Crime : 15 दिवसात 5 घरफोड्या! सशस्त्र दरोड्यात 6 लाखाचा ऐवज लुटला राजेश काटकर
महाराष्ट्र

Crime : 15 दिवसात 5 घरफोड्या! सशस्त्र दरोड्यात 6 लाखाचा ऐवज लुटला

चोरट्यांनी शेख यांना धमकावत घरातील महिलांना मारहाण करत सोने आणि रोख रक्कम असा तब्बल 6 लाखाचा ऐवज पळवला आहे.

राजेश काटकर

परभणी : सेलू शहरातील गुलमोहर कॉलोनी येथील व्यापारी शेख सिद्दिक शेख मोईन बागवान यांच्या घरी गुरुवारी आज पहाटे 3 वाजेच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला आहे. चोरट्यांनी शेख यांना धमकावत घरातील महिलांना मारहाण करत सोने आणि रोख रक्कम असा तब्बल 6 लाखाचा ऐवज पळवला आहे. सिद्दिक बागवान हे आपल्या भावासह गुलमोहोर कॉलनी येथे राहतात.

हे देखील पहा :

आज पहाटे 3 वाजेच्या सुमारास 5 ते 6 चोरट्यांनी छतावरील जिन्याचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर आतील सर्व खोल्यांची कडी लावली. दरम्यान, एका खोलीत प्रवेश करीत चोरट्याने झोपलेल्या महिलांना चाकूचा धाक दाखवत अंगावरील व घरातील सोन्याचे दागिने रोख रक्कम घेतली. घरातील इतरांना जाग आल्याने चोरट्यांनी त्यांना पण मारहाण करत तेथून पळ काढला.

चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असता समोरील लोया नामक व्यक्तीच्या शेतातून पसार होण्यास हे भामटे यशस्वी झाले. घटनास्थळी पोलिसांनी दाखल होत पंचनामा करून पाहणी केली. चोरट्यांनी जवळ पास 5 लाखाचे सोने व रोख 1 लाख रोख रक्कम चोरून नेली आहे. चोरट्यांजवळ तलवार, गुप्ती, चाकू, गज अशी धारदार शास्त्रे होती. त्यांनी लहान मुलांसह सर्वांना मारहाण केली आहे. त्यामध्ये सिद्दीक बागवान यांचे दात पडले तर रजिया बेगम याच्या नाकाला जखम झाली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lawrence of Punjab: 'लॉरेन्स ऑफ पंजाब' वादाच्या भोवऱ्यात; रिलीजआधीच बंदीची मागणी; नेमकं कारण काय?

Maharashtra News Live Update: पुण्यात भाजपच्या महिला मोर्चाचे काँग्रेस पक्षाविरोधात आंदोलन

Diva - Chiplun Railway : कोकणवासीयांठी आनंदवार्ता! दिवा- चिपळूण विशेष मेमू धावणार, कधी आणि कुठून किती वाजता सुटणार? वाचा

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! बेसिक सॅलरी १८,००० वरुन ७२,००० होणार? कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत तरी काय?

Petrol-Diesel Price: खरंच पेट्रोल-डिझेल २५ ते २८ रुपयांनी महागणार? आज तुमच्या शहरातील दर किती? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT