Crime News  Saam Tv
महाराष्ट्र

Nashik Crime News: हृदयद्रावक! झोपेत असताना अंगावर पडले कपाट, 3 वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

Latest News: शौर्यच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

Priya More

Nashik News: झोपेत असताना अंगावर कपाट पडून तीन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. नाशिकच्या (Nashik) सिडको परिसरात ही घटना घडली आहे. शौर्य सुजित विश्वकर्मा असं या मुलाचे नाव असून बुधवारी सकाळी ही घटना घडली. शौर्यच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुजित विश्वकर्मा हे नाशिकच्या सिडको परिसरातील जाधव संकुलमध्ये कुटुंबासोबत राहतात. सुजित यांचा तीन वर्षांचा मुलगा शौर्य घरामध्ये झोपडला होता. शौर्य ज्याठिकाणी झोपला होता तिथे लाकडी कपाट होते. हे कपाट अचानक बुधारी सकाळी त्याच्या अंगावर पडले. गाड झोपेत असलेल्या शौर्यच्या अंगावर कपाट पडल्यामुळे त्याचा काहीच हालचाल करता आली नाही.

या घटनेनंतर सुजित यांनी आपल्या जखमी झालेला मुलगा शौर्यच्या अंगावरील कपाट बाजूला काढून त्याला तात्काळ रुग्णालयात नेले. पण डॉक्टरांनी उपचार करण्यापूर्वीच शौर्यला मृत घोषीत केले. शौर्यच्या मृत्यूमुळे विश्वकर्मा कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी नाशिकच्या अंबड पोलिस (Nashik Police) ठाण्यामध्ये शौर्यच्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Formal Pants For Woman: महिलांसाठी फॉर्मल पॅन्टचे 5 लेटेस्ट डिझाईन्स; ऑफिस लूकसाठी बेस्ट

Actress Death: भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, वृद्धाश्रमात घेतला अखेरचा श्वास

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आक्रमक; हेक्टरी 1 लाख, शेतमजुरांना 25 हजारांची मदतीची मागणी

Bike Mileage: बाईकला किती स्पीडमध्ये चालवली तर चांगलं मायलेज मिळतं? जाणून घ्या योग्य स्पीड

Rajya Sabha Election: मोठी बातमी! राज्यसभेसाठी भाजपकडून ८ उमेदवारांच्या नावाची घोषणा, कुणाला दिली संधी?

SCROLL FOR NEXT