Hingoli Crime saam tv
महाराष्ट्र

Hingoli Crime: अंघोळ करताना महिलेचे फोटो कॅमेऱ्यात कैद; व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार, हिंगोलीमधील घृणास्पद घटना

मागील अनेक महिन्यांपासून हा तरुण महिलेवर अत्याचार करत असल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

साम टिव्ही ब्युरो

Hingoli Crime : महिलांवरील अत्याचाराच्या घटना थांबता थांबत नाहीयेत. हिंगोलीमधून देखील एक घृणास्पद घटना समोर आली आहे. हिंगोलीच्या आमला गावात ३० वर्षीय युवकाने महिलेचा आंघोळ करतानाचा फोटो मोबाईलमध्ये कैद करत अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. (Latest Hingoli Crime News)

महिलेने या बाबत पोलिसात धाव घेत आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, मागील अनेक महिन्यांपासून हा तरुण महिलेवर अत्याचार करत असल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान अंघोळ करताना आरोपीने महिलेचा फोटो कॅमेऱ्यात कैद केला आणि सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत बदनामी करण्याची धमकी दिली. त्यामुळे आपण या तरुणाच्या अत्याचाराला बळी पडल्याचे देखील या महिलेने पोलिसांना सांगितले आहे.

या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिसात आरोपी परमेश्वर कोरडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

SCROLL FOR NEXT