहिल्या टप्प्यात शाळेतील इयत्ता ८ वी ते इयत्ता १२ वी चे वर्ग सुरु करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

1 ग्रामीण भागात कोविड - मुक्त गावातील ग्रामपंचायतीने त्यांच्या अखत्यारीत असणारे गावातील शाळेतील इयत्ता ८ वी ते इयत्ता १२ वी चे वर्ग सुरू करणेबाबत पालकांशी चर्चा करून ठराव करावा .

2 शाळा सुरू करताना मुलांना टप्प्या - टप्यात शाळेत बोलविण्यात यावे. उदा.वर्गांना अदला बदलीच्या दिवशी / सकाळी - दुपारी , ठराविक core विषयांसाठी प्राधान्य इ

3 कोविड संबंधी सर्व precautions चे काटेकोरपणे पालन करावे . उदा.एका बाकावर एकच विद्यार्थी , दोन बाकांमध्ये ६ फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त १५-२० विद्यार्थी, मास्कचा वापर , सतत हात साबणाने धुणे ,कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठविणे

4 संबंधीत शाळेतील शिक्षकांची राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच गावात करण्यात यावी, किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर न करण्याबाबत दक्षता घ्यावी.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: माणिकराव कोकाटे विजयाच्या उंबरठ्यावर

Protein Bar: प्रोटीन बार तुमच्या शरीरासाठी चांगले आहेत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Maharashtra Election Result : राज्यातील पहिला अधिकृत निकाल, भाजपच्या उमेदवाराचा दणदणीत विजय

Wayanad By Election Result 2024: भावाचा गड राखणार; प्रियंका गांधी २ लाख ३५ हजार मतांनी आघाडीवर

Abhishek Gaonkar : 'सारं काही तिच्यासाठी' फेम अभिनेता चढणार बोहल्यावर; नवरीचा थाटात पार पडला मेहंदी सोहळा, पाहा PHOTO

SCROLL FOR NEXT