Beed News Saam Tv
महाराष्ट्र

धक्कादायक! भिंत अंगावर पडल्याने 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

स्वच्छतेचे काम करतांना नगर पालिकेच्या जेसीबीमुळं घडली घटना; 5 जणांवर गुन्हा दाखल

विनोद जिरे

बीड - माजलगाव शहरात नगर पालिकेकडून ईद निमित्त, मज्जित परिसर स्वच्छ करण्यासाठी गेलेल्या जेसीबीमुळे भिंत पडल्याने, एक 7 वर्षीय चिमुकली पडलेल्या भिंती खाली दबल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे मज्जित परिसरात घाण नसताना देखील जीसीपी पाठवण्यात आल्याचा आरोप नागरिक करत आहेत. माजलगाव शहरातील इदगा मोहल्ला भागात एक मोठी मस्जिद आहे. या मस्जिद परिसरात घाण काढण्यासाठी, अरुंद रस्त्यामुळं जेसीबी आतमध्ये जात नसताना देखील जेसीबी जबरदस्तीने आतमध्ये घालण्यात आली.

हे देखील पाहा -

सदरील जेसीबी मज्जित समोरील भागात असलेल्या भिंतीजवळ गेली असता, त्या ठिकाणची भिंत जेसीबीमुळे पडली. ही भिंत पडली तेव्हा त्या रस्त्यावरून सय्यद इक्रा सय्यद निसार वय 7 ही मुलगी जात होती. यादरम्यान तिच्या अंगावर भिंत पडली. त्यामुळे ती जागीच दबली गेली.

मात्र ही बाब जेसीबी चालकाच्या लक्षात आल्याने, त्याने जेसीबीच्या खो-याने पडलेली भिंत अलीकडे घेत असताना, सदरील खोरे हे मुलीला लागल्याने तिचा चेंदामेंदा झाला. ही बाब लक्षात येताच जेसीबी चालकाने तेथून धूम ठोकली, व तो का पळत आहे ? हे पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांना सदरील मुलगी मयत झाल्याचे दिसून आले.

यानंतर संतप्त जमावाने जेसीबीच्या सर्व काचा फोडल्या. यामुळं माजलगावमध्ये प्रचंड प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तर नागरिकांमधून संताप देखील व्यक्त करण्यात हेत आहे. दरम्यान याप्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा जेसीबी चालक, जेसीबी मालक व ठेकेदारसह अन्य 2 जणांवर 279, 304-A, 34, 134, 3, 5 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

Shadashtak Yog 2026 : ९ ऑक्टोबरपासून धोकादायक योग! ४ राशींवर कोसळणार अडचणींचा डोंगर; तुमची रास तर नाही ना?

जगात पुन्हा लॉकडाऊन लागणार? रशियात लॅबमध्ये 'ती' एक चूक झाली अन् एकाचा मृत्यू; २०० जण क्वारंटाईन

Shreyas Iyer: ‘योग्य वेळ आली की तो राज्य करेल’, वैभव सूर्यवंशीच्या भवितव्याबाबत श्रेयस अय्यरचा मोठा विश्वास

SCROLL FOR NEXT