Maharashtra Karnataka Border Dispute, Solapur saam tv
महाराष्ट्र

Karnataka Maharashtra Border Dispute : आमचं ठरलं ! महाराष्ट्रातील २८ ग्रामपंचायती निघाल्या कर्नाटकात

शिवानंद बोळेगाव म्हणाले आमच्या आंदाेलनानंतर आम्हांला कुठल्याही परवानगी शिवाय आंदोलन न करण्याची पोलीसांनी सूचना केली आहे.

विश्वभूषण लिमये

Karnataka Maharashtra Border Dispute : अक्कलकोट (akkalkot) आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील तब्बल अठ्ठावीस गावाच्या सरपंच अन् ग्रामस्थ्यांनी कर्नाटकात जाण्याची इच्छा नुकतीच व्यक्त केली हाेती. त्यासाठी तडवळ भागातील ग्रामस्थांनी कर्नाटकच्या समर्थनात घोषणाबाजी देखील केली हाेती. या ग्रामस्थांवर पाेलिसांची (police) आता करडी नजर आहे.

कर्नाटक सीमावादावरुन कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई आणि शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्र्यांमध्ये आगामी काळात वाद हाेण्याची शक्यता आहे. राज्यातील मंत्र्यांनी बेळगावात (Belgaum) येऊ नये असा इशारा बोम्माईंनी दिला आहे. त्यामुळे सीमावाद पेटणार की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

त्यातच महाराष्ट्रात राहणा-या कर्नाटकातील लाेकांनी त्यांना कर्नाटकात जाण्यासाठी लोकांची माथी भडकावली तर त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करू अशा इशारा साेलापूर (solapur) जिल्हा पोलिसांनी ग्रामस्थांना दिला आहे.

रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण या सुविधा मिळत नसल्याने गावक-यांनी आंदोलन (aandolan) केले. दरम्यान शिवानंद बोळेगाव म्हणाले आमच्या आंदाेलनानंतर आम्हांला कुठल्याही परवानगी शिवाय आंदोलन न करण्याची पोलीसांनी सूचना केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT