Shirdi News Saam TV
महाराष्ट्र

Shirdi News: साई चरणी ४६ लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण; नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मोठे दान

बेंगलोरच्या एका कुटुंबाने साई चरणी ४६ लाख ७० हजार रुपये किंमतीचा सोन्‍याचा मुकुट साई चरणी दान केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

सचिन बनसोडे

Shirdi News: नवीन वर्षाची सुरूवात होताच अनेक भावीकांनी साई दर्शनासाठी गर्दी केली आहे. बेंगलोरच्या एका कुटुंबाने साई चरणी ४६ लाख ७० हजार रुपये किंमतीचा सोन्‍याचा मुकुट साई चरणी दान केला आहे. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांना हा मुकुट सुपुर्त करण्यात आला आहे. (Latest Shirdi News)

बेंगलोर येथील साईभक्त राजा दत्‍ता आणि शिवानी दत्‍ता या दाम्पत्यानी नववर्षानिमित्त ९२८ ग्रॅम वजनाचा ४६ लाख ७० हजार रुपये किंमतीचा सोन्‍याचा मुकुट साईबाबांना देणगी स्वरूपात दिला आहे. दानशूर साईभक्ताच्या इच्छेखातर आज हा सुवर्ण मुकूट साई मूर्तीला परिधान करण्यात आलाय. या मुकूटावर अमेरिकन डायमंड असून ओमची छबी रेखाटण्यात आली आहे.

अनेक वर्षांपासून साईबाबांना सोन्याचे आभूषण देण्याचा राजा दत्ता आणि शिवानी दत्ता या दाम्पत्याचा मानस होता. सोने वितळवताना त्याचा आकार मुकूटासारखा झाल्याने ही बाबांची इच्छा समजून सुवर्णमुकूट बनवून तो दान दिल्याचे शिवानी दत्ता यांनी म्हटले आहे. सध्या या दाम्पत्याची सर्वत्र चर्चा होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday horoscope: या ४ राशींच्या लोकांसाठी मंगळवारचा दिवस महत्त्वाचा; नोकरी आणि पैशांच्या बाबतीत काय घडणार?

सरकारचे 200 अधिकारी आमच्या संपर्कात; राहुल गांधींच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

पुणेकरांनो ऐकलं का! शहरात १० टक्के पाणी कपात; पुणे महापालिकेचा पाणी बचतीसाठी नवीन प्लॅन काय?

Nigdi Crime : मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पुण्यातील निगडीत संताप

Maharashtra News Live Update: राज्यातील शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील ३ लाख ५१ हजार शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर

SCROLL FOR NEXT