Nashik Accident  Saam Tv
महाराष्ट्र

ट्रॅक्टर-कारचा भीषण अपघात; ७ जण जागीच ठार, १६ जण जखमी

वणीजवळ दोन ट्रॉलीमध्ये मजुरांना घेवून जाणाऱ्या ट्रॅक्टर चालकाच ट्रॅक्टर वरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

नाशिक: नाशिक (Nashik) जिल्ह्यातील वणी जवळ ट्रॅक्टर आणि कारच्या अपघातात (Accident) ७ जणांचा जागीच मृत्यू तर १६ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वणीजवळ दोन ट्रॉलीमध्ये मजुरांना घेवून जाणाऱ्या ट्रॅक्टर चालकाच ट्रॅक्टर वरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे.

या अपघातात ७ जणांचा जागीच ठार झाले तर १६ जण जखमी झाले आहेत. कारवर टॅक्टरची ट्रॉली पलटी झाल्यामुळे कार ट्रॉलीखाली चिरडली. ट्रॉली मजूरांना घेऊन जात होती.

या अपघातात जखमी झालेले सर्वजण जळगाव जिल्ह्यातील आहेत. यातील १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. सुरेखा अशोक शिंदे, लक्ष्मण अशोक शिंदे, संगीता पोपट पवार, आकाश पोपट पवार, तनु दीपक गायकवाड, अनुष्का दीपक गायकवाड, मनीषा दीपक गायकवाड, गणेश बापू पवार, विशाल बापू पवार, गणेश बापू पवार, प्रिया संजय म्हस्के, अजय नवल बोरसे, अशी जखमींची नावे आहेत. जखमी झालेले सर्वजण जळगाव जिल्ह्यातील आहेत.

या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. यात ३ महिला, २ पुरुष व एका लहान मुलीचा समावेश आहे, यातील ६ पैकी तीन मृतांची ओळख पटली आहे. सरला बापू पवार (वय ४५), बिबाबाई रमेश गायकवाड(वय ४०), वैशाली बापू पवार( वय ४) हे सर्वजण राहणार जळगाव जिल्ह्यातील उंदिरखेदा येथील आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुष्काळाच्या पाहणी दौऱ्याला दांडी; जिल्हाधिकाऱ्यांनी केज तहसीलदारांचा पदभार तडकाफडकी काढला

Maharashtra News Live Update: मुंबई आणि उपनगरात ढगांच्या गडगडासह जोरदार पाऊस

१ मेसेजचे १४ पैसे घेणार WhatsApp! १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम, तुमच्यावर काय परिणाम?

Skipping Dinner For Diabetes: रात्रीचे जेवण टाळल्याने डायबिटीज कंट्रोलमध्ये राहतो का? रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो? जाणून घ्या

Whatsapp Account Imporatant Tips: एका छोट्याशा चुकीमुळे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन होऊ शकते का?

SCROLL FOR NEXT