Jalna News Saam Tv
महाराष्ट्र

Jalna News : ३० वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या; जालना तालुक्यातील हिवरडी गावातील घटना

जालन्यात शेतकरी आत्महत्याचं सत्र सुरूच

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

Jalna Latest News : जालन्यात शेतकरी आत्महत्याचं सत्र सुरूच आहे. जालना तालुक्यातील हिवरडी गावातील ३० वर्षीय युवा शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना काल (७ फेब्रुवारी) सायंकाळी सातच्या सुमारास घडली आहे. उमेश भुतेकर अस आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे.

गेल्या दोन वर्षांपासून तो आर्थिक अडचणीत सापडला होता. आर्थिक अडचणी मुळे तो सतत चिंतेत होता. याच विवेचणेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलून सायंकाळी सातच्या सुमारास मानसिक तणावातून दारूच्या नशेत विषारी औषध घेतल्याची महिती नातेवाईकांनी दिलीय.

उमेश याने विषारी औषध घेतल्याची माहिती कळताच नातेवाईकांनी आणि गावातील नागरिकांनी त्याला तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात (Hospital) दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) या घटनेची नोंद घेत. मृत्यदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत असून या घटनेमुळे हिवरडी गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

SCROLL FOR NEXT