Solapur Accident  Saam Tv
महाराष्ट्र

भाविकांवर काळाचा घाला; सोलापुरात ट्रकवर कार आदळून 5 ठार

मिरज येथून पंढरीच्या श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन नऊ जण चारचाकीतून अक्कलकोट श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जात होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोलापूर: मिरज येथून पंढरीच्या श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन नऊ जण चारचाकीतून अक्कलकोट श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जात होते. त्यावेळी सोलापूर (Solapur) कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे. चालकाला डुलकी लागली आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. सोलापूर- हैदराबाद (Hyderabad) महामार्गावर थांबलेल्या ट्रकला चारचाकीने मागून जोरात धडक दिली आहे.

हे देखील पाहा-

या अपघातात (accident) ५ जणांचा मृत्यू झाला, तर ४ गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सोलापुरातील शासकीय रुग्णालयात (hospital) उपचार सुरु आहेत. हुबळी येथील शितोळे कुटुंबीय मिरज येथील नातेवाईक जाधव यांच्या मिरजेतील (Miraj) घरी गेले होते. रात्री ९ जण इनोव्हा गाडीतून पंढरपूर (Pandharpur) येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले होते. विठ्ठलाचे दर्शन घेऊन ते दुपारच्या सुमारास अक्कलकोटला निघाले होते. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास त्यांची गाडी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ आली.

दुपारच्या सुमारास महामार्गावर वाहनेही कमी होती. यामुळे इनोव्हा चालकाने गाडीचा वेग कमी केला नाही. बाजार समिती दीडशे मीटर अंतरावर असतानाच अलिकडे महामार्गावर एका बाजूला थांबलेल्या ट्रकला इनोव्हाने मागून जोरात धडक दिली. यामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर मोठा आवाज झाल्याने परिसरातील लोक लगेचच तेथे दाखल झाले. पोलिसही काही वेळात त्याठिकाणी आले आणि त्यांनी जखमींना पहिले बाहेर काढून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठविले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT