Palghar News Saam TV
महाराष्ट्र

Palghar News: बोईसरमध्ये ५ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; नराधमाने दिली जीवे मारण्याची धमकी

आपण केलेलं कृत आज ना उद्या मुलगी घरी सांगेलच त्यामुळे आरोपी बोईसरमधून पळून जाण्याच्या तयारीत होता.

साम टिव्ही ब्युरो

Palghar News: बोईसरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पाच वर्षीय चिमुकलीवर एकवीस वर्षीय तरुणाने अत्याचार केला आहे. या घटनेत आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, बोईसर पूर्वेत ही घटना घडली आहे. ५ वर्षीय चिमुकली घराबाहेर खेळत होती. त्यावेळी शाहनवाज मिराज शहा या २१ वर्षीय तरुणाने तिला खाऊ देणार असे सांगत स्वत:कडे बोलवून घेतले. त्यानंतर तो तिला आपल्या घरात घेऊन गेला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेने चिमुकली फार भयभीत झाली होती.

चिमुकलीला जीवे मारण्याची धमकी

शाहनवाजने लहान मुलीवर अत्याचार केल्यावर तिने घरी कोणाला काही सांगू नये म्हणून तिला धमकी देखील दिली. घरी किंवा इतर कोणालाही काही सांगितल्यास मी तुझा जीव घेईल, असे तो म्हणाला. यामुळे चिमुकली फार घाबरली. मात्र घरी गेल्यावर तिने आईला घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी लगेच पोलिसांत धाव घेतली.

नराधम उत्तर प्रेदेशमध्ये जाण्याच्या तयारीत

आपण केलेलं कृत आज ना उद्या मुलगी घरी (Home) सांगेलच त्यामुळे आरोपी बोईसरमधून पळून जाण्याच्या तयारीत होता. तो उत्तर प्रदेशमध्ये जाणार होता. मात्र तक्रार दाखल केल्यावर लगेचच पोलिसांनी त्याचा शोध घ्यायला सुरूवात केली. त्यामुळे काही तासांतच पोलिसांना (Police) त्याच्या मुसक्या अवळण्यात यश आलं. बोईसर पोलीस ठाण्यात त्याच्यावर ३७६ आणि ५०६ पोस्कोसह विविध कलामांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या प्रकरणाचा अधिक तपास बोईसर पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोल्हापुरात स्लॅब कोसळून दोन कामगार अडकले; अग्निशमन दलाची तत्पर कारवाई

Crime news: मस्करी ठरली जीवघेणी! मित्राच्या गुप्तांगात भरली कंप्रेसरने हवा; पोट फुटून बाहेर आली आतडी, तरूणाचा मृत्यू

कल्याण-डोंबिवलीत वर्दळीच्या ठिकाणी धोकादायक इमारती; हजारो नागरिकांचा जीव धोक्यात, प्रशासन कधी कारवाई करणार?

Sugar VS Honey: मध की साखर, उन्हाळ्यात काय खाणे शरीरासाठी बेस्ट

Iran: मोठी बातमी! जगाला पुन्हा हादरा बसला, इराणने घेतला मोठा निर्णय; भारतालाही बसणार फटका

SCROLL FOR NEXT