Maratha Reservation Saam TV
महाराष्ट्र

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी ३० वर्षीय तरुणाची तलावात उडी घेऊन आत्महत्या

Maratha Reservation: धाराशिवमधून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी एका ३० वर्षीय तरुणाने तलावात उडी घेत आत्महत्या केलीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Maratha Reservation:

मराठा आरक्षणाचा मुद्दा पेट घेण्याची शक्यता आहे. जालन्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन चालू आहे. जरांगे पाटलांच्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. इतकेच नाही तर सरकारही त्यांच्या मागण्यापुढे झुकताना दिसत आहे. अशातच धाराशिवमधून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी एका ३० वर्षीय तरुणाने तलावात उडी घेत आत्महत्या केलीय.(Latest News on Maratha Reservation)

किसन चंद्रकांत माने, असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. किसन माने हा उमरगा तालुक्यातील माडज येथील रहिवाशी होता. मराठा समाजाला आरक्षण मिळाणं गरजेचं आहे, असं म्हणत किसनने तलावात उडी घेतली. या घटनेची माहिती होताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा तपास करत आहेत.

जालन्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. त्यानंतर जालन्यातील मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे सरकारचं लक्ष गेलं. आरक्षणासाठी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आलेत. आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ मंगेश सांबळे या सरपंचाने स्वत:ची कारच पेटवली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Homemade Chat Masala Recipe: घरच्या घरी बनवा 'चटपटीत' चाट मसाला, रेसिपी वाचून तोंडाला सुटेल पाणी

नितीश राणाची अंपायरसोबत तू-तू, मैं-मैं; संतापलेल्या स्टब्सनं तावातावात फेकलं हेल्मेट, सामन्यादरम्यान चेपॉकमध्ये काय घडलं?

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकत्र येणं टाळले

Mumbai Local: पश्चिम रेल्वे खोळंबली! वसईजवळ ओव्हरहेड वायर तुटली; प्रवासी रूळावरून चालत निघाले, पाहा VIDEO

Mumbai : बड्या मंत्र्यांसोबत फोटो, स्मार्ट व्हिलेजमध्ये गुंतवणुकीचे आमिष; डॉक्टरने व्यवसायिकाला 1.13 कोटींना गंडा घातला

SCROLL FOR NEXT