Accident: काळाचा घाला! भीषण अपघातात 3 जीवलग मित्रांचा मृत्यू विनोद जिरे
महाराष्ट्र

Accident: काळाचा घाला! भीषण अपघातात 3 जीवलग मित्रांचा मृत्यू

वडगाववरून ३ मित्र बुलेटवर बसून बीडकडे येत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे.

विनोद जिरे

बीड: वडगाववरून ३ मित्र बुलेटवर बसून बीडकडे येत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे. ३ जीवलग मित्र एकाचवेळी मृत्यूच्या दारात ओढले गेले आहेत. बीडकडे जात असताना सोलापूर (Solapur)- धुळे राष्ट्रीय महामार्गावर भरधाव जाणाऱ्या बसने बुलेटवरुन जाणाऱ्या तिघांना जोराची धडक दिली आहे. यामध्ये २ मित्रांचा जागीच मृत्यू झाला तर एका मित्राने बीडच्या (Beed) जिल्हा रुग्णालयात (hospital) शेवटचा श्वास सोडला आहे. ३ जिवलग तरुण मित्रांचा भीषण अपघात झाल्यामुळे मित्र आणि नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयामध्ये (hospital) मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. (3 close friends die in horrific accident Beed)

हे देखील पहा-

अचानक तिन्ही मित्रांची झालेल्यांची हे मन सुन्न करणारी होती. धुळे (Dhule)- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर खजाना विहिरीजवळ रात्रीच्या सुमारास हा अपघात (Accident) घडला आहे. पारसनाथ मनोहर रोहिटे (वय-२२), कृष्णा भारत शेळके (वय- २३), अक्षय सुरेश मुळे (वय- २२) अशी मयतांची नावे आहेत. हे तिघं बुधवारी रात्री आहेरवडगाव येथून बीडकडे बुलेटवरुन येत होते. यावेळी धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर येताच त्यांना समोरुन आलेल्या भरधाव बसने जोराची धडक दिली आहे.

यामध्ये पारसनाथ आणि कृष्णाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अक्षयला जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान अक्षयचा देखील मृत्यू झाला आहे. औरंगाबाद आगाराची औरंगाबाद (Aurangabad)- लातूर बस ही बीडहुन लातूरकडे जात होती. अचानक समोरून दुचाकी आल्यामुळे चालकाचा एसटीवरचा ताबा सुटला यावेळी बसने दुचाकीला जोराची धडक दिली आहे. यामध्ये तिघेही गंभीर जखमी झाले आहेत.

धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातामध्ये बसची बुलेटला इतकी मोठी धडक बसली होती की, या धडकेमध्ये पारस नाथ रोहिते आणि कृष्णा शेळके या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. यावेळी अक्षय मुळे हा गंभीर जखमी झाला होता. अक्षयला अपघात स्थळावरून बीडच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी अक्षयला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आहे. पण यामध्ये त्यांना यश आले नाही आणि अखेर अक्षयचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

SCROLL FOR NEXT