कोरोनाच्या तब्बल 2700 लसी झाल्या खराब; अधिकाऱ्यांना बजावली कारणे दाखवा नोटीस Saam Tv
महाराष्ट्र

कोरोनाच्या तब्बल 2700 लसी झाल्या खराब; अधिकाऱ्यांना बजावली कारणे दाखवा नोटीस

यामध्ये 2600 कोविशील्ड आणि 100 कोवॅक्सीन लसींचा समावेश आहे.

संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर

चंद्रपूर : देशातील अनेक भागांमध्ये कोरोना लसींचा तुटवडा असताना चंद्रपूर जिल्ह्यात मात्र जवळ पास 2700 कोरोना लसी (Corona vaccine) अधिकाऱ्यांच्या बेशिस्त कारभारामुळे खराब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (2700 corona vaccines have been damaged)

हे देखील पहा -

चंद्रपूर जिल्ह्यातील (Chandrapur District) भिसी या आरोग्य केंद्रावर (Health Center) हा लसी वाया गेल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधिकारी प्रियंका कष्टी आणि आरोग्य सहाय्यक शीला कराळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 13 तारखेला या केंद्रावरील 2600 कोविशील्ड Kovishield आणि 100 कोवॅक्सीन Covaxin लसी डीप फ्रीझरमध्ये ठेवण्यात आल्या, ज्यामुळे या लसी खराब झाल्या असल्याची माहिती समोर आली आहे.

कोरोना लस खराब झाल्याची घटना समोर येताच होताच प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली. दुसरीकडे अतिरिक्त कामाचा तणाव असल्याने आणि तब्येत बरी नसल्याने ही चूक झाल्याचे संबंधित कर्मचाऱ्याने मान्य केले आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MI vs CSK : हार्दिक-सूर्या फ्लॉप, पण संजू सॅमसनचं वादळ; चेन्नईने मुंबईला बालेकिल्ल्यात १०३ धावांनी चारली धूळ

Washim Accident : ट्रक उलटला, आंबे पळवण्यासाठी मोठी झुंबड उडाली, व्हिडिओ पाहून डोक्याला हात माराल

Pawar vs Pawar : 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार लढत, मतदानाच्या दिवशीच रोहित पवारांचे संकेत

आरोग्य यंत्रणेचा 'डेड रिपोर्ट'! 108 नंबरला क़ॉल, अ‍ॅम्ब्युलन्स 40 मिनिट लेट, रुग्णाचा मृत्यू

Bhandara Accident : लग्न लावून गावाकडे परतणाऱ्या वऱ्हाड्यांवर काळाचा घाला; ५ ठार, २ गंभीर

SCROLL FOR NEXT