अकोल्यात 65 हजार बायोडीझल जप्त; सव्वा कोटींच्या साहित्यासह आरोपींना अटक जयेश गावंडे
महाराष्ट्र

अकोल्यात 65 हजार बायोडीझल जप्त; सव्वा कोटींच्या साहित्यासह आरोपींना अटक

पोलिसांनी चौघांना अटक केली असून दोन जण फरार

अॅड. जयेश गावंडे

अकोला - प्रतिबंधित असलेले बायोडिझल विक्री करणार्‍या पंपावर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून एक कोटी 26 लाख 45 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये चौघांना अटक केली असून दोन जण फरार आहेत. या दोघांचाही शोध पोलीस घेत आहे. याप्रकरणी खदान पोलीस ठाण्यात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रसन्न अजय तापडीया यांचे मलकापूर शिवारात मलकापूर येवता जाणार्‍या रस्त्यालगत शेत सर्वे नं. 74 हे शेत त्यांनी अभय अनुप राठी यास भाडेपट्ट्यावर दिले आहे. तसेच संगणमत करून त्याठिकाणी शासनाने प्रतिबंधित केलेल्या बायोडिझल, रिनेबल डिझल हे मानवी जिवितास धोका निर्माण होईल, अशा पद्धतीने पेट्रोलजन्य ज्वलनशिल डिझल विक्री करीत आहे. या माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी याठिकाणी छापा टाकला.

हे देखील पहा -

या छाप्यामध्ये टँकर एमएच - 46 - बीएम - 2331 किंमत 30 लाख ज्यामध्ये 30 हजार लिटर बायोडीझल किंमत 24 लाख रुपये, 16 लाख रुपयांचे 20 हजार लिटर बायोडिझलने भरलेला टँकर क्रमांक एमएच - 30 - एल - 2087 किंमत 25 लाख, चार हजार लिटर बायोडिझल किंमत 3 लाख 20 हजार रुपये टँकर क्रमांक एमएच 30-एल - 1751 किंमत 25 लाख रुपये जप्त केला आहे. तसेच दोन डिस्पेंशन मशीन किंमत तीन लाख रुपये, दोन इलेक्ट्रीक मोटर पंप किंमत 16 हजार व इतर साहित्य असा एकूण एक कोटी 26 लाख 45 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये रोहन नंदु बिटनी, शेख समीर शेख हज, जावेद हुसेन सफदर हुसेन, जयहिंद ज्ञानोबा सानप, यांना अटक करण्यात आली आहे. तसेच प्रसन्न अजय तापडीया व अभय अनुप राठी हे दोघे फरार होण्यात यशस्वी झाले असून त्यांचा शोध पोलिस घेत आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक नितीन चव्हाण, संतोष गवई, मोन्टी यादव, शक्ती कांबळे, विरेंद्र लाड, उदय शुक्ला, पवन यादव, नफीज शेख, विजय कबले, गणेश सोनवणे, गिता अवचार, सतीश गुप्ता, सुशिल खंडारे यांच्यासह आदींनी केली.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Maharashtra News Live Update: राहुल गांधी मांजरीत विद्यार्थ्यांच्या भेटीला येणार

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

UP Accident News : महामार्गावर भीषण अपघात; डंपरमध्ये अडकून ५० मीटर फरफटत गेली कार, आई-वडिलांसह दोन मुलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT