Gondia Crime News अभिजीत घोरमारे
महाराष्ट्र

Gondia : देवरी चेक पोस्टवर 47 किलो गांजा जप्त; आरोपीला पोलिसांनी केली अटक

या गांजाची किमंत बाजारात अंदाचे 4 लक्ष 72 हजार रुपये सांगण्यात येत आहे.

अभिजीत घोरमारे

भंडारा: गोंदिया जिल्हा (Gondia) पोलिसांनी अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला आहे. ट्रकमध्ये 47 किलो गांजाची तस्करी करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. सोबतच गांजाच्या तस्करीसाठी वापरण्यात आलेला ट्रकही जप्त करण्यात आला आहे. गोंदिया जिल्ह्याच्या देवरी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

या कारवाईत पोलिसांनी तब्बल 47 किलो गांजा जप्त (Seized) केला असून त्याची किंमत 4 लाख 72 हजार 820 रुपये इतकी आहे. तसेच वाहनाची किमंत 15 लक्ष रुपये इतकी आहे. असा एकूण 19 लक्ष 72 हजार रुपयांचा मुद्देमाल गोंदिया पोलिसांनी जप्त केला आहे. (Gondia Crime News)

हे देखील पाहा

देवरी पोलीसांनी गुप्त माहितीच्या आधारे राष्ट्रीय महामार्गावरील 6 सीमा शुल्क तपासनी नाका शिरपुर/बांध येथे नाका बंदी केली होती. यादरम्यान रायपुरहून नागपूरकडे जात असलेल्या संशयित सहाचाकी वाहन क्रमांक MH 04 KU 4068 ची झडती पोलिसांनी घेतली. यावेळी त्या वाहनात तब्बल 47 किलो गांजा आढळून आला. या गांजाची किमंत बाजारात अंदाचे 4 लक्ष 72 हजार रुपये सांगण्यात येत आहे. या प्रकरणी सदर आरोपीला देवरी पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास ठाणेदार स्वत: करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्याच्या भाजप प्रवेशाचा तिसरा अंक आज मुंबईत

रेल्वेच्या डब्यावर X चिन्ह का असतं?

Body Shaping Tips : जिमला न जाता घरीच बनवा बॉडी, या 5 गोष्टी 15 दिवस करा फॉलो

Maharashtra Politics: ठाकरे बंधुंच्या युतीनंतर भाजपची मोठी खेळी, बालेकिल्ल्यात शिवसेनेला पाडलं भगदाड; ३ दिग्गज नेते गळाला

Krishnaraaj Mahadik: महाडिकांची तिसरी पिढी राजकारणात; कृष्णराज महाडिक महापालिका निवडणूक लढवणार

SCROLL FOR NEXT