Pandharpur Police Saam Tv
महाराष्ट्र

पंढरपुरात 'पुष्पा' चित्रपटाची पुनरावृत्ती, 8 लाखाचे 138 किलो चंदन पकडले

या कारवाईमध्ये पोलिसांनी 8 लाख 28 हजार रुपये किंमतीचे 138 किलो चंदन व एक कार असा एकूण 15 लाख 28 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

भारत नागणे

पंढरपूर - एका अलिशान कारमधून छुप्या मार्गाने चंदनाची वाहतूक करणाऱ्या दोघा चंदनतस्कांना पंढरपूर (Pandharpur) तालुका पोलिसांनी (police) बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईमध्ये पोलिसांनी 8 लाख 28 हजार रुपये किंमतीचे 138 किलो चंदन व एक कार असा एकूण 15 लाख 28 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रमेश महादेव तेलंग रा.पंढरपूर व कचरुद्दीन जमादार रा.मोहोळ अशी या दोघा चंदनतस्करांची नावे आहेत. या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पहा -

एका अलिशान कारमधून बेकायदेशीर पध्दतीने छुप्या मार्गाने चंदनाची वाहतूक केली जात असल्याची माहिती पंढरपूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पंढरपूर तालुका पोलिस निरीक्षक मिलींद पाटील व त्यांच्या सहकार्यांनी तुंगत परिसरात सापळा रचला होता. संशयीत आरोपी मोहोळहून पंढरपूरकडे येत असताना पोलिसांनी तुंगत परिसरात संशयीत कार अडून आली तपासणी केली असता यामध्ये चार पोत्यामध्ये 138 किलो चंदन आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी चंदनासह अलिशान कार देखील जप्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

FDA Action: 904 धाडी, 34.66 कोटींचा मुद्देमाल जप्त; महिनाभरात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर धडक कारवाई

जिम की योगा; वजन कमी करण्यासाठी काय आहे बेस्ट?

Ration Card New Rule: अंत्योदय अन्न योजनेत मोठा बदल; आता रेशनकार्डवर नाव असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मिळेल ७ किलो धान्य

Kalyan : बुद्धभूमी फाउंडेशनच्या जागेप्रकरणी विधानसभेतील माहिती दिशाभूल करणारी; महाथेरो गौतम रत्न यांचा आरोप

Badlapur Crime: बदलापूर हादरले! अनैतिक संबंधावरून कडाक्याचं भांडण, नवऱ्याकडून बायकोची नाक-तोंड दाबून हत्या

SCROLL FOR NEXT