Washim Accident Latest News SAAM TV
महाराष्ट्र

Washim Accident : २ दुचाकी समोरासमोर धडकल्या, भीषण अपघातात महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानाचा मृत्यू

Accident at Washim Latest News : दोन दुचाकी समोरासमोर धडकून झालेल्या भीषण अपघातात महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. समृद्धी महामार्गावर वाशिमच्या मालेगाव टोल प्लाझावरून खाली उतरत असताना हा अपघात झाला.

Nandkumar Joshi

मनोज जयस्वाल, वाशिम | ता. ११ जानेवारी २०२४

Bike Accident near samruddhi mahamarg at Washim :

दोन दुचाकी समोरासमोर धडकून झालेल्या भीषण अपघातात महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. समृद्धी महामार्गावर वाशिमच्या मालेगाव टोल प्लाझावरून खाली उतरत असताना ही दुर्घटना घडली.

दीपक कदम (वय 32) असे या अपघातात मृत्यू झालेल्या जवानाचं नाव आहे. वाशिमच्या मालेगाव टोल प्लाझावरील ड्युटी संपवून दुचाकीवरून परतत असताना काळाने झडप घातली. साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दीपक हे समृद्धी महामार्गावरील (samruddhi highway) वाशिमच्या मालेगाव टोल प्लाझावरून ते दुचाकीने जात होते. त्याचवेळी त्यांच्या आणि समोरून येणाऱ्या दुचाकीची धडक झाली. या भीषण अपघातात (Accident News) त्यांचा मृत्यू झाला. दीपक हे समृद्धी महामार्गावरील (samruddhi mahamarg) मालेगाव टोल प्लाझावर (Malegaon Toll Plaza) कार्यरत होते.

दीपक हे मालेगाव टोल प्लाझावरील ड्युटी संपवून आपल्या दुचाकीने घरी परतत होते. त्याचवेळी विरुद्ध दिशेनं येणाऱ्या दुचाकी त्यांच्या दुचाकीला (Bike Accident) धडकली. अपघात इतका भीषण होता की दीपक यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दुचाकीवरील व्यक्ती जखमी झाल्याची माहिती समजते.

भरधाव कारची दुचाकीला धडक, भंडाऱ्यातील लाखनी पोलिसांत गुन्हा

भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात लाखनी तालुक्यातील रेंगेपार (कोठा) येथे झाला. या प्रकरणी लाखनी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

लाखनी तालुक्यातील रेंगेपार (कोठा) येथे शंकरपट पटाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने शंकरपट पाहण्यासाठी दुचाकीस्वार जात होता. त्याचवेळी भरधाव कारने धडक दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सौरऊर्जा प्रकल्पात १२२.५८ कोटींचा मोठा फसवणूक प्रकार; 'या' चार कंपन्यांविरुद्ध गुन्हे दाखल

Holi 2026 : होळी खेळण्यापूर्वी 'हे' १ काम करा, रंगाचा डागही पडणार नाही अन् चेहरा हिऱ्यासारखा चमकेल

Salim Khan: सलीम खान यांना भेटायला हॉस्पिटलमध्ये गेले अमिताभ बच्चन अन् जावेद अख्तर; व्हायरल फोटचं नेमकं सत्य काय?

Viral Video: जवळ गेला, मुलीच्या कपड्यांना हात लावला आणि...! भर रस्त्यात तरूणाने मुलीची काढली छेड; व्हिडीओ व्हायरल

Raj Thackeray : 'सुख पाहता...' राज ठाकरेंनी सांगितली ३७ वर्षांपूर्वीची अविस्मरणीय आठवण, पोस्टमधून दिसली ती तळमळ

SCROLL FOR NEXT