4 passed away due to heat stroke in vidharbha says nagpur health department  Saam Digital
महाराष्ट्र

Heat Stroke: पूर्व विदर्भात उष्मघाताचे 48 रुग्ण, चाैघांचा मृत्यू; अशी घ्या काळजी, Video

Heat Wave In Vidharbha : उष्माघाताने मृत्यू झाला का यासाठी मृत व्यक्तीची पार्श्वभूमी, झालेले उपचार, वैदकीय तज्ञांशी चर्चा करून त्यावर अंतिम निर्णय घेतला जाताे अशी माहिती डॉ. प्रमोद गवई (सहायक संचालक, आरोग्य विभाग, नागपूर) यांनी दिली.

Siddharth Latkar

- पराग ढाेबळे

सध्या पूर्व विदर्भात तापमानाचा पारा 45 अंशवर जाऊन पोहोचलेला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये एकट्या नागपूर शहरांत 8 पेक्षा जास्त बेघरांच्या मृत्यूची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून विविध पोलीस स्टेशनमध्ये नोंद घेतली आहे. दरम्यान उष्मघाताने पूर्व विदर्भात केवळ चार संशयितांची मृत्यूची नोंद झाल्याचा दावा आरोग्य विभागाने केले आहे. अद्या अंतिम अहवाल येणे बाकी असल्याचेही आराेग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

पूर्व विभागातील सहा जिल्ह्यात 48 रुग्ण उष्मघाताचे रुग्ण दाखल झाले होते. त्यापैकी चार जणांचा मृत्यू उष्मघाताने झाल्याचं संशय आहे. यात वर्धा येथे 3 आणि भंडारा जिल्ह्यात एक रुग्णाचा उष्मघाताने मृत्यू झाल्याचा संशय आहे. मात्र अद्याप त्यांचा मृत्यू कशाने झाला याचा अहवाल आलेला नाही.

उपचार घेतलेल्या रुग्णांची एकूण नोंद : 48

नागपूर ग्रामीण (जिल्ह्यात) : 15

नागपूर महानगर पालिका क्षेत्र : 05

भंडारा : 06 रुग्ण नोंद, 01 संशयित मृत्यू

गोंदिया - 09

गडचिरोली - 07

वर्धा - 06, तीन संशयितांचा मृत्यू.

यात विशेष म्हणजे सर्वाधिक तापणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात एकही उष्मघाताचा रुग्ण नोंदवला गेलेला नाही.

उन्हापासून असा करा बचाव

- आवश्यकता असेलच तरच घराबाहेर पडा.

- घरातून बाहेर पडताना टाेपी, छत्री जवळ बाळगा.

- पाण्याची बाटली साेबत ठेवा.

- पांढरे सुती कपडे वापरा.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

डान्सरचा धांगडधिंगा, कारवाईचा बडगा; निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह 8 डान्सर्सवर गुन्हा

Fact Check: मंदिर पाडलं, हनुमान हलेना? 1000 वर्षांपूर्वीची प्राचीन मूर्ती असल्याचा दावा?

SCROLL FOR NEXT