Corona Vaccination: महाराष्ट्रात पाच कोटी नागरिक लसवंत! Saam Tv
महाराष्ट्र

Corona Vaccination: महाराष्ट्रात पाच कोटी नागरिक लसवंत!

महाराष्ट्राच्या कोरोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत सोमवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत 6 लाख 8 हजार नागरिकांना लस देण्यात आली. त्यामुळे राज्यात या मोहिमेत दिलेल्या एकूण डोसेसची संख्या 5 कोटींवर गेली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: महाराष्ट्राच्या कोरोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत सोमवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत 6 लाख 8 हजार नागरिकांना लस देण्यात आली. त्यामुळे राज्यात या मोहिमेत Vaccination Drive दिलेल्या एकूण डोसेसची संख्या 5 कोटींवर गेली आहे. देशभरात महाराष्ट्राने उत्तर प्रदेश नंतर ही विक्रमी कामगिरी केली आहे.

हे देखील पहा-

आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले की, राज्यात 14 ऑगस्ट रोजी राज्यात एकाच दिवशी 9 लाख 64 हजार 460 नागरिकांना लस देऊन आतापर्यंतची सर्वाधिक लसवंतांची संख्या नोंदविली होती. सोमवारी Monday झालेल्या लसीकरणच्या सत्रांमध्ये सायंकाळी सहा वाजेपर्यंत 6 लाख 8 हजार नागरिकांचे लसीकरण झाले.

या कामगिरीसाठी आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे Rajesh Tope यांनी केले आहे. या लसीकरण मोहिमेत सोमवारी 6 लाख 8 हजार नागरिकांना लस देण्यात आली. त्यासोबतच राज्यात एकूण डोसेसच्या संख्येने 5 कोटींचा टप्पा पार केला. उत्तर प्रदेश पाठोपाठ देशात महाराष्ट्राने ही विक्रमी कामगिरी केली.

मात्र याआधी, पुरेसा लसपुरवठा न झाल्याने अनेकदा मुंबई Mumbai, पुण्यासारख्या Pune महानगरांत लसीकरण थांबवावे लागले आहे. या स्थितीतही महाराष्ट्र राज्याने पाच कोटी नागरिकांना आतापर्यंत लस देऊन लसीकरणाचा मोठा टप्पा गाठला आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोलापूर शासकीय रुग्णालयातील बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या प्रकरणाची व्याप्ती वाढली

RBI Repo Rate : कर्जदारांसाठी मोठी बातमी! रिझर्व्ह बँकेने घेतला 'हा' निर्णय; तुमचा EMI कमी होणार की वाढणार?

School Shut Down : शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवणारा अहवाल! ९२,००० शाळांना टाळं; कारणे आली समोर

Guhagar Fort : समुद्राला कवेत घेऊन दिमाखात उभा, पावसाळ्यात नक्की पाहा गुहागरजवळील 'हा' किल्ला

मोदी सरकारला मोठा धक्का! ३ खासदारांचा NDA ला रामराम, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT