Pune daund News Saam Tv
महाराष्ट्र

Shocking News : २७ ऊसतोड कामगारांना ओलीस ठेवलं, मारहाण केली, गरोदर महिलेलाही त्रास; पुण्यातील धक्कदायक प्रकार!

Pune daund News : पुण्यात गुऱ्हाळावर २७ मजुरांना ओलीस ठेवून जबरदस्तीने कामाला लावल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला आहे. यवत पोलिसांनी गरोदर महिलांसह सर्व मजुरांची सुटका केली असून गुऱ्हाळ मालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Alisha Khedekar

दौंड तालुक्यातील गुऱ्हाळावर २७ मजुरांना ओलीस ठेवून जबरदस्तीने कामाला लावलं

दोन गरोदर महिलांसह ७ मुलांचाही समावेश

माहिती मिळताच पोलिसांनी केली सुटका

गुऱ्हाळ मालकावर अत्याचार, धमक्या आणि वेतन न दिल्याचे आरोप

पोलिसांनी गुऱ्हाळ मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे

पुण्यातील दौंडमधून संतापजनक बातमी समोर आली आहे. गुऱ्हाळावर मजुरी करणाऱ्या एका कुटुंबासह एकूण २७ जणांना जबरदस्तीने कामाला लावल्याचा आणि त्यांना ओलीस ठेवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. धक्कदायक म्हणजे या कामगारांमध्ये २ गरोदर महिलांचा समावेश असून ७ मुले ही असल्याचे वृत्त मिळाले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दौंड तालुक्यातील राहु गावातील हिरामण गाढवे यांच्या गुऱ्हाळावर मजुरी करणाऱ्या एका कुटुंबासह एकूण २७ जणांना जबरदस्तीने कामाला लावलं. तसेच त्यांना डांबून ठेवण्यात आलं. या प्रकरणात पीडित मजुरांनी यवत पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून पोलिसांनी सर्व मजुरांची सुखरूप सुटका केली आहे.

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, कामाचा मोबदला प्रती टन ३०० रुपये ठरवण्यात आला होता. मात्र, हिरामण गाढवे यांच्याकडे मजुरांनी वारंवार मागणी करूनही ते कामाचा योग्य हिशेब देत नव्हते. तसेच त्यांनी काम सोडून मजुरांना गावाबाहेर जाण्यास सक्त मनाई केली होती. कोणत्याही कारणाने, अगदी नातेवाईक आजारी पडले किंवा मृत पावले तरी गावाला जाण्यास गाढवे यांनी बंदी घातली होती. याविरोधात मजुरांनी जाब विचारल्यास गाढवे मजुरांना डांबून ठेवण्याच्या धमक्या देत होते.

मागील महिन्यात हिरामण गाढवे आणि अरुण गाढवे यांनी फिर्यादींच्या भाच्याला, शिवराम रघुनाथ रजपुत याला आजारी असूनही काम करत नाहीस या कारणावरून ऊसाने तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मारहाणी नंतर शिवराम याला घरात बंद करून ठेवले. त्यानंतर मजुरांना पोलिसांकडे तक्रार केल्यास खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची दमदाटी करण्यात आली.

या संतापजनक घटनेची माहिती मिळताच २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९च्या सुमारास यवत पोलिस ठाण्याचे सतिश रजपुत, पोलीस हवालदार हनुमंत भगत, संदीप करे, सुनिल आव्हाड, जयंत भोसले, शुभम गुरव आणि मंगेश थोरात यांनी घटनास्थळी धाव घेत सर्व मजुरांची सुटका केली. ही संपूर्ण कारवाई जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मजुरांमध्ये जाधव, माळी, रजपुत आणि बरडे या कुटुंबांतील पुरुष, महिला आणि लहान मुले असे २७ जणांचा समावेश होता. या २७ जणांमध्ये दोन गरोदर महिलांचा समावेश होता.

या घटनेनंतर यवत पोलिसांनी गुऱ्हाळा मालक हिरामण गणपत गाढवे आणि अरुण गणपत गाढवे यांच्याविरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पोलीस पुढील तपास करत आहे. या प्रकरणामुळे स्थानिक परिसरात खळबळ उडाली असून ऊसतोड मजुरांच्या शोषणाचा गंभीर मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sugar Price Hike: साखरेचे दर 18 दिवसात पुन्हा वाढले; ग्राहकांना मोठा झटका, दरात वाढ का होतेय?

Nagpur Crime: नागपूर हादरले! सैनिकी स्कूलमध्ये विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार, शाळेच्या संचालकाला अटक

Manoj Jarange Strike : मनोज जरांगेंची मोठी घोषणा, उपोषणाचं ठिकाण बदललं; बावनकुळेंनंतर आणखी एका मंत्र्यांवर गंभीर आरोप

Cyber Crime : सावधान! मोबाइलवरील जाहिरातीवर क्लिक करताच बँक अकाउंट खटाखट झालं रिकामं, काय आहे हा स्कॅम? वाचा

MNS Student Sena And ABVP Fight: साठ्ये कॉलेजबाहेर तुफान हाणामारी; मनविसे आणि ABVPचे कार्यकर्ते भिडले

SCROLL FOR NEXT