Lightning Strike Saam tv
महाराष्ट्र

Lightning Strikes News: राज्याला अवकाळी पावसाचा तडाखा; वेगवेगळ्या घटनांमध्ये वीज कोसळून चौघांचा मृत्यू, जनावरेही दगावले

Lightning strikes News: राज्यात वीज पडल्याने चौघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अहमदनगर, परभणी आणि चंद्रपूरमध्ये वीज कोसळण्याची घटना घडली आहे

Vishal Gangurde

Lightning Stikes News: राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरु आहे. वादळी वाऱ्यासह सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा तडाखा नागरिकांना बसला आहे. राज्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अहमदनगर, परभणी आणि चंद्रपूरमध्ये वीज कोसळण्याची घटना घडली आहे. (Latest Marathi News)

अहमदनगरच्या भेडार्पूर गावात प्रमोद भाऊसाहेब दांगट (वय ४२), अलका रामदास राऊत (वय ५०) या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर परभणीत १७ वर्षीय गणेश अजीराम जाहानेचा मृत्यू झाला. तर चंद्रपूरमध्ये बाबू सिंह नावाच्या कामगाराचा मृत्यू झाला आहे.

परभणीतील जिंतूर तालुक्यातील पांगरी शिवारात अचानक वीज कोसळल्याने मेंढपाळ युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले तर २० च्या वर शेळ्या ठार झाल्याची घटना घडली. आज बुधवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान जखमींवर प्राथमिक उपचार ग्रामीण रुग्णालयात जिंतूर येथे उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

शेतात अचानक वीज कोसळल्याने शेळीपालन करणारा युवक गणेश अजीराम जाहाने (वय 17 वर्ष) याच्या अंगावर वीज पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर बाळू मुंजाभाऊ लोणकर (19 वर्ष रा.) चांदज ता. जिंतूर, माधव आत्माराम मांदळे( 22 वर्षे) रा. पांगरी ता. जिंतूर हे युवक गंभीर जखमी झाले आहेत.

तर चंद्रपूरमध्येही अंगावर वीज कोसळून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. वीज (lightning) कोसळल्यामुळे कोळसा खाण कामगाराचा मृत्यू झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातल्या वकोली खाण परिसरात ही घटना घडली. बिहारचा मूळ असलेल्या बाबू सिंह यांचा या अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart attack - घरी एकटे असताना हार्ट अटॅक आला तर काय कराल? 'या' ३ गोष्टी वाचवू शकतात तुमचा जीव

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला नाही तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT